मागोवा बुद्धिबळाचा इतिहासाचा -भाग २ (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग १०)

   


बुद्धिबळाविषयक लिहलेली पुस्तके आपण बघत आहोत या आधी युरोपात बुद्धिबळ कसा  पसरला  त्यामुळे बुद्धिबळात विविध पुस्तके निर्माण करण्याची सुरवात कशी झाली या विषयी प्राथमिक माहिती बघितली आता याविषयी सविस्तर माहिती बघूया 

१८०० साली दुसऱ्या बाजीराव यांनी  त्याचा पदरी असलेल्या त्रीवेगडाचार्य यांना बुद्धिबळावर पुस्तक लिहण्यास सांगितले  त्रीवेगडाचार्य  यांनी विलासमनीमंजिरी या नावाने संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत पुस्तक लिहले पुढे १८१४ साली या पुस्तकाचे डॉ एम दि क्रूझ यांनी एजेस ऑफ चेस या नावाने त्यांचा इंग्रजीत अनुवाद केला १६ व्य आणि १७ व्य शतकात इटली आणि स्पेन दे दोन देश बुद्धिबळात अग्रेसर होते त्याच वेळी फ्रांस इंग्लड तसेच रशिया या देशात बुद्धिबळ पोहोचले 

बुद्धिबळाची व्याप्ती बघितली तर १३२७ विविध प्रकारे डावाची सुरवात करता येते १४ व्य शतकात कॅसलिंगचा शोध लागला आणि त्यास बुद्धिबळात समाविष्ट करण्यात आले १ जानेवारी १९८१ साली बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना अर्थात फिडेने बुद्धिबळ डाव बीजगणितीय पद्धतीने लिहण्याचे स्वीकारले ओपनिंग लक्षात ठेवण्यासाठी पटाचे दोन विभाग करण्यात आले एक राजाकडील विभाग तर दुसरा वजीरकडील विभाग राजाकडील विभागाला ओपन गेम म्हणतात तर वजीरकडील विभागला क्लोज गेम म्हणतात या दोन्ही विभागाचे डावपेच वेगवेगळे आहेत ओपन गेम मध्ये फाईल्स ( बुद्धिबळाच्या पटावरील उभ्या ओळीला फाईल म्हणत्तातय ) आणि डायगोनल्स (तिरकी ओळ )

मोकळे केले जातात आणि त्याद्वारे प्रतिस्पर्ध्यवार हल्ला केला जातो चाचणी आणि समीकरणाच्या प्रामुख्याने उपयोग केला जातो क्लोज खेळात फाईल आणि डायगोनल्स हे बंद ठेवण्यात येतात केंद्र सुद्धा बंद राहते यात परिस्थितीचा अभ्यास  व्यापक स्तरावर विचार केला जातो त्याला अनुसरून रणनीती आखली जाते . सोगत्यांना  एकाच जागी बांधून ठेवले जाते ओपनींगची नावे  ( बुद्धिबळाच्या सुरवातीच्या खेळ्यांना ओपनींग म्हनतात )  त्या  ज्या क्षेत्रात शोधल्या गेल्या किंवा ज्यांनी शोधल्या त्या खेळाडूंच्या किंवा प्राण्याच्या नावाने ठेवण्यात आली आहेत काही ओपनिंग विशिष्ठ  पध्द्तीने भारतात खेळल्या जात असत म्हणून त्यास भारताच्या नावाने देखील ओळखले जाते 

बुद्धिबळाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक प्रवाह निर्माण झाले आहेत त्याची माहिती पुढील भागात बघूया 


लेखक
सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  
 
शब्दांकन अजिंक्य तरटे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?