आर्थिक पाहणी अहवाल २०२१- २२


अर्थ संकल्पाचा एक दिवस प्रकाशित होणारा आर्थिक पाहणी या वर्षी अहवाल ३१ जानेवारी रोजी  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला  . आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरत्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था कशी होती ? पुढील वर्षात तिला कोणते धोके उदभवू शकतात याची माहिती असते अनेकांना अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालहे सारखेच वाटू शकतात त्यांना मी सांगू इच्छितो की . आर्थिक पाहणी अहवाल मागील वर्षाचा असतो तर अर्थसंकलपात पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन असते संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सन १९५० -५१ या आर्थिक वर्षापसून सुरु झाली सन १९६४ पर्यंत हा अहवाल अर्थसंकल्पाच्या दिवशीच सादर होत असे मात्र सन १९६४ पासून अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यास सुरवात झाली सर्वसाधानपणे आर्थिक पाहणी अहवाल चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या  इकोमोमिक्स डिव्हिजन मार्फत तयार केला जातो मात्र या वर्षी  चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ  डिसेंबर २०२१ मध्ये संपल्याने हा आर्थिक पाहणी अहवाल प्रिन्सिपल इकोमोनिक ऍडव्हाझार आणि अर्थ मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी तयार केला आहे  गेल्या काही वर्षांपासून याचे दोन भाग असतात पहिल्या भागात देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे असणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय सांगितले असतात तर दुसऱ्या भागात सरत्या वर्षातील अर्थ व्यवस्थेचे चित्र सांगितले असते आर्थिक पाहणी अहवाल सादर करणे किंवा त्यात सांगितलेले उपाय अमलात अने सरकार वर बनधनकारक नाही  ही झाली                    प्राथमिक माहिती आता बघूया या वर्षातील आर्थिक पाहणी अहवालातील बाबींविषयी 
या आर्थिक पाहणी अहवालात पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचे चित्र उत्तम राहील असे सांगितले आहे अर्थव्यस्थेचा एकूण आधीच वेग हा ८ ते साडे ८ पर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे नॅशनल स्टॅटेस्टिक ऑफीसा कडून भारताच्या अर्थव्यस्थेचा वाढीचा दर ९.२ % सांगण्यात आला होता  गेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरत्या वर्षासाठी अंदाज केलेल्या ९.. २ % पेक्षा कमी  आहे  आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आलेली अर्थव्यस्थेच्या वाढीचा दरासाठी तेलाचा दर प्रति बॅरेलसाठी ७० ते ७५ अमेरिकी डॉलर असेल अशे धरून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अर्थव्यवस्थेचा क्षेत्रनिहाय विचार करता  कृषी क्षेत्राचा वाढीचा ददर  सरत्या वर्षापेक्षा  अधिक म्हणजे ३. ९. असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे जो सरत्या वर्षात ३.६% आहेदुसऱ्या क्षेत्रात अर्थात औदयोगिक क्षेत्रासाठी आगामी वर्षासाठी  अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर  ११.८ % ठेवण्यात आला आहे सेवा क्षेत्रासाठी हा दर ८. २ % असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
            सन २०१६ मध्ये पहिल्यांदा सुरु झाल्यापासून स्टार्टअप क्षेत्राने प्रचंड वेग घेतल्याचे निरीक्षण या अहवालात सांगण्यात आले आहे देशातील स्टार्ट अप च्या प्रदेशनिहाय विचार करता देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे  वार्षिक उलाढाल १अब्ज अमेरिकी डॉलर असणाऱ्या स्टार्ट अप चा विचार करता अमेरिका आणि चीन नंतर भर जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे  वार्षिक  उलाढाल १अब्ज अमेरिकी डॉलर असणाऱ्या स्टार्ट अप चा विचार करताभारत तिसऱ्या स्थानी असला तरी अमेरिकेतील स्टार्ट अप आणि ची मधील स्टार्टअपचा विचार करता भारतातील स्टार्ट अपची संख्या खूपच कमी
आहे  हे हि या अहवालात नमूद  करण्यात आले आहे भारतात परकीय चलनाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे भारताच्या एकूण कर्जाच्या तुलनेत त्या पेक्षा जास्त असल्याचे या आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आले आहे त्यामुळे एखाद्या देशाने आपले कायदे बदलत भारताबरोबरच्या व्यापारात बदल केला तरी भारताला घाबरायचे काही कारण नसल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे  मात्र येत्या आर्थिक वर्षात भारताची निर्यात आणि आयात वाढण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे
         येत्या आर्थिक वर्षात भारताच्या विविध अनुदानावर ७ % रक्कम खर्च होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे  नगदी पिकांच्या उत्पादनात शेतकऱ्यांनी तेलबिया आणि कडधान्याच्या पेरणीवर भर देण्याची सूचना या आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आली  भारतात आयात होणाऱ्या वस्तूंमुळे वाढणाऱ्या महागाईविषयी या आर्थिक पाहणी अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे वैयक्तिक रित्या शेअर मार्केटमध्ये होणारी गुंतवणुकीचा विचार करता या सरत्या वर्षात  मोठ्या प्रमाणात गुंतवूणक वाढली आहे . गृह क्षेत्राचा विचार करता मागणी घटली असली तरी घरांच्या किमती खाली आलेला नाहीत असे निरीक्षण या अहवालात सांगण्यात आले आहे  या अहवालात देशातील वाढती बेरोजगारी लोकांची ढासळती  आर्थिक स्थिती  फारसे काही काही सांगण्यात आले आहे नसल्याचा आरोप  काही माध्यमात करण्यात आली आहे 
एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचे दिसत आहे 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?