महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले

         


    आपल्या भारतात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत .त्यातील एक राज्य म्हणजे महाराष्ट्र होय, महाराष्ट्र्राने देशाच्या विकासात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे,  हे सांगायचे कारण म्हणजे,  १ जानेवारी रोजी  केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ या महिन्यातील जीएसटीच्या संकलनाचेजाहीर केलेले आकडे . गेल्या महिन्यात पूर्ण देशभरातून १ लाख २९ हजार ७८० कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले तर ज्या मध्ये  महाराष्ट्राचा वाटा आहे १९ हजार ५२९ कोटींचा . देशाच्या जीएसटी संकलनास जर १०० टक्के समजले तर महाराष्ट्राच्या वाटा जवळपास १६% होतो.  १६ च्या सव्वासहा पट म्हणजे १०० होते.  थोडक्यात पूर्ण देशाच्या एकष्ठांश वाटा हा महाराष्ट्राकडून
देशाच्या तिजोरीत गेला  महाराष्ट्राचे अर्थकारण कोव्हिड १९ च्या धक्यातून पूर्णपणे बाहेर आलेले असून वेगाने पुढे जात आहे हेच यातून दिसत आहे    गेल्या काही महिन्याचा विचार करता, महाराष्ट्र सातत्याने जीएसटी संकलनात सातत्याने क्रमांक एकाचाच राहिला आहे ज्याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून आपणास अभिमान वाटलंच पाहिजे

 राष्ट्रीय पातळीवरचा विचार करता देशभरातील जीएसटी संकलांत नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात काहीशी घट झाली आहे मात्र महाराष्ट्रात याच्या उलट स्थिती आहे.  नोव्हेंबरच्या तुलनेत महाराष्ट्राचे जीएसटी संकलन डिसेंबर महिन्यात ५% वाढले आहे सणासुदीचा काळ नसतानाही आधीच्या महिन्याच्या तुलनेत झालेली वाढ ही राज्याच्या दृष्टीने चांगली निदर्शक असल्याचे आर्थिक तंज्ञानकडून सांगण्यात आले आहे . एप्रिल २०२१ पासूनचा विचार करता डिसेंबर महिन्यातील कर संकलनातील वाढ ही दुसरी मासिक कर संकलनवाढ आहे डिसेंबर २०२० मधील महाराष्ट्रातील जीएसटी संकलनाचा विचार करता डिसेंबर २०२१ या महिन्यातील जीएसटी संकलन ११ टाक्याने  अधिक आहे डिसेंबर २०२० मधील महाराष्ट्रातील जीएसटी संकलन १७ हजार ६९९ कोटी रुपायाचें झाले होते महाराष्ट्रच्या शासनावर टीका करणाऱ्यांवर हे आकडे पुरेसे बोलके आहेत असे म्हणायला हरकत नसावी 

महाराष्ट्राने देशाच्या प्रगतीत नेहमीच मोठे योगदान दिले आहे . महिलांना स्थानिक  स्वराज्य संस्थेत ३३ % आरक्षण देणे , माहितीच्या अधिकाराची देशात सर्वप्रथम अंमलबाजवणी करणे देशाच्या लष्करासाठी स्वतःच्या परिवहन महामंडळाकडून दोन बसेस अत्यंत कमी विक्रमी वेळेत बांधून देणे (१९६२ आणि १९६५ च्या युद्धात आपल्या एसटीने बांधलेली बस लष्कराने वापरली होती ) खाजगी क्षेत्राची मदत घेऊन देशाला अनेक अभियंते आणि डॉक्टर देणे , आदी अनेक गोष्टीतून महारष्ट्राने देशाच्या योगदान दिले आहे सध्याचे योगदान देखील याच परंपरेतील आहे   महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले  असे आपल्याकडे म्हंटले जाते त्याचेच प्रत्यंतर आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये त्याचा एका महाराष्ट्रीयन म्हणून आपणस अभिमान वाटलाच पाहिजे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?