मुद्दा योग्यच पण ....

   

   महाराष्ट्र शासनाने  मराठीचा उत्कर्ष व्हावा यासाठी यापुढे सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत असाव्यात, असा आदेश नुकताच काढला. मराठीचा विकासाबाबतची त्यांची भुमिका अभिनंदनास पात्र आहे मात्र  पुढील    गोष्टींचा देखील विचार करणे आवश्यक  आहे असे  मला वाटते 
        सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात ज्या भाषेत तंत्रज्ञान आहे, त्याच भाषेचा विकास होणार, हे जगजाहीर आहे, आणि या बाबत मराठीत प्रचंड अनास्था आहे. वाचलेले सहजतेने समजू शकते, अस्या मराठी भाषेत तंत्रज्ञानाची माहिती अच्युत गोडबोले यांच्या व्यतिरीक्त कोणी दिली आहे का ? याबाबत माहिती घेतल्यास समोर येणारे चित्र निराशाजनक आहे. रोजच्या व्यवहारात इंग्रजी शद्ब वापरले जात असताना संस्कृतप्रचूर शद्ब वापरून विषय समजून घेतल्याने काहीसी अडचण निर्माण होवू शकते. ती अडचण दाखवून त्यापुढचे व्यक्ती ती
संकल्पना समजण्यासाठी इंग्रजीचाच आधार घेताना दिसते, त्यामुळे मराठीचा ज्ञानभाषा बनण्याचा मार्ग खुंटतो आज इंग्रजी समजण्यात येणाऱ्या अनेक संकल्पना जसे अल्फा, बीटा, लँमडा विविध ग्रहांची नावे ही लँटिन आहेत. मात्र ती इंग्रजीत सहजतेने स्विकरली त्याचे वरुण ग्रह, कुबेर ग्रह, हर्षल ग्रह असे नांमांतरण केले नाही. आपल्याकडे विज्ञानात संशोधन होण्याऐवजी भाषा संशोधन होते.   
           नाशिकच्या साहित्य संमेलनात अध्यक्ष डाँक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हाच मुद्दा आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडला होता. एखादी संकल्पना मराठीत सांगणे म्हणजे सर्वसामान्यांना समजेल अस्या भाषेत समजावून सांगणे यासाठी प्रसंगी इंग्रजी शद्बाचा आधार घेवून समजवावून सांगणे होय नकी  त्या इंग्रजी संकल्पननेच संस्कृतप्रचूर मराठीत भाषांतर करणे नव्हे ,हे मराठीतील लोकांनी समजावून घेणे आवश्यक आहे. हे समजावून न घेतल्याने, आज ग्रामीण महाराष्ट्रातील इंग्रजीचा गंध नसलेली आणि शहरातील इंग्रजीचा स्पर्श असलेली युवा पिढी असी दरी  विज्ञानाबाबत निर्माण झाली आहे, ती वेगळीच .
                मी माझे जीमेल  मराठीत वापरतो. त्याठिकाणी inbox हा शद्ब इनबाँक्स असा लिहलेला असतो, outbox हा शद्ब आउट बाँक्स असा लिहलेला असतो  . त्यांचे संदेशपेटी,  बाह्यपेटी असे नामकरण केलेले नसते. ही बाब लक्षात घेणे आवश्यक असते. या संस्कृतप्रचूर मराठीची थट्टा करणारे अनेक विनोद आपण अनेकदा वाचतो(किमान मी तरी खुपदा वाचले आहेत) आपण त्या समस्येवर हासतो मात्र ती दुर करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही.मराठीतील हे संस्कृत प्रचरण थांबवून प्रसंगी इंग्रजी भाषेचा आधार घेत मराठी ज्ञानभाषा बनवणे हेच मराठीचा विकास करण्यासाठी आवश्यक आहे, असे मला वाटते.    
      आँक्सफर्ड विद्यापीठ दरवर्षी इंग्रजी भाषेत दाखल झालेले मुळचे इंग्रजीत्तेर शद्बांची यादी प्रसिद्ध करते.जर इंग्रजी भाषिक इतर भाषेतील शद्ब सहजतेने स्विकारते, तसेच आपण करायला हरकत काय आहे. 
    तसेच एखादी भाषा शिकणे आणि एखाद्या भाषेच्या माध्यमातून शिकणे यात खुप फरक आहे. इंग्रजी सध्याचा काळात आवश्यक आहे, यात दुमत नाही. मात्र याचा अर्थ इंग्रजी माध्यमातून शिकणे, असा नव्हे. मराठी माध्यमातून शिकूनसुद्धा इंग्रजी भाषा उत्तम करता येते, ही बाब सध्याचा पालकांना समजणे आवश्यक आहे. जर हे समजले तर   आणि तरच मराठी भाषा  विकसित होईल अन्यथा नाही हे   लक्षात घेयला हवे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?