आंनद सांगू सख्यारे किती ! (ब बुद्धिबळाचा भाग १९ )

     

   सध्या आपल्या महाराष्ट्रात वाढत्या कोव्हीड १९ च्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनची  प्रशासनाने कोव्हीड १९ आटोक्यात आणण्यासाठी लादलेल्या निर्बंधनात आपला व्यवसाय कशा करावा  चिंतेत व्यावसायिक असताना वाळवंळामध्ये दूरवर कुठेही पाण्याच्या अंश नसताना अचानक एखादा पाण्याच्या मोठा स्रोत दिसावा आणि अतिशय आंनद व्हावा अशी एक आनंदाची बातमी ९ जानेवारी रोजी येऊन धडकली आणि सर्वांना एकच आंनद झाला झाला  नव्या वर्षाच्या प्रारंभ होऊन जेमतेम आठवडा होत नाही तोच भारताला बुद्धिबळात नवा ग्रँडमास्टर  मिळाल्याची ती आनंदवार्ता होती . 
       तर मित्रानो, चेन्नई येथील रहिवाशी असलेल्या १४ वर्षीय भारथ  सुब्रह्मण्यम  भारताचा ७३वा ग्रँडमास्टर झाले  आहेत  इटली या देशात सुरु असणाऱ्या Vergani Cup opem या स्पर्धेत ९ डावात ६ विजय एक बरोबरी तर दोन डावात पराभव स्वीकारून साडेसहा गुण प्राप्त करत ग्रँडमास्तरपदाचा तिसरा आणि अंतिम निकष २५०० इलो रेटिंगसह प्राप्त करत त्यांनी ग्रँडमास्टर पदाला गवसणी घालत सध्याचा काहीश्या नैराश्यच्या वातवरणात आनंदाचे क्षण पेरले बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना अर्थात फिडे या लघु लघुरूपाने परिचित असलेल्या फेडरेशन ऑफ दि इ चेस,  मार्फत खेळाडूंची इतर खेळाडूंच्या तुलनेतील कामगिरी समजण्यासाठी त्यांना त्यांच्या स्पर्धेतील
कामगिरीच्या आधारे देण्यात येणारे गुणांकन म्हणजे इलो रेटिंग . ते २५०० झाले आणि अन्य तीन निकष पूर्ण केले की , त्या बुद्धिबळपटूचा सम्मान करण्यासाठी फिडे कडून देण्यात येणारा 'किताब  म्हणजे ग्रँडमास्टर होय एकप्रकारे ती  त्या बुद्धिबळपटूच्या बुद्धिबळ कौश्यल्याला दिलेली दाद असते . 
      भारथ  सुब्रह्मण्यम  यांनी त्यांच्या ग्रँडमास्टरचा पहिला निकष पूर्ण केला, तो फेब्रुवारी २०२० मध्ये मास्को येथे  झालेल्या Aeroflot open  या स्पर्धेत तर दुसरा निकष पूर्ण केला तो बल्गेरिया या देशात ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्याRroundtabble Under 21 Tourament मध्ये या स्पर्धेत त्यांनी साडेसहा गुण मिळवत चौथे स्थान मिळवले होते  तर तिसरा निकष त्यांनी ९ जानेवारीला पूर्ण करत बुद्धिबळातील सिहांसन साध्य केले सन २०१९ मध्ये ११ वर्ष आणि ८ महिन्याचा असताना ग्रँडमास्टरपेक्षा   काहीसा कमी असलेला इंटरनॅशनल मास्टर हा 'किताब मिळवला होता हाही 'किताब फिडेकडूनच देण्यात येतो 
भारतात वैयक्तिक खेळांमध्ये बॅडमिंटन.  टेबल टेनिस थाळाफ़ेक बॉक्सिंग रनिंग  आदी मैदानी खेळांना जितकी प्रसिद्धी मिळते त्यांच्या पेक्षा खूपच कमी प्रसिद्धी बुद्धिबळ या शारीरिक आणि मानसिक क्षमता जोखणाऱ्या खेळाला दुर्दैवाने  मिळत नाही  मात्र त्यामुळे निराश न होता बुद्धिबळपटू खूपच नेत्रदीपक अभिमानास्पद कामगिरी करत आहे हा बुद्धिबळपटूच्या अश्व अशाच दौडत राहो हीच सदिच्छा 




 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?