भारतात राज्यांची संख्या एकने वाढणार ?

 

     भारतात राज्यांची संख्या एकने वाढणार  का ? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे ?आणि याला कारणीभूत ठरली आहे, पडुचेरी  या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी एन रंगास्वामी यांनी केंद्राकडे पडुचेरी ला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी केलेली मागणी.  जर ही मागणी पूर्ण झाल्यास पडुचेरी  देशातील सर्वात छोटे राज्य होईल हा मजकूर लिहीत असतानां गोवा हे देशातील सर्वात छोटे राज्य आहे ते क्षेत्रफळाच्या विचार करता दुसरे छोटे राज्य होईल ध्या पडुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात येत आहे 
     पडुचेरी  देशातील दोन फ्रेंच वसाहतीपैकी एक ,. भारत स्वतंत्र झाल्यावर भारतात फ्रान्सच्या अधिपत्याखाली पडुचेरी आणि चंद्रनगर या दोन वसाहती होत्या.  त्यातील चंद्रनगर या वसाहतीला पश्चिम बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आले  तर दुसऱ्या वसाहतीला अर्थात पडुचेरीला केंद्रशासित प्रदेशाच्या दर्जा देण्यात आला होता . जो आता पूर्ण राज्य करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे   भारतात सध्या ८ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यातील तीन केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहेत त्यातील एक म्हणजे पडुचेरी होय ( अन्य दोन केंद्रशासित प्रदेश जिथे विधानसभा आहेत तो म्हणजे दिल्ली  आणि जमू काश्मीर [ लडाख या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा असावी अशी एक आग्रही भूमिका सध्या मांडण्यात येत आहे ] ) पडुचेरीया केंद्रशासित प्रदेशाच्या भूभाग खंडित स्वरूपात तीन राज्यात विखुरला आहे .तीन बाजूने आंध्र प्रदेश बरोबर तर पूर्व बाजूला बंगालचा
उपसागर असणारा यानम , तीन बाजूने केरळ राज्याने वेढलेला तसेच पश्चिम बाजूला अरबी समुद्र असणारा  आणि भारतातील सर्वात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा माहे , तसेच तीन बाजूला तामिळनाडू हे राज्य आणि पूर्व बाजूला बंगालचा उपसागर असणारे करैकन्नल आणि पडुचेरी हे दोन भाग मिळून   पडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश होतो ,या अंतराच्या विचार करता करैकन्नल आणि पडुचेरी हे दोन भाग एकमेकांच्या अत्यंत जवळ आहे  १९५४ मध्ये भारतीय प्रशासनस व्यवस्थेखाली आलेला तर १९६२ साली पूर्णपणे भारतीय नियंत्रणात आलेला प्रदेश म्हणजे     पडुचेरी सुरवातीला फ्रांस नंतर डच नंतर परत फ्रांस नंतर ब्रिटिश पुन्हा एकदा फ्रांस त्यानंतर पुन्हा एकदा फ्रांस या नंतर पुन्हा एकदा ब्रिटिश आणि सरतेशेवटी फ्रांस या युरोपीय सत्ताधीशांकडे ताबा असणारा फ्रेंच स्थापत्य शैली असणारा भारतीय प्रदेश म्हणजे   पडुचेरी
           पडुचेरी  हे पूर्ण राज्य झाल्यास तेथील लोकांनी निवडलेले राज्य सरकार त्या प्रदेशाची त्यांना हवी तशी पुर्नरचना करू शकते सध्या तो केंद्रशासित प्रदेश असल्याने तो अधिकार पूर्णपणे केंद्राला आहे पूर्ण राज्याचे केंद्राबरोबरचे संबंध हे सांघिक स्तरावचे असतात .संविधानानुसार राज्य आणि संवर्तीसूचीतील विषयावर राज्याची विधानसभा कायदे करू शकते केंद्रशासित राज्यात तो अधिकार पूर्णतःकेंद्राला असतो राज्याला स्वतःचा प्रदेश्यात पूर्णतः अधिसत्ता असते जी केंद्रशासित प्रदेशाला नसते .  पडुचेरी पूर्ण राज्य झाल्यास तेथील विधिमंडळाला हे अधिकार प्राप्त होतील  याशिवाय मुखमंत्री हा कार्यकारी प्रमुख बनणे जोअधिकर  सध्या पडुचेरी केंद्रशासित प्रदेश असल्याने केंद्राकडून नियुक्त अधिकाऱ्यांकडे आहे राज्याचा प्रमुख राज्यपाल असतो तर केंद्रशासित प्रदेशाचा प्रमुख नायब राज्यपाल असतो     पडुचेरी पूर्ण राज्य झाल्यास हेही बदल होतील
 आपल्या संविधानाच्या कलम तीन आणि चार नुसार विहित केलेली प्रक्रिया करून हे नवे राज्य उदयास येईल 
      पडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश खर्च पूर्ण राज्य बनू शकेल ? की ही मागणी फक्त निवडणुकीसंदर्भातच राहील हे बघणे उत्सुकतेचे ठरेल 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?