पाकिस्तान मोठ्या बदलाच्या वाटेवर

   

   शुक्रवारी 14 जानेवारी रोजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे  गेल्या 75 वर्षातील पहिले सुरक्षा धोरण जाहिर केले. हे सुरक्षा धोरण 2022 ते 2026 पर्यत पाकिस्तानची आर्थिक आणि अंतर्गत वाटचाल कशी असेल ? यावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकते. या धोरणाचे दोन अहवाल आहेत. त्यातील एक भाग जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. तर दुसरा भाग देशासाठी महत्तवाचा आहे, असे सांगून जनतेसाठी  प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. Wion Newsने दिलेल्या बातमीनुसार देशातील विरोधी पक्षांनी भारताशी गुप्त करार केला असल्याने तो भाग गुप्त ठेवला असल्याचा आरोप केला आहे. जो सरकारने पुर्णतः फेटाळला आहे. पाकिस्तानी सरकारने असा कोणताही करार करण्यात आलेला नाही. प्रत्येक देश त्यांचा प्रत्येक बाबी उघड करत नाही, तसेच याबाबत असल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे सांगण्यात आले आहे.
     या धोरणानुसार येत्या 100 वर्षात पाकिस्तान भारताशी युद्ध करणार नाही. या धोरणात काश्मीरविषयी अत्यंत त्रोटक उल्लेख असल्याने इंम्रान खान विरोधात तेथील जनमत मोठ्या प्रमाणात असल्याचे wion news  या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीत सांगण्यात आले आहे. तर इंडिया टुडे ने या सबंधी आयोजीत केलेल्या चर्चासत्रात पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास बघता हे धोरण किती यशस्वी होते? हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. याच इंडीया टुडेच्या चर्चासत्रात पाकिस्तानच्या प्रतिनिधीने काश्मीर प्रश्न हातळण्यास सक्षम असल्याने मुलकी सरकारने तयार केलेल्या राष्ट्रीय  सुरक्षा धोरणात याचा समावेश न केल्याचे सांगितले आहे. भारताने 370 आणि 35ए कलम रद्द केल्यानंतर जो पर्यत हे पुर्ववत होत नाहीत तो पर्यत भारताशी कोणत्याही स्थितीत चर्चा होवू शकत नाही, असे पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने जाहिर केले होते हे आपण लक्षात घेयला हवे अल जझीराने या बाबत केलेल्या इनडेफ्ट (या इनडेफ्ट मध्ये अनेक विषय खुप सविस्तर कथन केले असतात.माझ्या मते हे जरी कतारचे चँनेल असले तरी अनेक विषय मुळातून समजण्यासाठी हा कार्यक्रम बघावाच) मध्ये सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानच्या भौगोलिक स्थानाचा फायदा घेत आर्थिक फायदा (Geo Economical  benifict ) तसेच प्रगतीसाठी हे धोरण खुपच साह्य करु शकते. भारतातील आणि पाकिस्तानातील अनेक राज्यकर्ते एकमेकांच्या देशांना केंद्रभुत करुन धोरण आखतात ,ज्यामुळे शत्रुत्वात वाढ होते. या नव्या सुरक्षा धोरणामुळे ही शत्रूत्ता कमी होईल ज्यामुळे दक्षीण आशियातील सर्व देश प्रगती करेल, असे पाकिस्तानच्या प्रतिनिधीने सांगितले.याबाबत भारतीय प्रतिनिधीने काहीही बोलण्यास नकार दिल्याचे या इनडेफ्टमध्ये सांगण्यात आले आहे. The print ने याबाबत दिलेल्या बातमीनूसार यामध्ये पाकिस्तानशी प्रत्यक्ष सीमा लागलेल्या देशांशी अर्थात भारत , अफगाणिस्तान, इराण चीनबाबत अधिक भाष्य करण्यात आले आहे. मात्र ज्या देशाचा पाकिस्तानावर खुप प्रभाव
आहे,ज्या देशानी तयार केलेल्या लष्करी संघटनेत पाकिस्तान सहभागी होता, त्या अमेरीकेबाबत फारसे भाष्य करण्यात आले नाही, जे आश्चर्यकारक आहे.
 पाकिस्तान आपल्या देशाला अस्थिर करण्यासाठी आसुसलेला देश आहे. या देशाबरोबर आपण मोठी सिमा शेअर करतो. आपले त्या देशाबरोबर 4युद्धे (1948, 1965, 1971, 1998) झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे बदल महत्तावचे आहेत. हा लेख लिहीत असण्यापर्यत यावर भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?