या बदलांना सामोरे जाण्यास आपण तयार आहोत का ?

   

        जानेवारीच्या या पहिल्या आठवड्यात जगभरात काय चालू आहे ? याचा आढावा घेतल्यास कोव्हीड १९ पेक्षा अधिक लोक हवमानाच्या लहरीपणामुळे  त्रस्त झाल्याचे आपणास दिसून येईल .  आग्नेय आशिया,  युएसए  ऊत्तर भारत आदी जगभरातील विविध प्रदेश या लहरी हवामानाचा प्रकोप सध्या झेलत आहेत आपल्या महाराष्ट्रात एव्हढे लहरी हवामान अद्यापतरी दिसत नसले तरी,  कधीना कधी आपणास आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सुद्धा याचा सामना करायला लागणारच आहे त्यासाठी आपण आतापासून तयारी करायला हवी त्याठिकाणी मात्र आनंदी आनंदच सध्या दिसतोय. 
           यूएसएच्या आग्नेय दिशेतील राज्य, अटलांटिक किनाऱ्याच्या विचार करता मध्यातील राज्य सध्या प्रचंड कडक अश्या थंडीच्या सामना करत आहे . याथंडीमुळे तेथील प्रशासनने शाळा महाविद्यलये बंद ठेवली आहेत  अमेरिकेसारखी जगातील महासत्ता असून देखील अनेक नागरिक विद्युत पुरवठ्यापासून वंचित आहेत जागोजागी हिमवर्षावामुळे मोठ्या प्रमाणत बर्फ साठले आहे अमेरिकेत जागोजागी हिमवादळे होत आहेत त्यामुळे तेथील जनजीवन मोठ्या प्रमाणत प्रभावित झाले आहे एकीकडे अमेरिकेत हिमवर्षावाने तेथील प्रशासनने निसर्गापुढे गुढघे टेकले असतांना आग्नेय आशियातील मलेशिया आणि इंडोनेशिया या देशात पावसाने हाहाकार उडवला आहे त्याठिकाणी पडलेल्या पावसामुळे मोठे पूर आलेले आहेत ज्यामुळे काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत मालमत्तेचे किती नुकसान झाले आहे? याचे पंचनामे अजून सुरु आहेत त्यामुळे निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नसला तरी WION NEWS ,BBC,  चॅनल न्यूज एशिया आदी माध्यमातून  समोर आलेल्या बातम्यांधून तिथे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे अमेरिकेत अद्याप हिमवर्षावामुळे बळीची बातमी आलेली नसली तरी तेथील जनजीवन प्रचंड प्रमाणत विस्कळीत झाले आहे वाईट हवामानामुळे अनेक विमाने रद्द करण्यात आल्याने किंवा उशिरा उड्डाण करत असल्याने लाखो विमान प्रवाशी आपल्या विमानाची वाट बघत विमानतळावर तिष्ठत
बसले आहेत .असे बातम्यातून दिसत आहे यापूर्वी एव्हढया मोठ्या प्रमाणात विमाने रद्द झाली नव्हती अमेरिकेच्या एका बाजूला हे संकट असतांना अमेरिकेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर अर्थात पॅसिफिक कोस्टवर प्रचंड मोठा वणवा पेटलेला आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणत लोकांच्या मालमतेचे नुकसान झाले आहे 
        आपल्या भारतात देखील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आदीप्रदेशात अनेक ठिकाणी तापमान उणे अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे ऊत्तर भारतात असणाऱ्या निवडणूकींमुळे अद्याप तिथे बळी गेल्याची बातमी आलेली नसली तरी गेल्या काही वर्षाचा इतिहास बघतातिथे काही बळी गेलेच आहेत हे नक्की गेल्या हवामानाच्या गेल्या काही वर्षातील हवामानाचा लहरीपणा बघता आपणास सातत्याने हिवाळ्यात हाडे गोठवणारी अतिशय कड्कक्याची थंडी आणि उन्हाळ्यत अंगाची लाहीलाही करणारे कड ऊन याचा सामना करतोय मात्र आपल्याकडे अजून हा मुदा राजकीय अजेंड्यावर आलेला नाही विविध धर्मातील वाद विवाद यावरच आपल्याकडे निवडणुका लढवल्या जात आहेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे या पेक्षा मोठे दुर्दैव ते काय 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?