काझकिस्तान अशांततेच्या वळणावर

   


       इंधनाचे दर अचानक दुप्पट केले तर ? काय  होऊ शकते याचा अनुभव जग काझकिस्तानमध्ये घडणाऱ्या घटनांद्वारा सध्या घेत आहे . कझाकिस्तान देशातील सरकाने आपल्याकडील  महसुली आणि इतर जमा कमी आहे ,  लक्षात आल्याने लिक्विफाईड पेट्रलियम गॅस (  एल पी जी)  वरील सबसिडी कमी करत त्याचे भाव तब्बल दुप्पट केले .सरकारच्या या निर्णयामुळे तेथील जनमत अत्यंत प्रक्षुब्ध झाले .त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यांवर हिंसक आंदोलने केली देशाच्या राजधानीच्या शहराच्या महापौरांच्या कार्यालयाची तोडाफेड केली परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जात आहे हे बघून तेथील प्रास्तवित दरवाढ रद्द केली मात्र तेथील आंदोलक शांत झाले नाहीत परिस्थिती आपल्या नियंत्रणात आंही हे बघून आपल्या  मंत्रिमंडळासह तेथील पंतप्रधांनी आपला राजीनामा दिला आणि देशात आणीबाणी जाहीर केली अन्य देशांना मदतीची याचना केली ज्याला रशियाने सकरात्मक प्रतिसाद देत आपले संरक्षण दल त्या देशात मदतीसाठी पाठवले आहे .  देशातील पश्चिम आणि उत्तरेकडील भाग फुटीच्या उंबरठयावर उभा आहे.  या भागात शेजारील रशिया देशातील नागरिकांशी  साधर्म्य असणाऱ्या
नगरीकांची  वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने हा भाग कदाचित शेजारील  रशियात विलीन होऊ शकतो , अशी शक्यता आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ञ व्यक्त करत आहे या दाव्यासाठी ते रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी नुकतेच सेव्हियात सोशालिस्ट रशियाच्या पतनाच्या वर्धापनदिनी वॆलेल्या वक्तव्याचा आधार घेतला  आहे . 

 ज्या देशांच्या प्रमुख धर्म इस्लाम आहे अश्या देशांच्या यादीतील क्षेत्रफळाच्या विचार करता क्रमांक एकाचा मोठा देश म्हणजे कझाकिस्तान . जगातील मोठ्या देशांच्या यादीत अर्जेंटनापेक्षा  काहीसा लहान  क्षेत्रफळाने ९ व्या क्रमांकाचा मोठा देश म्हणजे काझकिस्तान . मध्य आशियातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समुद्ध असणाऱ्या  आणि ज्या देशांच्या नावात स्थान असा उल्लेख आहे अश्या ५ स्थानांपैकी सगळ्यात मोठा असणाऱ्या देशांपैकी एक म्हणजे कझाकिस्तान ज्या देशाच्या भूभाग आशिया आणियुरोप या दोन खंडात आहे अशा देश म्हणजे काझकिस्तान . ज्या देशाच्या राजधानीतून जगातील पहिला अग्निबाण चालवला गेला तो देश म्हणजे कझाकिस्तान भारताने २०२२ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ज्या ५ देशांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे त्यातील एक देश म्हणजे काझकिस्तान 

काझकिस्तानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात थंडी आहे ज्यात अजून वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत काझिकिस्तानमध्ये घर उबदार होण्यासाठी मोठया प्रमाणात एलपीजीचा वापर होतो ( एल पी जी आणि नैसर्गिक वायू या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एलपीजीमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन या वायूचा समावेश होतो तर नैसर्गिक वायूमध्ये प्रामुख्याने मिथेन या वायूचा समावेश होतो ) देशातील एलपीजीचा वापर लक्षात घेऊन काझकिस्तान सरकारकडून  त्याला मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्यात येत होती मात्र देशाची वित्तीय स्थिती लक्षात घेऊन ती कमी करून त्याचे दर खाजगी कंपन्यांना नियंत्रित करण्याचा निर्णय    घेण्यात आला या निर्णयामुळे देशात प्रचंड असंतोषत निर्माण झाला . ज्यामुळे देश फुटीपर्यंत पोहोचला . मुळात या देशातील नागरिकांमध्ये  अध्यक्षांविषयी असंतोष होता सन १९९२ ला सेव्हियत सोशालिस्ट रशियातून स्वतंत्र झाल्यावर २०१८ पर्यंत नूर सुलतान देशाचे अध्यक्ष  हे होते २०१८ साली त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यावर कासीम जोर्माट टाकायव देशाचे अध्यक्ष झाले मात्र ते नुर सुलतान यांचे काळ्ससूत्री बाहुले म्हणून ओळखले जातात अध्यक्षांच्या   लोकशाहीला हरताळ फासणाऱ्या अनेक निर्णयामुळे नागरिकांमध्ये आधीच असंतोष होता ज्याचे प्रकटीकरण या निर्णयामुळे झाले इतकेच .या देशात 

प्रचंड महागाई आहे. देशात भष्ट्राचार देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जनता आधीच या देशातील प्रशासनावर नाराज होती.त्याला स्फोट हहोण्यासाठी निमित्य हवे होते जे एलपीजेंच्या दरवाढीने दिले हा मजकूर लिहीत असतनाला इराक आणि सीरियातील व्हिडीओ दाखवून सरकारविरोधी दंगल भडकावली जात आहे असे कारण देत देशातील इंटरनेटची सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे  याकाझीकस्तानमधील आंदोलनकामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप रशियाकडून करण्यात येत आहे रशियाचा जागतिक स्तरावरील प्रभाव कमी करण्यासाठी रशियाचा प्रभाव असणाऱ्या रशियाचा शेजारील देशात जाणीवपूर्वक अशांतता निर्माण केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे मात्र अमेरिकेकडून परराष्ट्र सचिवांकडून अधिकृत स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळण्यात आले आहेत अमेरिकेला रशियाचा शेजारील देशात रशियाचा प्रभावाखाली असणाऱ्या देशात ढवळाढवळ करण्याची काही आवश्यकता नाही काझकिस्तानमधील आंदोलने हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेकडून देण्यात येत आहे 

मध्य आशियाला भारत गुंतवूकीचे हब म्हणून ओळखतो . युरोपच्या देशांशी जमिनीवरून व्यापार करण्याच्या मार्गातील महत्त्वाचे देश,  भारताची नैसर्गिक संसाधनासाठी आखाती देशाला पर्याय म्हणून महत्त्वाचे देश म्हणून भारत या मध्य आशियातील देशांकडे बघतो त्या देशातील एक प्रमुख देश असणाऱ्या काझकिस्तानमधील घडामोडींचे नाही म्हंटले तरी काहीसे परिणाम पडणार हे नक्की हे कमीत कमी पाडावेत अशी ईश्वराला प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो नमस्कार 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?