काळे गोरे सर्वत्र

       


  शाहरुख खान यांच्या एक चित्रपट आहे "माय नेम इज खान ....' . या चित्रपटात एक दृश्य आहे ज्यामध्ये दोन समाज घटकांमध्ये दंगल होते छोटा रिझवान(चित्रपटातील शाहरुख खानच्या पत्राचे नाव ) घाबरत घाबरत बाल्कनीतून बाहेर येतो तेव्हा तो  खाली उभा असणाऱ्या मोठ्या वयाच्या लोकांचे बोलणे ऐकतो " वो गंदे लोग है उनको काट देना चाहिये ! " वाक्याचा अर्थ न समजलेला रिझवान ते गुणगुणत आतमध्ये येतो तेव्हा रिझवानची आई त्याला तू हे काय बोलत आहेस ? असं काही नसत असे म्हणत त्याला कागदावर दोन मनुष्याची चित्रे काढायला सांगून त्याला यातील चांगला मनुष्य कोणता ? आणि वाईट मनुष्य कोणता ? असे विचारते .रिझवान गांगरून जातो . मग ती त्याला सांगते ते ज्याप्रमाणे आपल्या समाजात जशी काही माणसे तुझी चेष्टा करतात टर उडवतात तर काही जण तुझी काळजी घेतात तसेच त्यांच्यामध्येही आहेत ती वाईट माणसे आहेत हा गैरसमज डोक्यातून काढून टाकं , असं काही नसत रिझवानच्या आईने त्याला दिलेला हा सल्ला अत्यंत महत्त्वाच्या आहे सध्याच्या काळात याचे महत्व तर अजूनच वाढलेय आणि त्यास कारणीभूत ठरलंय . एका विशिष्ट समुदायाच्या महिलांच्या फोटोचे विद्रुपीकरण करत इंटरनेटवर ते प्रसिद्ध कारण्यावरून  काठावरच्या प्रौढ असणाऱ्या तिघांना केलेली अटक 

             या प्रकरणात अटक केलेल्या तिघांमध्ये दोन युवक आणि एक युवती आहेत या तिघांची वये २३ पेक्षा जास्त नाहीत त्याअर्थी ती काठावरची प्रौढ आहेत त्यांनी हे कृत्य एक विशिष्ट समाजाच्या द्वेषातून केले हा द्वेष त्यांना दुसऱ्या कोणीतरी शिकवला असेल ज्याने त्यांना हा द्वेष शिकवला तो आता आपली पोळी भाजून घेण्यासाठी दुसरे सावज शोधात असेल हे मात्र आता आयुष्यातील अत्यंत महत्वाची वर्षे तुरुंगात घालवतील त्या अर्थी त्यांच्या स्वतःची आणि पर्यायाने त्यांच्या कुटूंबियांची राख रांगोळी होईल.  रिझवानच्या आईने जसे लहान रिझवानला जसे योग्यरीत्या समजवले तसे या तिघांना समजवण्यात आले असते तर तीन कुटूंबियांना  मुलांच्या कर्तृत्वामुळे आंनद गगनात मावेनासा झाला असता आज चित्र त्याच्या पूर्णतः विरुद्ध आहे तारुण्याच्या जोशात काहीतरी भव्यदिव्य करण्याची उर्मी असते त्या उर्मिला योग्य वळण दिले तर जगाला हेवा वाटेल अशी कार्ये होतात . जगातील जवळपास सर्वच महापुरुषांनी आयुष्याच्या कोणत्या काळात भव्यदिव्य काम केले याचा आढावा घेतल्यास सध्या अटकेत असणाऱ्या तिघांच्य वयाशी साधर्म्य असते मात्र याच काळात जर चुकीचे वळण लागले तर आयुष्याची माती होण्यास वेळ लागत नाही 

मुबईवर हल्ला करणारा अजमल कसाब , किंवा डॉक्टर नरेंद्र  दाभोलकर यांची हत्या केली म्हणून अटकेत असणारे या सर्वांची हल्ला करतानाची वये हीच असल्याचे आपणस दिसते सध्याच्या एखाद्या गोष्टीच्या कट्टर समर्थनाचा किंवा विरोधाच्या काळात हा विवेक ठेवणे अत्यावश्यक आहे आपला भारत देश हा युवकांचा देश म्हणून समजला जातो आपण जे जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतो ते याच युवकांच्या जोरावर मात्र जर युवावर्ग जर अश्या रीतीने भरकटला तर भारताचे स्वप्न हे स्वप्नच राहील ते असे राहू नये  म्हणून त्यांना सारासार विवेक शिकवण्याची गरज आहे तरच या दुष्टचक्रातून आपली पिढी बाहेर राहू शकेल हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?