नाही , म्हणजे नाही,

       


 नाही , म्हणजे नाही,आम्ही कोणत्याही स्तिथीत कितीही महान टेनिसपटू असला तरी नोवाक जेकोविच याला ऑस्ट्रलियाच्या भूमीत थांबवू देऊ शकत नाही ,हे बोल आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॊरिशन यांचे.  त्यांनी  . राफेल नदाल , रॉजर फेडरलसह ३० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या आणि जानेवारी २०२२ ची पुरुष खेळाडूंची जागतिक क्रमवारी बघता पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवाक जेकोविच  याला कोणत्याही स्थतीतीत ऑस्ट्रेलियाचा व्हिसा देऊ शकत नसल्याचे जाहीर केले आहे ऑस्ट्रेलिया टेनिस संघटनेने नोवाक जेकोविचयाला ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये खेळण्यास परवानगी दिल्यानंतर त्याच्या विरोधी भूमिका घेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॊरिशन यांनी त्यास मनाई केली आहे ऑस्ट्रेलिया ओपन बघायला येणाऱ्या प्रेक्षकांबरोबर आम्ही कोणताही धोका घेऊ शकत नाही अतसेच कोणत्याही नागरिकांपेक्षा कायदा हा से त्यांनी ही मनाई करताना सांगितले आहे मोठा असतो त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे सूट देता येत नाही त्याच्या बाबत अपवाद करता येणार नाही  सध्या ऑस्ट्रेलियात वाढणारी रुग्ण संख्या बघता तर नाहीच असे सांगत ही मनाई करण्यात आली आहे 

      नोवाक जेकोविच याने कोव्हीड १९ प्रतिबंधनात्मक लसीचा फक्त एकच डोस घेतला आहे तर ऑस्टोलिया या देशात परदेशी नागरिकांना प्रवेश करायचा झाल्यास दोन डोस पूर्ण करणे अत्यावश्यक आहे तसेच प्रत्यक्ष ऑस्ट्रेलियात येण्याआधी १५ दिवस कोठेही जाण्यास मनाई आहे मात्र तो  ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यापूर्वी   १५ दिवस आधी सर्बियात एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला होता त्यांच्याच सोशल मीडिया अकाउंटवरून

त्यांनी शेअर केलेल्या फोटोवरून ही गोष्ट जगाला कळाली त्यांनी ऑस्ट्रेलियाचा व्हिस्यासाठी अर्ज करताना काही चूक झाल्याचे कबूल केले आहे  ऑस्ट्रेलिया टेनिसच्या नियमांनुसार जर एखाद्या खेळाडूस ६ महिन्यापेक्षा कमी काळात कोव्हीड १९ झाला असल्यास त्याने लसीचे दोन डोस घेण्याची काही गरज नाही .नोवाक जेकोविचच्या मते त्याचे शरीर हे पवित्र प्रार्थना स्थळांसारखे असून कोणीही त्याला लसीकरणाबाबत सक्ती करू शकत नाही हा मजकूर लिहीत असताना नोवाक जेकोविच  याचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला आहे सर्बियन टेनिस संघटनेने आम्ही या बाबत काहीही करू शकत नाही अशी भूमिका जाहीर केली आहे त्याचा अपवाद करावा अशी भूमिका काही ऑस्ट्रोलिया  देशातील लोक करत आहेत हे विशेष 

     भारताच्याबाबत बोलायचे झाल्यास कायद्याची अमंलबजावणी कश्या प्रकारे करायची?  याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे आज महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास औरंगाबाद सारख्या काही जिल्यात कोव्हीड १९ च्या प्रतिबंधनात्मक लसीचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्या ठिकाणी विविध कारणे सांगत लोक लसीकरण टाळत आहे त्या ठिकाणचे लसीकरण वाढावे यासाठी विविध प्रकारे प्रशासन लोकांचे प्रबोधन करत आहे मात्र टक्का फारशा वाढत नाहीये त्या ठिकाणच्या प्रशासनने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानसारखी भूमिका घ्यावी नाशकातही हेल्मेट परिधान करण्याच्या कायद्याबाबत काही लोक नाके मुरडत आहे मी सांगितलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत आपल्या भारतात अनेक ठिकाणी अनेक कायद्याबाबत मोडण्याची प्रवृत्ती असते त्या ठिकाणी कसे वागायचे ? याचे आदर्श उध्दरणच त्यांनी घालून दिले आहे आहे त्याचा अपवाद करावा अशी भूमिका काही ऑस्ट्रोलिया  देशातील लोक करत असताना देखील तेथील पंतप्रधानाने कायदा सर्वांना सामान ही भुमीका सोडलेली नाही आपल्या राजकारण्यांनी आणि सामान्य जनतेने सुद्धा यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते नोवाक 

जेकोव्हिचला त्याची बाजी पाडण्याची पुरेशी बाजू देत त्याचा व्हिसा रद्द करण्याची प्रक्रिया अमलात आणली आहे आदर्श लोकशाही म्हणजे काय ? याचा वस्तुपाठच यातून घालून देण्यात आला आहे आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे अभिमानाने सांगतो मात्र लोकशाहीमूल्य आपल्याकडे समाजजीवनात रुजल्याचे दिसत नाही त्याबाबत आपण ऑस्ट्रेलियाकडून खूप काही शिकू शकतो . ही घटना फक्त खेळाशी संबंधित न करता , कायद्याची अमंलबजावणी कश्या प्रकारे कोणतेही दडपण न येऊ देता कश्या प्रकारे करायची याची केस स्टडी म्हणून आपण बघायला हवी असे मला वाटते आपण जर त्या घटनेकडे तसे बघितले तर आणि तरच आपण आदर्श नागरिक होऊ हे नक्की 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?