महाविनाश !


निसर्गाची ताकद किती भयानक आहे ,याचे प्रत्यंतर शनिवारी पॅसिफिक  महासागरातील किंग्डम ऑफ टोंगा  छोट्याच्या देशात  झालेल्या  ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जगाने अनुभवले.  उपग्रहाने ही घटना चित्रीत केली आहे. त्यावरुन ही घटना किती भीषण होती हे समजते.आपण बिबिसी, आँस्टोलिया प्लस आदी वृत्तवाहिन्यांचा युट्यूब चँनेलवलर हे चित्रण बघू शकतात.ही घटना  होवून तीन दिवस झाले, मात्र त्या देशापर्यत मदत पोहचवण्यास अत्यंत अडचणी येत आहेत. त्या देशाला जगाला जोडणाऱ्या समुद्रातील इंटरनेटच्या केबल पुर्णतः तूटलेल्या आहेत.(जगातील सर्व नेट केबलच्या मार्फत चालते यास अपवाद  फक्त आपला मोबाईल ते नजीकचा टाँवर) ज्यामुळे हा देश पुर्णतः जगापासून तूटलेला आहे. या देशापासून भौगोलिक अंतराच्या विचार करता अत्यंत जवळचे देश असणाऱ्या आँस्टोलिया आणि न्युझीलंड या देशातुन त्या देशात मदत पोहचवण्यासाठी हेलीकाँप्टरची मदत पाठवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मात्र ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उडालेल्या राखेमुळे ते पोहचवण्यात अडचणी येत आहे. सँटेलाईट फोनमार्फत त्यांच्याशी तूटक संवाद सुरु आहे. मी भौगोलिक नजीकचे म्हणून ज्या देशाच्या  उल्लेख केला आहे,  ते आँस्टोलिया आणि न्युझीलंड हे देश या किंग्डम आँफ टांगोपासून 1200 ते 1500 किमी दूर आहे. या
दोघांच्या मध्ये आहे पँसिफिक महासागर . यामुळे आँस्टोलियाचा पुर्व किनारा ते उत्तर अमेरीकेचा पश्चिम किनारा जपान या भागात  त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरीका या देशाच्या भुगर्भ तज्ज्ञांच्या मते सात रिक्टर स्केलच्या भुकंपातून बाहेर पडते, इतकी उर्जा या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडली आहे.  या देशातील संदेश यंत्रणा कोलमडल्यामुळे सँटेलाईट फोनच्या माध्यमातून जो थोडाफार संवाद होत आहे, त्यानुसार 1लाख 60 हजार लोकसंख्या असलेल्या या देशात फारसे मृत्यू झालेले नाहीत. मात्र ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तेथील पाण्याचे साठे मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाले आहेत. हा देश जगातील सर्वाधिक जागृत ज्वालामुखी असणाऱ्या फायर आँफ रींग या भागात येतो. त्यामुळे त्या भागात ज्वालामुखी फुटणे नविन नाही. मात्र शनिवारी 15 जानेवारीला ज्या तीव्रतेने तो फुटला ते काळजीचे आहे. जो ज्वालामुखी 15 जानेवारीला फुटला त्या छोट्या स्वरुपात 26डिसेंबर 2021 ते 11जानेवारी 2022पर्यत धगधगत होता.जो शांत झाल्याचे 11जानेवारीला जाहिर करण्यात आले होते. मात्र 15 जानेवारीला त्याने आपले रंग दाखवले 
      गेल्या काही महिन्याचा आढावा घेतल्यास जगात ज्वालामुखी फुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मागील वर्षी आईसलँंड मधील ज्वालामुखी बरेच दिवस धगधगत  होता. या घटना  भुकवच अती सक्रीय होत असल्याचे स्पष्ट करत आहेत. भारतात निकोबार बेटसमुद्रात बेराँन आयलंड हा एकमेव  जागृत ज्वालामुखी असला तरी भारताच्या उत्तर भागाला भुकंपाचा खुप मोठा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण तयार राहयला हवे. जर भुकंप झालाच तर
काय करावे? काय करु नये याचे प्रशीक्षण वर्ग किमान उत्तर भारतात सातत्याने करणे अत्यावश्यक आहे.
नैसर्गिक संकटामध्ये सगळ्यात बेभरवस्याची घटना म्हणून भुकंप आणि ज्वालामुखी यांच्याकडे बघता येवू शकते. आपण ते कधी घडेल , हे सांगू शकत नाही. मात्र ते कुठे घडण्याची शक्यता आहे, हे प्रदेश ओळखू शकतो. ज्याप्रमाणे या घटना कधी घडतील? हे सांगू शकत नाही त्याप्रमाणे आपण त्या घटना किती शक्तीशाली घडतील याचे फक्त अंदाज बांधू शकतो.काही भुगर्भ तज्ज्ञांचा मते शनिवारी झालेला ज्वालामुखी उद्रेक त्या भागातील माहिती असलेल्या इतिहासातील सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक होता. ज्यामुळे काँमनवेल्थ मध्ये भारताचा सहकारी असलेला हा देश पुर्णतः कोलमडला आहे, हे wion  News, आँस्टोलियन सरकारची मालकी असणाऱ्या आँस्टोलिया प्लस आदी न्युजचँनलने दिलेल्या बातमीतून स्पष्ट होत आहे.देव करो अन असे संकट कोणावरही येवू नये. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?