विदित यांचे नष्टचर्य कधी संपणार ?

         

         नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन  भारताचे  क्रमांक दोनचे सुपर ग्रँडमास्टर  विदित गुजराथी यांचे नष्टचर्य कधी संपणार ? असा सवाल सध्या बुद्धिबळप्रेमींकडून  करण्यात येत आहे . टाटा स्टील चेस टूर्नामेंटमध्ये नवव्या फेरीपर्यंत अत्यंत उत्तम प्रदर्शन करत  विजयाचा दावेदर समजल्या जाणाऱ्या  विदित यांचा  पराभव दहाव्या फेरीत भारताच्याच आर प्रगण्यानंद  यांनी केला त्यानंतर ११ फेरीत बुद्धिबळाच्या विद्यमान विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कलर्सन यांच्या बरोबर झालेला डाव वगळता त्यांचे आतापर्यंतचे प्रदर्शन काहिसे निराशाजनकच ठरले.  अर्थात कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात असे नैराश्याचे ढग येतच असतात मात्र विदित यांच्यासारखे खेळाडू त्यांच्यावर मात करत पुन्हा नव्याने उभारी घेतात क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यात देखील असा कालखंड येऊन गेला जो नर्व्हस नाईन्टी म्हणून प्रसिद्ध आहे त्यावर ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकर यांनी मात  केली तसे विदित पण करतील यात एक बुद्धिबळप्रेमी म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही 
         टाटा स्टील चेस टूर्नामेंटमध्ये मध्ये बाराव्या फेरीचा डाव खेळताना   डावाच्या अखेरच्या टप्यात  अनावधानाने केलेल्या एका घोडचुकीमुळे त्याना डाव गमवावा लागला.  त्यावेळी त्यांना आपल्या भावनांना यावर घालणे जमले नाही हे अनेक बुद्धिबळप्रेमींनी ऑनलाईन बघितले सुद्धा. विदित ज्या पातळीवर बुद्धिबळ खेळतात
त्या पातळीवर अश्या प्रकारे भवनाविनाश होणे याला खूप महत्व आहे बुद्धिबळाचा विचार करता जगातील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू असणाऱ्या मायदेव्ह यांच्या बरोबर जगातील १९ व्या  क्रमांकाचे खेळाडू असणारे विदित पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळत होते डावावर त्यांची पकड होती मात्र काही कारणाने त्याच्या पटावरील एका मोहऱ्याकडे अनवधानाने दुर्लक्ष झाले ज्याची किंमत त्यांना डावावर पाणी सोडून करावी लागली स्पर्धेच्या अखेरच्या १३ व्या फेरीतील डावात त्यांना अरोनियन यांनी हरविले  त्यानंतर सुमारे आठवड्याच्या विश्रामाने बर्लिन येथे सुरु झालेल्या फिडे ग्रांपी २०२२ या स्पर्धेत ते आधीचे अपयश पुसून काढत पुन्हा चमकदार कामगिरी करतील अशी आम्हा बुद्धिबळपटूंना आशा होती फिडे ग्रांपी २०२२ च्या सुरवातीला त्यांनी चमकदार खेळाचे प्रदर्शन करत आम्हा बुद्धिबळपटूंना आनंद दिला जपानची लोककल्पना असणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी पुन्हा उभारी घेतली असे वाटत असताना स्पर्धेच्या पहिल्या टप्याच्या अखेरीस  ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या  डावात रशियाच्या डेनियल दुबाव यांच्यावर विजय मिळवणे पुढच्या टप्यात प्रवेश करण्यासाठी अत्यंत आवश्यक असताना  त्यांना बरोबरी मान्य करावी लागली आणि भारताच्या  सर्व आशा संपुष्ठात आल्या . भारतचे दुसरे प्रतिनिधी पेन्टला हरिकृष्णन हे याआधीच स्पर्धेतून बाहेर पडल्यासारखे होते त्यामुळे भारताच्या सर्व अशा 
  नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन  भारताचे  क्रमांक दोनचे सुपर ग्रँडमास्टर  विदित गुजराथी यांच्यावर होत्या 
           बर्लिन येथील स्पर्धेत १६ खेळाडू सहभागी झाले होते ज्यांची विभागणी ४ गटात करण्यात आली होती प्रत्येक गटात ४ खेळाडू होते जे आपल्या गटातील प्रत्येक खेळाडूंशी प्रत्येकी दोन डाव खेळणार होते ज्यामध्ये जिंकल्यास एक गुण तर डाव बरोबरीत सुटल्यास अर्धा गुण देण्यात येणार होता  पहिल्या टप्प्या अखेरीस गटातील ज्या खेळाडूंचे गुण सर्वाधिक होणार होते तो खेळाडू स्पर्धेच्या दुसऱ्या टप्यात अर्थात सेमी फायनलमध्ये खेळणार होता विदित यांनी स्पर्धेत या आधी झालेल्या रशियाच्या डेनियल दुबाव याला पराभवाचे पाणी पाजले होते ज्याची परतफेड डेनियल दुबाव यांनी दुसऱ्या डावात केली या दुसऱ्या डावाची सुरवात दोन्ही खेळाडूंनी वजिरासामोरील प्यादे दोन घरे चालवून केली ११ फेब्रुवारी पर्यंत झालेल्या पाच  डावात पहिल्या डावात अरोनियम बरोबर पराभवदुसऱ्या डावात विन्सेंट केमर यांच्या बरोबर बरोबरी तर तिसऱ्या डावात डेनियल दुबाव यांच्यावर विजय  तर चौथ्या आणि पाचव्या डावात अनुक्रमे अरोनियम आणि डेनियल दुबाव यांच्या बरोबर डाव बरोबरीत सोडवून अडीच गुण मिळाले आहेत ११ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अखेरचा सामना खेळणे अद्याप बाकी आहे मात्र तो जिंकला तर त्यांचे होणारे  संभाव्य साडेतीन गुणा ऐवजी अरोनियम यांचे आताच ४ गुण झाल्याने विदित गुजराथीहे सेमी फायनल गाठू शकणार नाही हे निश्चित झाले आहे 
       त्यामुळे नाशिक महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या विदित गुजराथी यांचे नष्टचर्य कधी संपणार आणि नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन  भारताचे  क्रमांक दोनचे सुपर ग्रँडमास्टर  विदित गुजराथी हे आपल्या मूळ फॉर्मात येणार या कडे समस्त बुद्धिबळपटूंचे लक्ष आहे बुद्धिबळ क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते भारताचे पहिले
ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हे लवकरच बुद्धिबळ सन्यास घेऊ शकतात त्यांनी बुद्धिबळातून निवृत्ती घेतल्यावर विदित भारतातील पहिल्या क्रमांकाचे बुद्धिबळ खेळाडू होतील जी नाशिकरांसाठीअभिमानाची गोष्ट असेल यात शंका नाही मात्र नाशिकच्या माध्यमात याबाबत फारसे काही बोलले जात नाहीये काय हे दुर्दैव 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?