भारतीय रेल्वे बदलतीये !...

     


  आपली भारतीय रेल्वे झपाट्याने बदलत आहे. येत्या काही वर्षात आपण बघीतलेली भारतीय रेल्वे ती हीच का? असा प्रश्न पडावा असे बदल भारतीय रेल्वेत होत आहेत. सगळ्या भारताच्या परीवहन व्यवस्थेचा कणा म्हणून भारतीय रेल्वे ओळखली जाते .आज 2022मध्ये देखील विमान प्रवास सर्वसामान्य भारतीयांंचा पुर्णतः अंगवळणी पडलेला नाही. तर अस्या भारतीय रेल्वेत येत्या वर्ष दीड वर्षात होणारे बदल बघूया 

1)100% विद्यूतीकरण : भारतीय रेल्वेतून कर्बवायूचे उत्सर्जन शुन्य व्हावे.भारतीय रेल्वे पुर्णतः प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी भारतीय रेल्वे प्रकाश्याला लाजवेल या वेगाने आपल्या डिझेल इंजिनावर चालणाऱ्या मार्गाचे विद्युतीकरण करत आहे रेल्वेच्या अंदाजानुसार डिसेंबर 23 पर्यत रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण होईल. आजमितीस 75%पेक्षा अधिक रेल्वे विद्युत इंजिनावर धावत आहे विद्यूतीकरण व्हावे यासाठी इशान्य भारतात रेल्वे विशेष प्रयत्न करत आहे. रेल्वेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपण त्याची प्रगती बघू शकतो.

2) डेडीकेडेट फ्रेड काँरीडाँर : भारतीय रेल्वेच्या महसुलातील खुप मोठा हिस्सा माल वाहतूकीचा आहे. मात्र रेल्वेचा जाळ्यात महसुलाची कमी भर घालत असून मोठा वाटा प्रवाशी सेवा व्यापते.परीणामी मालवाहतूकीला अडथळा निर्माण होतो.ही अडचण लक्षात घेवून भारतीय रेल्वेकडुन माल वाहतूकीसाठी स्वतंत्र मार्ग उभारण्यात येत

आहे.असे एकुण 5 मार्ग उभारण्यात येणार आहेत.त्यातील दोन प्रमुख मार्ग असणाऱ्या इस्टन डेडीकेडेट फ्रेड काँरीडाँर , आणि वेस्टर्न डेडीकेडेट काँरीडाँर जून 2023पर्यत पुर्णतः वापरण्यास सुरवात होणार आहे.

3) वंदे भारत एक्सप्रेस:  : भारतात फिरायला येणाऱ्या परदेशी व्यक्तींना, तसेच अधिक खर्च करु शकत असणाऱ्या भारतीयांना नेहमीपेक्षा आरामदायी, वेगवान सेवा पुरवण्यात यावी, या हेतूने अत्याधुनिक सोई सवलतींनी परीपुर्ण असणारी वंदे भारत सेवा पुरवण्यास भारतीय रेल्वेने सुरवात केली आहे. आज कटरा( माता वैष्णोदेवी मंदिर) ते नवी दिल्ली आणि वाराणशी ते नवी दिल्ली या दोन मार्गावर ही सेवा पुरवण्यात येते .येत्या सहा महिन्यात या मध्ये आणखी एका मार्गाची भर पडणार आहे 

4)अपघातात कमी हानी होणाऱ्या एल एचबी डब्यातून प्रवाशी वाहतूक : अपघातात एकमेकांवर न येता बाजुला पडणाऱ्या, (डब्बे एकमेकांवर येत असल्याने अपघातात जास्त प्राणहानी होते)प्रवाश्या दरम्यान प्रवाश्यांना कमी धक्के देणारे डब्बे म्हणून एल एचबी डब्बे परीचित आहेत.हे डब्बे आपण लाल रंगात बघू शकतो.सध्या जे आपण इंट्रिगेड कोच फँक्टरी (आय सि एफ कोच म्हणून परीचित)चे निळ्या रंगाचे डब्बे बघतो ते बदलून संपूर्ण भारतीय रेल्वे एल एच बी करण्याचे भारतीय रेल्वेचे नियोजन आहे.

5)रेल्वेचा वेग वाढवणे: भारतीय रेल्वे विस्तारामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर असली, तरी वेगाच्या बाबत खुपच मागे आहे. हा कलंक पुसण्यासाठी भारतीय रेल्वेने कंबर कसली आहे.त्याचाच एक भाग म्हणून जनरल डब्बे सुद्धा एसी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता जनरल डब्यात उघड्या खिडक्या असतात.ज्यातून हवा आत बाहेर करत

असते.रेल्वे वेगाने चालवताना, भौतिकशास्त्राचा काही नियमानुसार या खिडक्या धोकादायक ठरू शकतात. तो धोका टाळण्यासाठी जनरल डब्बेसुद्धा एसी करावेत यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरु आहेत . महाराष्ट्रातील पुणे ते नाशिक आणि केरळमधील  त्रिवेंद्रम ते कसाराकोडू सारखे हाय स्पिड काँरीडाँर , मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन या सारखे प्रकल्प याचाच एक भाग आहे.

6)अत्याधुनिक रेल्वे स्टेशनची निर्मिती ; भारतीय रेल्वे स्थानके अस्वच्छतेची आगरे समजली जातात. हा कलंक पुसुन काढण्यासाठी सुमारे 100रेल्वेस्टेशन भारतीय रेल्वे पुन्हा नव्याने बांधून काढणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर मध्यप्रदेश मधील इंदोर ,ग्वाल्हेर , गुजरात मधील बडोदा, सुरत  या सारख्या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सवलती, हाँटेल, माँल, आदींची सोय असणार आहे.

एकंदरीत भारतीय रेल्वे पुर्णतः कात टाकत आहे. हेच खरे!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?