बुद्धिबळात शिस्तीचे महत्व (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग १ २)

         


   बुद्धिबळामध्ये एकाग्रता का आवश्यक असते ? ती कशी वाढवावी ? हे आपण मागच्या भागात बघितले या भागात आपण बुद्धिबपटूला यशस्वी होण्यासाठी बुद्धिबळपटूला शिस्त का आवश्यक असते ? ते बघूया . तसे बघता सर्वच यशस्वी लोकांच्या जीवनात एकाग्रतेबरोबर शिस्तही महत्त्वाची असते / शिस्तीबद्दल ज्येष्ठ क्रीडामानसशास्त्रज्ञ निवृत्त अय पी एस अधिकारी कै.  भीष्मराज बाम सरांनी यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले की , मोठेमोठे खेळाडू , कलाकार नेते या सर्व यशस्वी व्यक्तींना अंगात शिस्त मुरवली तरच यश आणि कीर्ती मिळवता येते . जर आपण कंटाळा केला तर प्रतिकूल परिस्थती आली की , आपण कमी पडू . आणि यश लांबेल अथवा मिळणार नाही हे माहिती असते . 

          बुद्धिबळाचा विचार करता बुद्धिबळाचा नियमित अभ्यास ना केल्याने अनेक अडचणी येतात अभ्य्साला देखील शिस्त असणे हे महत्त्वाचे आहे . बुद्धिबळाचा अभ्यास करताना काय अडचणी येतात आणि त्यावर अभ्यासाचा शिस्तीद्वारे कोणते उपाय योजता येतात हे बघूया 

१) ज्या वेळेस पर्याय असतील त्यावेळीस निर्णय घेता येत नाही . वेळ अधिक लागतो यावर आपण आपली 


मानसिकता बदलून नकारत्मक बाजूवर विचार करण्याची सिस्ट अंगी बाळगून मात करू शकतो करू शकतो 

२)सुरवातीच्या खेळीमध्ये जास्त वेळ जाणे विचार करण्यात जास्तीचा वेळ खर्च होणे या समस्येवर मात करण्यासाठी आपण आपल्या ओपनिंगवर जास्त अभ्यास करण्याची शिस्त अंगात मुरवून मात करू शकतो 

३)स्पर्धेला जाताना आत्मविश्वास ढळणे ज्यामुळे खेळताना सातत्याने विचार करण्यात वेळ वाया जाणे या समस्येवर आपण स्पर्धा असो अथवा नसो सातत्याने खेळाचा सराव करण्याची शिस्त अंगी भिनवून मात करू शकतो यामुळे आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल ज्यामुळे स्पर्धेत आपण सहजतेने आपल्या खेळाचे प्रदर्शन करू शकू 

४ ) विचार करण्याची अशास्त्रीय पद्धत या समस्येमुळे बुद्धिबळपटूला एका व्हेरिफिकेशनवरून दुसऱ्या व्हेरीफिकेशनचा अभ्यास करताना अधिकच वेळ द्यावा लागतो . आपल्या विचारांच्या पद्धतीत बदल करून पद्धत शास्त्रीय करण्याची शिस्त आपल्यात भिनवल्यास  आपण या समस्येवर मात करू शकतो 

५)मोठ्या व्हेरीफिकेशनचा अभ्यास करता येत नाही त्यामुळे जेव्हा खेळ गुंतागुंतीचा होतो त्यावेळी त्रास होणे या समस्येवर आपण सातत्याने रॅपिड चेसचा सराव केला पाहिजे रॅपिडचेसचा सर्व असल्यास आपणाची या समस्येतून सूटका होते 

६) वेळ वाचवण्यासाठी खेळी करायची गरज असताना अधिकचा वेळ लागणे ही स्थिती ज्यावेळेस एकाच खेळी करायची असते किंवा सुरवातीच्या खेळाच्या दरम्यान विशेषत्वाने जाणवते . या समस्येवर आपण व्यावहारिक दृष्टिकोन आत्मसात करून हरवू शकतो व्यावहारिक दृष्टिकोन अंगिकारला तर वेळेची बचत होते ज्यामुळे अंतिमतः हा दोष दूर होतो 

७)दिवासस्वप्न बघणे अन्य विचार जसे पूर्वीच्या घटना घरगुती समस्या आठवणे ज्याची परिणीती वेळ जाण्यात होते यासाठी खेळाची एकाग्रता वाढवणे सोईस्कर ठरते एकाग्रता कशी वाढवायची हे आपण ११ व्या भागात बघितले आहेच 

८) खेळताना चेस क्लॉक दाबण्यास विसरणे या समस्येवर सत्याने चेस क्लॉक वर खेळल्यास हा उपाय करता येतो 

मानसिक शिस्त अंगी भिनवताना पुढील गोष्टी कराव्यात 

१)आपल्या शरीराचे योग्य ते वजन ठेवणे 

२) नियमित सराव करणे आणि प्रक्षिक्षण घेणे 

३)व्यायामाला आपल्या दिनचर्येचा भाग करणे 

४)संतुलित जीवनप्रणाली अंगीकारणे 

बुद्धिबळात मानसिक कणखरता फारच महत्त्वाची आहे त्याविषयी पुढच्या भागात बघूया 

सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत ) 
शब्दांकन अजिंक्य तरटे  


२) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?