सिंहावलोकन २०२१ जग

   

    सरते वर्ष २०२१ हे वर्ष जगाचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . कोव्हीड १९ शिवाय अनेक घटनांनी जगाचा पट सातत्याने हलता ठेवला .सन २०२१ मध्ये चीनने तैवानबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेणे न्यझीलँड देशाने ध्रुमपान देशातून पूर्णपणे संपवण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेणे,  इस्राईलने मुस्लिम बांधवांसाठी मक्का , मदिना या नंतर तिसऱ्या क्रमांकाच्या  पवित्र असणाऱ्या अल सोफिया या मशिदीवर हल्ला करणे . अमेरिकेत त्याची राजधानी असणाऱ्या वॊशिंग्टन डिस्ट्रिक कोलंबिया या शहारला स्वतंत्र ५१ वे राज्य म्हणून मान्यता देण्याचा हालचालींना वेग , अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडला जाणे , जर्मनीत सत्तातरं होऊन डेमोक्रेक्तिक आघाडीची सत्ता जाऊन पर्यावरणप्रिय पक्षाची असलेली आघाडी सत्तेत येणे , किर्गिस्तान आणि ताजिकीस्तान या भूतपूर्व युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट  असणाऱ्या देशांमध्ये इस्कारा या नदीच्या पाण्यावरुन युद्ध होणे युके देशातून स्कॉटलंड या भागाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दयावी का ? म्हणून करावयाचा सार्वमताचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणे आदी अनेक घडामोडी घडल्या आता या घडामोडी बघूया 
     तर मित्रानो , चीनने तैवानबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेत तैवानच्या हवाई हद्दीत आपली लढाऊ विमाने घुसविणे तैवानच्या उल्लेख चायनीज तैपेई न करता तैवान करणाऱ्या देशाशी व्यापारी संबंध तोडून टाकणे जागतिक व्यासपीठावर तैवानला स्वतंत्र देश म्हणून दाखवणाऱ्या जागाच नकाश्यावर आक्षेप नोंदवणे खेळाच्या समालोचनत तैवान हा उल्लेख येणे राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा मुद्दा करणे आदी गेल्या वर्षभरात घडलेल्या  गोष्टीतून 
तैवानविषयक चीन आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे 
जगाला अनेक नवीन गोष्टी देणाऱ्या न्यूझीलंड या देशाने यावर्षी जगातील पहिला ध्रुमपान नसणारा देश होण्यासाठी देशातील सिगारेट विकणारी दुकाने निम्यावर आणणे , ध्रुमपानासाठी आवश्यक असणाऱ्या किमान वयोमर्यादेत सातत्याने वाढ करणे ज्या योगे ध्रुमपानापासून युवा पिढी दूर जाईल या साठी अनेक उपाय योजले . 
इस्राईलने पॅलेस्टाईन विषयीचाआक्रमक पवित्रा य वर्षी कायम ठेवत, या वर्षी थेट मुस्लिम बांधवांसाठी मक्का , मदिना या नंतर तिसऱ्या क्रमांकाच्या  पवित्र असणाऱ्या अल सोफिया या मशिदीवर हल्ला केला ज्यात अनेक भाविक जबर जखमी झाले बांगलादेशने त्यांचा पासपोर्ट इस्राईलसाठी वैध असणारा नाही हा बांगलादेशी पासपोर्टवरील उल्लेख काढला 
    अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॊशिंग्टन डिस्ट्रिक कोलंबिया  या शहराची लोकसंख्या काही राज्यांपेक्षा जास्त असून देखील  राज्य म्हणून मान्यता नसल्याने काँग्रेस मध्ये प्रतिनिधीत्व कमी मिळते या समस्येवर मत करण्यासाठी त्यास अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हणून मान्यता देण्याविषयीच्या संसदीय कार्यवाहीस सुरवात केली तसेच अमेरिकेचे दोनदा उपराष्ट्राध्यक्ष असणारये जॉन बायदान यांनी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला 
जर्मनीमध्ये गेल्या १६ वर्षांपासून चॅन्सलर असलेल्या अँजेला मर्केल यांनी या आधीच सांगितल्याप्रमाणे या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाग ना घेता अलिप्त राहणे पसंत केले या निवडणुकीत त्यांच्या आघाडीचा पराभव होऊन ग्रीन पार्टीचा सहभाग असणारी आघाडी सत्तेत आली 
भुतपूर्व युनाटेड सोशालिस्ट सेव्हियत रशियातील दोन देश , किरगीस्तान आणि तजाकिस्तान या दोन देशात इस्कारा  नावाच्या नदीच्या पाण्याचा वाटपावरुन छोटेसे युद्ध पेटले इस्कारा या नदीवरील पाणी चोरले जावू नये, म्हणून 28एप्रिलला तजाकिस्तान देशाकडुन सिसिटिव्ही उभारला जात असताना कझाकिस्तान देशाकडून लष्करामार्फत गोळीबार सुरु करण्यात आला. ज्यामुळे हे छोटेखानी युद्ध झाले भारतात मुघल सत्तेचा पाया घालणारा बाबर ज्या फरगाणा  खोऱ्यातील सरदार होता. त्याच  फरगाणा  खोऱ्यात हे  युद्ध  लढले गेले 
एकंदरीत जगाच्या घडामोडीचा विचार करता  हे वर्ष प्रचंड वादळी ठरले असेच म्हणावे लागेल 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?