आत्महत्येच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न

           


    आत्महत्या आजमितीस भारतातील  एक ज्वलंत समस्या आहे,  हे पुन्हा एकदा भारतात पुन्हा  झाले,  एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी सन २०१८ ते २०२० या तीन वर्षात तब्ब्ल २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती  दिली,  नित्यानंद रॉय  यांनी ही  माहिती  नॅशनल क्राईम ब्युरोकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार दिली या आकडेवारीनुसार देशातील मानसिक आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा सिद्द झाले आहे आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची अधिकत्तम मर्यादा १७ हजार आहे गावाची लोकसंख्या २५ हजार झाली की त्या शहरात नगरपंचायत स्थापन झालीच पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत त्या आकडेवरीनुसार महाराष्ट्रातील एखाद्या नगरपंचायतीच्या शहाराएव्हढ्या लोकांनी आत्महत्या केल्या आहेत . जे खरोखरीच धोकादायक चिंताजनक आहे . आपल्या देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातवा क्रमांकाचा देश आहे त्या देशात तीन वर्षात २५ हजार म्हणजे काही विशेष नाहीय असे समजणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे . आपल्या देशात घडणाऱ्या गुन्ह्यापैकीं किती गुन्ह्यांची प्रत्यक्षात पोलीस स्टेशनमध्ये नोंद होते . हे माहिती असणारा कोणीही व्यक्ती प्रत्यक्षात  आत्महत्येचा आकडा या पेक्षा कितीतरी मोठा आहे हे सहजतेने समजू शकतो या आत्म्हत्येपैकी काही गुन्हे अपघाती मृत्यू म्हणून नोंदवले असल्याची दाट शक्यता आहे म्हणजेच आत्महत्या ही आपल्या देशात किती गंभीर समस्या आहे हे आपण समजू शकतो याच उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी दिलेल्या महतीनुसार या काळात लोकांच्या निधनाचे

क्रमांक  एकचे  कारण आत्महत्या आहे . सर्वाधिक आत्महत्या वयवर्षे १५ ते २९ या वयोगटातील आहेत कोणत्याही माणसाच्या आयुश्यात हि वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात व्यक्ती जे काही आयुष्यभरात कमवतो त्याचा पाया या कालखंडात घातला जातो हे आपण लक्षात घेयला हवे

 या आत्महत्या कोव्हीड १९ मुळे वाढलेल्या आहेत असे समजणे भाबडे पानाचे ठरेल कोव्हिडची चीमध्येच सुरवात नोव्हेंबर २०१९ साली झाली  ज्या काळातील आकडेवारी सादर करण्यात आली आहे तो कालावधी त्याचा आधी २३ महिने आधी सुरु झाला आहे हे आपण समजायला हवे सन २०२१ ची आकडेवारीयात  समाविष्ट केल्यास समोर येणारे चित्र अत्यंत भकास असेल हे नक्की या २५ हजार लोकांपैकी बेरोजगारीमुळे ९ हजार १४० लोकांनी आत्महत्या केल्या आहेत कुठंही नोकरी न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे आत्मघातकी पाऊल उचलले आहे ज्यांनी बेजरोजगारच्या समस्येतून अजून हे टोकाचे पाऊल उचलले नाहीत पण हे पाऊल उचलू शकतात अशी लोक भारतात हजारो सापडतील त्यामुळे देशातील रोजगाराचा प्रश्न किती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे या वर्षातील आणि याच्या आधीच्या २ वर्षाच्या  काळातील प्रत्येक अर्थसंकल्प बघितल्यास त्या अर्थसंकल्पात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात देणार असल्याचे   आश्वासन आपणस केंद्र सरकारने दिल्याचे आपणास त्यांचे वेबवसाईटवरील भाषण बघितल्यास दिसते जर इतक्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला असल्यास इतक्या आत्महत्या का झाल्यात?  हा प्रश्न निर्माण होतोच कोव्हीड १९ च्या संसर्ग मोठ्या प्रमाणात असताना २०२०साली ३ हजार ५४८ लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या असल्या  तरी २०१८ आणि २०१९ साली अनुक्रमे २ हजार ७४१ आणि २०१९ साली २ हजार ८५१ लोकांनी बेरोजगारीमुळे मृत्यूस कवटाळले जे सुद्धा मोठे आकडे आहेत हे नाकारून चालणार नाही जे बेरोजगारीचे संकट किती मोठे आहे ? हे स्पष्ट करते या खेरीज कर्जबाजारीपणामुळे १६ हजार ९१ जणांनी या कालावधीत मृत्यूस कवटाळले . लोकांच्या कर्जबाजरीपणपणास काही प्रमाणात कोव्हीड १९ च्या आधीपासून असणारी अर्थव्यवस्थेची स्थिती कारणीभूत आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही बँकांकडून काही लोकांना योग्य तारण  न बघता  कर्ज दिल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कर्ज थकवल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्या असतील हे गृहीत धरले तरी त्यांचे प्रमाण किती टक्के असणार ? जर त्यांचे प्रमाण जास्त असेल तर ही बँकिंग क्षेत्रासाठी धोक्याची घंटा आहे 

या २५ हजार लोंकांमध्ये आजारीपणला कंटाळून किंवा अन्य काही तणतणावातून आत्महत्या केलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला नाही त्यांचा समावेश केलुयास आपला समाज किती वाईटमानसिक आरोग्यात आहे हे समजते . केंद्र सरकारकडून या आत्म हत्येच्या धोक्याबाबत एक तोल फ्री नंबर सुरु करण्यात आला आहे मात्र ज्या देशात मानसिक अनारोग्याबाबत जागृती अत्यंत म्हणजे अत्यंत कमी आहे त्या देशात हे उपाय कितपत उपयोगी पडतील ?अशी शंका घेण्यास खूप वाव आहे इतर फुटकळ गोष्टींच्या पानभर जाहिराती देणाऱ्या केंद्र सरकारने या बाबत ती कार्यवाही केल्यास सोन्याहून पिवळे मात्र काहीच न करण्यापेक्षा हे करणे ऊत्तम 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?