झपाट्याने विनाशाकडे !

         

उंच डोंगरावर जेव्हा बर्फ घसरतो ,तेव्हा त्याचा एक चेंडू बनून वेगाने खाली येतो, वाटेत इतर बर्फ या चेंडूमध्ये समाविष्ट होवून त्याचा आकार आणि वेग वाढवतो.असा आकार आणि वेग वाढवलेला चेंडू जेव्हा डोंगराच्या खाली येतो तेव्हा मोठी हानी करतो. जे चेंडूचे तेच कोणत्याही संकटाचे असते.सुरवातीला छोटे वाटणारे संकट वेगाने अक्राळविक्राळ स्वरुप धारण करते. शास्त्रज्ञांनी यास स्पिंग बाँल इफेक्ट हे नाव दिले आहे. स्पिंग बाँल इफेक्ट ही संकल्पना प्रामुख्याने वाइट गोष्टींसाठीच वापरली जाते कोसोवो हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे .सध्या पाकिस्तान याच स्पिंग बाँलमध्ये अडकला असल्याचे तेथून येणाऱ्या घटनांमुळे दिसून येत आहे .
     पाकिस्तानचे आर्थिक आरीष्ट्य कमी की काय ?म्हणून तिथे कट्टर धार्मिक लोकांनी तिथे उत्साद मांडला आहे. आपल्या देशात काम करायला आलेल्या श्रीलंका या दुसऱ्या देशाच्या नागरीकाची  झूंडशाहीच्या माध्यमातून मारझोड करत जाळून हत्या करण्यापर्यत त्यांची मजल गेली आहे सियालकोट या शहरातील ही घटना आहे सियालकोट या पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील शहरापासून  भारताच्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची हिवाळ्याची राजधानी जम्मू  फक्त ४० किमी दूर आहे तर भारत पाक सीमा १५ किमी दूर आहे प्रियनाथन कुमारा हे त्या अभागी व्यक्तीचे नाव असून ते पाकिस्तानात राजको इंडिस्ट्री या कंपीनीत फॅक्टरी मॅनेजर म्हणून कार्यरत होते .ते व्यवसायाने इंजिनिअर होते   पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी सादर घटनेचा ट्विटरवर निषेध केला आहे तसेच दोषींवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींची ओळख पेटवण्याचे काम सुरु आहे  हा लेख लिहण्यापर्यंत ५० जणांना अटक करण्यात आल्याची बातमी बीबीसीने दिली आहे श्रीलंकन सरकाने या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध केला असून दोन्ही देशांच्या संबंधावर यामुळे अनुचित परिणाम होणार असल्याचे जाहीर केले आहे पाकिस्तानातील ईशनिंदा या
कायद्याचा आधारे अनेक अप्लसंख्यांक व्यक्तींना फाशी देण्यात आले आहे या  कायद्यामध्ये काहीसा बदल करावा अशी मागणी करणाऱ्या पाकिस्तानी पंजाबमंधील एका माजी मंत्र्याला त्याचाच अंगरक्षकाने संपवले होते भरीस भर म्हणून या अंगरक्षकाच्या  सत्कार करण्यात आला होता  तैहरीके ए लब्बेक  या संघटनेला पाकिस्तानात मोठा आधार आहे हि संघटना कट्टर धार्मिक विचारांची आहे मात्र हे सर्व पाकिस्तानातील अंतर्गत घटक होते पहिल्यांदाच त्यांनी एका परराष्ट्रातील व्यक्तीला आपले लक्ष्य केले आहे 
     हे कमी की काय ? म्हणून पाकिस्तानच्या सर्बिया देशातील दुतावासात काम करणाऱ्या एका व्यक्तीने दुतावासाच्या अधिकृत समाजमाध्यमांद्वारे जाहिर वाभाडे देखील काढले आहेत.इमरान खान मला माफ करा मला तीन महिन्यापासून पगार नाही, महागाईमुळे जगणे अशक्यप्राय बनत चालले आहे.असा मेसेज इंग्रजींत आणि  पाकिस्तानात प्रसिद्ध झालेले  उर्दूतील  एक विडंबनात्मक गाणे देखील पोस्ट केले होते पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यातर्फे आमचे खाते हॅक करण्यात आल्याने हा मेसेज पोस्ट करण्यात आला होता जो आता काढून टाकण्यात आला आहे असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे  . पाकिस्तानने याबाबत सर्बिया या देशाला जवाबदार धरले आहे.  सर्बिया या देशातून स्वतःला स्वतत्र घोषित केलेल्या कोसोवो  बंडखोर राष्ट्राला पाकिस्तानने मान्यता  दिल्यामुळे सर्बियाने हे कृत्य करण्यास मदत केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे  कोसोवो हा मुस्लिम बांधवांची संख्या मोठा प्रमाणात असणारा सर्बिया या देशातील भाग होता . सर्बिया या प्रामुख्याने ख्रिस्ती बांधवांची संख्या अधिक असलेल्या जेमतेम ७० लाख लोकसंख्या असलेल्या देशातून कोसोवोने दोन वर्षांपूर्वीआपण स्वतंत्र असल्याचे जाहीर केले होते ज्याला अद्याप भारताने स्वतत्र देश म्हणून मान्यता दिलेली नाही पाकिस्तानने दिलेली आहे पाकिस्तनाचा या भागाला स्वतंत्र देश म्हणून अधिकाधिक देशांनी मान्यता द्यावी यासाठी आग्रह चालू असतो 
पा    किस्तानमध्ये महागाईने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले आहे आंतराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानवर लादलेल्या बंधनामुळे त्यात दिवसोंदिवस वाढत होत आहे त्यामुळे पाकिस्तानात ठीक ठिकाणी केंद्र सरकार विरोधात आंदोलने होत आहेत त्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातील घटनेकडे बघायला हवे 
   बुडत्याचा पाय खोलात या मराठी म्हणीप्रमाणे पाकिस्तानमधील या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होते की पाकिस्तान प्रगतीच्या वाटेवर येतो हे येणाऱ्या कळतील घटना ठरवतील भारताला अस्थिर पाकिस्तान कोणत्याच स्थितीत परवडणारा नाही हेही तितकेच खरे आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?