मध्य आशिया आणि भारत सहकाऱ्यांचा नवा सेतू

         

            मध्य आशिया  भागातील किरिगिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान तझकिस्तान किर्गिस्तान या पाच मुस्लिम बांधांवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या देशांशी भारताचे पूर्वापार संबंध आहेत  युरोपाशी जमिनीच्या मार्गावरून व्यापार करण्याच्या मार्गातील अत्यंत मोक्याच्या स्थानी हे देश वसले आहेत सिल्क रूट या नावाने हा मार्ग परिचित होता या मार्गाने आपल्या भारतावर अनेक आक्रमक सुद्धा आले भारतातील मुघल घराण्याचा संस्थापक बाबर या  देशातील उझबेकिस्तान या देशातील समरकंद या भागातील मुळचा  रहिवाशी होता स्वतंत्र भारताचे भारताचे दुसरेपूर्णवेळ पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर  याच भागातील उझबेकिस्तान या देशाच्या राजधानीच्या तास्कंद या शहरात करारासाठी गेला असता संशयास्पद दुर्दैवी मृत्यू झाला  १९१ साली युनाटेड सेव्हियात सोशालिस्ट रशिया विसर्जीत झाल्यावर मधल्या काही काळात मात्र आपला त्यांच्याशी असणारा संपर्क तुटला  
      पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यावर २०१५पासून भारत या भूभागाकडे नव्याने लक्ष देऊ लागला पंतप्रधान मोदी यांनी २०१५ साली या सर्व देशांच्या दौरा करून संबंधात असलेला मळभ दूर केला पुढे २०१८ साली या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत आपल्या भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पहिली मध्य आशिया भारत समिट केली त्यानंतर हि परिषद दुसऱ्यांदा २०२० ऑक्टोबर रोजी झाली तर तिसऱ्यांदा नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली तिसऱ्या  ध्य आशिया भारत समिट च्या वेळी परराष्ट्र मंत्र्यांबरोबर परराष्ट्र सचिवांनी देखील समिट मध्ये सहभाग नोंदवला २०२२ च्या 

प्रजासत्ताक मध्ये या देशांचे राष्ट्रप्रमुख विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते मात्र कोव्हीड १९ च्या उद्रेकामुळे हे आता येणार नाहीत मात्र त्याच्या पुढच्या दिवशी अर्थात २७ जानेवारी रोजी या पाचही देशांच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत भारताच्या पंतप्रधांनी एकाच वेळी पाच मध्य आशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे 

       हा भूभाग नैसर्गिक संसाधनी खूपच समृद्ध आहे भारत सध्या नैसर्गिक संसाधनांसाठी मोठ्या प्रमाणात  पश्चिम आशिया भागातील देशांवर अवलूंबून आहे त्याला पर्याय म्हणून या देशांकडे बघता येईल  तसेच या देशांबरोबर , मोठ्या प्रमाणात व्यापाराच्या  संधी आहेत . याच देशाच्या मधील ताजिकीस्तान या देशाबरोबर भारताची  गेल्या कित्येक वर्षांपासून पाईपलाईन मार्गे  अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबाबत बोलणी सुरु आहेत  भारताच्या हवाई दलाचा  भारताबाहेरील एकमवे हवाई तळ याच देशात आहेत त्या पार्श्वभूमीवर ही बोलणी महत्त्वाची आहेत या बाबत  भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर या बाबत सांगितल्याप्रमाणे अफगाणिस्तानमधील शांतता वामान बदल सारख्या  जागतिक समस्या प्रदेशाचा विकास या विषयांवर या समिट मध्ये बोलणी होण्याची शक्यता आहे 
 भारत जगाचे नेर्तृत्व करण्यास सज्ज करण्यास तयार झाला आहे हेच या यातून दिसत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?