पाकिस्तानचा पाय खोलात!

       

  एखाद्याचा पाय खड्ड्यात जायला लागला तर एका पायाबरोबर दुसराही पाय खड्ड्यात जायला लागतो, असे म्हणतात.आपल्या भारताचा पश्चिमेकडील शत्रू अर्थात पाकिस्तानला ही स्थिती तंतोतत लागू होण्याची स्थिती निर्माण झाली तर नाहीना? अस्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . या घडामोडींचा परीणाम भारतावर देखील होणार असल्याने त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन .
     तर मित्रांनो, ट्रान्सफरन्सी इंटरनँशनल या संस्थेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या करपसन परस्पेशन इंडेक्स द्वारा पाकिस्तानात मागील काही वर्षांत भष्ट्राचार प्रचंड वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यामुळे समाजमाध्यमांमध्ये पाकिस्तानाचा पंतप्रधान इम्रान खान याचा विरोधात टिकेचा सुर उमटत आहे. याच संस्थेचा  याच इंडेक्सचा विचार करता इम्रान खान सत्तेत येण्या आधी स्थान 116 होते जे आता 140 पर्यत घसरले आहे. सर्वात कमी भष्ट्राचारी देशास एक क्रमांक तर सर्वात भष्ट्राचारी देशास शेवटचा क्रमांक या पद्धतीने आपण याकडे बघायला हवे.इम्रान खान पाकिस्तानातील भष्ट्राचार कमी करण्याचे आमिष दाखवत सत्तेत आले होते.जे फोल गेलेले दिसत आहे. ज्यामुळे त्यांची उचलबांगडी करावी, असा एक मतप्रवाह पाकिस्तानात आहे. जो मोठ्या प्रमाणावर
शक्तीशाली असल्याचे इम्रान खान याचा विविध वक्तव्यांवरुन दिसून येत आहे. ज्याप्रमाणे घाबरलेला व्यक्ती तो घाबरलेला नाही, हे दाखवण्यासाठी उसने अवसान आणून वक्तव्य करतो, त्याचप्रमाणे मला पदावरुन काढल्यास मी याहून कडक कारवाई करणार.पदावरुन काढणाऱ्यास जनता चोख उत्तर देइलच,असी विधाने इम्रान खान करत आहे  पाकिस्तान मधील ही राजकीय अस्थिरता भारताला परवडणारी नाही. भारतात दहशतवादी कारवाया न होण्यासाठी पाकिस्तानात राजकीय स्थैर्य आवश्यक आहे. सबब पाकिस्तानमधील भष्ट्राचाराचा मुद्द्यावरून सुरु झालेले हे राजकारण कोणत्या वळणावर जाते,हे बघणे अत्यावश्यक आहे
       पाकिस्तानातील भष्ट्राचाराची गोष्ट कमी का म्हणून,पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसोंदिवस गाळात चालली आहे. पाकिस्तान एक कर्ज फेडण्यास दुसरे कर्ज घेत आहे. नुकतेच जगात इतर कोणीही कर्ज देत नसल्याने, स्वतःच्या सरकारचे कर्जरोखे काढले आहेत. लोकांना ते घेण्यासारखे वाटावे,यासाठी त्यास इस्लामिक रोखे म्हटले आहे( भारत सरकार ही कर्जरोखे काढतो मात्र त्यास आयटी रोखे, इन्फास्टक्चर रोखे असे नाव असते) मात्र तरी देखील त्यास फारसा प्रतीसाद मिळत नाही. जगातील अनेक  सरकारे देखील कर्ज रोख काढतात,त्याचा व्याजदर तीन ते चार फारतर साडेचार टक्के असतो. तर पाकिस्तानच्या या कर्जरोख्याचा दर तब्बल 7पुर्णांक 95शतांश 
इतका प्रचंड आहे.जगभरातील विविध सरकारे, आर्थिक गुंतवणूक याचे पतमांनांकन करणाऱ्या मुडी गुंतवणूक सल्लागार संस्थेने  या कर्जरोख्यांचे पतमांनांकन धोकादायक या श्रेणीत केले आहे.या कर्जरोख्यासाठी लाहोर ते मुलतान हा एक्सप्रेस हायवे पाकिस्तान सरकारने तारण ठेवला आहे. जर कदाचित पाकिस्तान या कर्जरोख्याचे देणे चूकवू शकला नाही,तर कर्जरोखे घेणाऱ्या संस्थांचा व्यक्तींचा मालकीचा हा एक्स्प्रेस हायवे होईल.देशाच्या गाडा हाकण्यासाठी चीनसारखे अत्यंत मोजके पर्याय पाकिस्तान कडे आहे. त्यामुळे पाकिस्तान यातून कसा मार्ग काढतो?हे बघण्यासाखे आहे.
पाकिस्तानचा पाय "बुडत्याचा पाय खोलात"या म्हणीप्रमाणेच वाटचाल करत असल्याचे या घडामोडींतून स्पष्ट होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?