भारत रशिया मैत्रीचा नवा सेतू

     


 सोमवार ६ डिसेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पाच तासासाठी भारत दौऱ्यावर आले होते करोना संसर्गाचा धोका अद्याप टाळलेला नसल्याने त्यांनी इतका छोटा दौरा केला मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांनी मात्र भारतातच बऱ्याच आधी येऊन भारताबरोबर विविध मुद्यावर चर्चा केली ब्लादीमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अंतराळशास्त्र  , विज्ञान सरंक्षण, ऊर्जा , अवजड अभियांत्रिकी , व्यापार आणि गुंतवणूक  अश्या विविध क्षेत्रातील एकूण २८ करार करण्यात आली . हे सर्व करार लष्करी व लष्करी- तांत्रिक सहकार्याबाबतच्या भारत- रशिया सरकारी आयोगाच्या २१व्या भारत रशिया समीटमध्ये करण्यात आले या कराराबरोबर चीनचा जगाला असणारा धोका आणि अफगाणिस्तानमधील अंतर्गत शांताता प्रक्रिया यावर देखील या समिटमध्ये चर्चा करण्यात आली  नवी दिल्लीयेथील हैद्राबाद हाऊस येथे हे करार करण्यात आले ज्यावेळी सन  २०१९ मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया येथे झालेल्या BRICS अधिवेशानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पहिल्यादाच ऑफलाईन पद्धतीने  समोरासमोर आले होते या  कराराविषयी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रीघल यांनी माध्यमांना माहिती दिली

      या समिट मध्ये खूप चर्चेत असणाऱ्या Reciprocal Exanchange of Logistical Support अर्थात रेलोस विषयी करार करण्यात आलेला नाही मात्र या विषयी लवकरच करार करण्यात येईल असे जाहीर करण्यातआले तसेच रशिया जपान सीमेजवळच्या व्लाडिगोस्को या शहरात भारताची वकिलात ( conslute ) उभारण्यासाठी जमीन देण्यावरूनेहरू गांधी दोन्ही देशात सहमती  करण्यात आली.  वकिलात  ( conslute )  हे दूतावासाचाचे (ambsey ) छोटे रूप असते देशाचा विस्तार मोठा असल्यास किंवा देशाबरोबर दळणवलं खूप असेल तर दूतावासाच्या ताण कमी करण्यासाठी आणि लोकांना सहजतेने कार्य करता यावे यासाठी वकिलात उभारली जाते ज्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी नसतात प्रामुख्याने देशाच्या राजधानीत दूतावास उभारत्तात तर इतर शहरात

वकिलात उभारली जाते . आर्थिक व्यवहार करताना सायबर हल्ले होऊ नये यासाठी भारताची रिझर्व बँक आणि त्याच्या समकक्ष असणारी बँक ऑफ रशिया दरम्यान यावेळी करार करण्यात आले फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आलेल्या लहान शस्त्रांच्या कलाश्निकोव्ह मालिकेचे उत्पादन करण्याच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत केलेल्या करारात सुधारणा करण्याचा करार तसेच गांधी नेहरू घराण्याचा  पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीमध्ये भारतीय सशस्त्र दलांसाठी सुमारे हजार कोटी रुपये खर्चून एके-२०३ रायफली तयार करण्याचा करार तसेच  2021 ते 2031 या कालावधीसाठी  लष्करी-तांत्रिक सहकार्याच्या कार्यक्रमावर एक करार झाला. या 10 वर्षांच्या संरक्षण सहकार्य कार्यक्रमात 1994 पासून स्वाक्षरी केलेल्या करारांसारख्या दोन्ही देशांमधील चालू संरक्षण सहकार्य आणि भविष्यातील संभाव्य सहकार्याची रूपरेषा स्पष्ट केली आहे इंडो- रशिया रायफल्स प्रा.लि. मार्फत ,०१,४२७ एके-२०३ ॅसॉल्ट रायफलींचे उत्पादन करण्याचा करार हा या चार करारांपैकी सर्वात महत्त्वाचा करार होता. लष्करी सहकार्याबाबतचा १० वर्षांचा करार हा सध्याच्या चौकटीचे नूतनीकरण आहे.

 या करारांबरोबर यावेळी भारत आणि रशियामध्ये  अधिक  स्तरावरची चर्चा देखील झाली ज्यामध्ये दोन्ही देशाच्या परराष्ट्र आणि सरंक्षण मंत्र्यांनी भाग घेतला भारत आणि रशियामध्ये झालेली या प्रकारची ही पहिलीच चर्चा होती भारताची या प्रकारची चर्चा अमेरिकेबरोबर होत असते यावेळी रशियाकडून पुढील समिट रशियात करण्याचे आमंत्रण रशियाकडून देण्यात आले जे भारताने स्वीकारले आहे 

भारत २१ व्या शतकात जाहचे नेर्तृत्व करण्यास सज्ज झाला आहे , हेच या घडामोडीतून स्पष्ट होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?