पाकिस्तानची वाटचाल कुठे चाललीये ?

   

   पाकिस्तानची  वाटचाल कुठे चाललीये ?  अश्या घटना सध्या पाकिस्तानात घडत आहेत.ग्वादर या बंदरावर चीनी दादागिरीबाबत महिन्याहुन अधिक काळ आंदोलन सुरु होते.ते शांत होते ना होतेच तोच, 20 जानेवारी 2022 या दिवशी पाकिस्तानमधील दुसरे मोठे शहर, जे पाकिस्तानमधील सर्वात प्रभावशाली प्रांत असणाऱ्या पंजाब प्रांताची राजधानी आहे, आणि पाकिस्तानातील एकमेव मेट्रो सर्व्हिस ज्या शहरात सुरु आहे, जे शहर भगवान श्रीराम यांच्या मुलगा लव यांनी वसवले असी मान्यता आहे, त्या लाहोरमध्ये  बाँम्बस्फोट झाला.ज्याची जवाबदारी बलूचिस्तान नँशलिस्ट आर्मी या संघटनेने त्यांचा टेलीग्राम अकाउंटद्वारे घेतली आहे. ही संघटना बलूचीस्थानचा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या चार प्रमुख  संघटनांपैकी असणाऱ्या युनाटेड बलूच आर्मी, आणि बलूच रिपब्लिकन आर्मी या दोन संघटनांचा एकत्रीकरणातून जन्माला आलेली संघटना आहे. या दोन संघटनांमध्ये बलूच रिपब्लिकन आर्मी ही संघटना तीच्या हिंसक कारवायांसाठी प्रसिद्ध आहे.  या दोन संघटनांनंतर बलूच  लिबरेशन फ्रंट आणि बलूचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटना बलुचीस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महत्तवाचा संघटना आहेत 
लाहोरचा तूळशी बाजार असे म्हणता येईल , अस्या अनारकली बाजार येथे स्फोट झाला.ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे .
       गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात एकही आंतरराष्टीय क्रिकेट सामना झालेला नाही. श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाल्यावर बऱ्याच वर्षांनी न्युझीलंड त्यांचा देशात खेळायला आला असताना दौरा अर्धवट टाकून निघून गेला वल्ड कप उत्तम कामगिरी केल्यामुळे इंग्लड आणि आँस्टोलिया तिथे दौऱ्यावर येणार होते.तसेच आय पि एल च्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तर्फे आयोजीत करण्यात येणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग मध्ये या वर्षी सर्वाधिक 21 आंतरराष्ट्रीय खेळाडू (हे खेळाडू पाकिस्तानचे नागरिक नाही, म्हणून आंतरराष्ट्रीय, त्यांचा त्यांचा देशात यातील बहुसंख्य  खेळाडुंचा दर्जा आपल्या येथील क्लब क्रिकेट सारख्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूं इतकाच आहे) खेळणार आहेत. त्याला या स्फोटामुळे काहीसा धक्का बसला आहे.
      बलूचीस्थान पाकिस्ताचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा, सुमारे50% पाकिस्तानचे क्षेत्रफळ असणारा प्रांत आहे. मात्र लोकसंख्या खुपच कमी म्हणजे पाकिस्तानच्या एकुण लोकसंख्येचा 10%हुन कमी लोकसंख्या इथे राहते. हा प्रांत नैसर्गिक संसाधने जसे खनिजे, नैसर्गिक इंधनांनी समृद्ध प्रांत आहे. तेथील जनतेनूसार पाकिस्तानी लष्कर त्यांच्यावर पाशवी अत्याचार करते. तेथील नैसर्गिक संसाधनाच्या आधारे पाकिस्तानच्या इतर भागाचा प्रचंड विकास होतो, मात्र या भागाला जाणीवपूर्वक सापत्न वागणूक देते, बलुचिस्तान मधील जनतेला जाणीवपूर्वक त्यांचाच जमिनीत असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यापासून रोखले जाते.जे अर्थात पाकिस्तानी सरकारने आणि लष्कराने पुर्णतः नाकारले आहेत.
             भारत ,पाकिस्तान स्वतंत्र होताना बलूचीस्तान देखील स्वतंत्र देश म्हणून स्वतंत्र झाले होते मार्च 1948साली पाकिस्तानी लष्कराने बलूचीस्तानवर आक्रमक करुन तेथील प्रमुख संस्थानिक असणाऱ्या ज्याचे मांडलिकत्व इतर बलूचिस्तानी संस्थानिकांनी स्विकारले होते.त्या सुलतान ए कतल च्या संस्थानिकांस कराचीमध्ये आणून जबरदस्तीने सामिलीकरणावर सह्या करुन बलूचिस्तान पाकिस्तानचा भाग बनले ते सामिलीकरण दबाव टाकून झाले असल्याने
बलूचीस्थान स्वतंत्र झाले पाहिजे ,या मागणीचा समर्थनासाठी पाकिस्तानात अनेक वेळा आंदोलने हिंसक कारवाया या आधी झाल्या आहेत. काही महिन्यापूर्वी कराची स्टाँक एक्सेंजवर या मागणीसाठी दहतवादी हल्ला झाला होता.
   भारताची बलूचीस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अनकुलता दाखवली आहे. नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात बलूचीस्थान स्वातंत्र्य योद्धाचा  गौरव केला असल्याचे आपणास माहिती असेलच. त्या पार्श्वभूमीवर बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी झालेले हे स्फोट आपण बघायला हवे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?