शिवधनुष्याचे यशस्वी पेलणे.

 

आपल्याकडे अशक्यप्राय वाटणाऱी गोष्ट करणे यासाठी शिवधनुष्य पेलण्याची उपमा दिली जाते. भगवान शिव यांचे सारेच अलोकिक त्यामुळे त्यांचे सारचे प्रतीप्रचंड मोठे ,विशाल, त्यामुळे त्यांच्या गोष्टी हाताळणे खुपच अवघड .ते हातळणे  खुपच कौशल्याचे काम असा या मागचा भावार्थ आहे.
     नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने असेच एक शिवधनुष्य नुकतेच लिलया हाताळले. फेब्रुवारी महिन्याचा सुरवातीला बुद्धिबळ खेळाचे भारतातील व्यवस्थापन करणाऱ्या, शिखर संस्थेमार्फत अर्थात आँल इंडीया चेस फेडरेशनतर्फे येत्या 25 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. त्यासाठी राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांनी त्यांचा संघ या स्पर्धेसाठी पाठवण्यात यावा असे सांगण्यात आले. वेळ  अत्यंत कमी असल्याने राज्याचा संघ निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यास मात्तबर ज्यांना अस्या स्पर्धा आयोजनाचा अनुभव आहे, अस्या जिल्हा बुद्धिबळ संघटना कचरु लागल्या. अश्या वेळी जो आव्हान शिंगावर घेतो, तोच खरा योध्दा या न्यायाने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे यांनी 

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेस असा कोणताही पुर्वानुभव नसताना हे आव्हान स्विकारले, आणि आपल्या सहकार्यांचा मदतीने खरे करुन दाखवले. दिनांक 19 आणि 20फेब्रुवारी रोजी पंचवटीतील इंद्रकुंड परीसरातील दादा जेठानंद पानगनी ट्रस्टचा सभागृहात या स्पर्धा  पार पडल्या.
त्या आधी आठवडाभर आधी या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी ठरवण्यासाठी देखील यशस्वी स्पर्धा घेतली.
    या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उपलब्ध तूंटपुज्या पैसात राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंची राहण्याची , खाण्याची सोय करणे . महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या नियमांनूसार पंचाची मानधनासह सोय करणे.  स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या क्रिडा साहित्याची (बुद्धिबळाचा पट, सोंगट्या ,खेळाडूचा वेळ मोजणारे स्टाँप क्लाँक {बुद्धिबळाच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला वेळेचे बंधन असते, ते मोजण्यासाठी दोन स्टाँप लाँक एकत्र येवू शकतील असे स्टाँपक्लाँक वापरतात}) व्यवस्था करणे, ही सर्व कामे विक्रमी वेळात नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या खेळाडूंनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावेच लागेल.
 हे काम वाटते तितके सोपे नाही, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात एक अधिकृत आणि एक अनधिकृत जिल्हा बुद्धिबळ संघटना आहेत.त्यातील अधिकृत संघटनाच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कसे करेल? याबाबत काळजी घेणे.जरी नाशिक
जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत खेळाडुंची राहण्याची खाण्याची सोय केलेली असते तरी काही खेळाडू त्यांचा वैयक्तिक शक्तीवर दुसरीकडे राहण्याची सोय करतात तसेच अनेक लहान वयाचे बुद्धिबळ खेळाडू त्यांंचा पालकांसमवेत येतात, तेव्हा त्यांचा फँमिलीची उपलब्ध खोल्यांमध्ये सोय करणे (महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांचा संघातील चार खेळाडूंपैकी दोन खेळाडू चौदा वर्षाखालील आहेत. ) तेही जेमतेम 15दिवसांच्या आधी समजल्यावर याबाबत नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे कौतूक करायलाच हवे. अत्यंत कमी वेळात महाराष्ट्र सारख्या 32 जिल्हा बुद्धिबळ संघटना असणाऱ्या विस्ताराच्या दृष्टिने देशातील तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राज्यात बुद्धिबळ स्पर्धा भरवणे , हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच नाही का? तेही पुरेसे आर्थिक पाठबळ नसताना ?मात्र हा पराक्रम प्रत्यक्षात उतरवला आहे, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने.
    कमी वेळात आयोजन करावे लागत असल्याने, याच्या प्रचारासाठी देखील अनेक मर्यादा आल्या मात्र यावेळी नाशिकमधील विविध अप्रकाशित व्यक्तींना प्रकाशित करणाऱ्या एम ए टी या संस्थेने खूप मदत केली.त्यांनी त्यांचा युट्यूब चँनेलवर आणि फेसबुकपेजवर या स्पर्धेतील सर्व सातही डावांचे थेट प्रक्षेपण केले.आपण आताही
त्याठिकाणी जावून ते बघू शकतात.याबद्दल एम आय टी च्या अंजली मावळंकर आणि मंजूषा डहाळे यांचे  जगभरातील बुद्धिबळ प्रेमी नेहमीच कृतज्ञ राहतील यात शंका नाही.
बुद्धिबळ हा खेळ लोकप्रिय होण्यास माध्यमांनी हातभार लावल्यास पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या, मात्र भारताचा नव्हे तर रशियाचा राष्ट्रीय खेळ असणारा आणि नावात जरी बुद्धी हा शद्ब कसला तरी बुद्धी बरोबर शाररीक क्षमता जोखणारा (तूम्ही शाररीक असमर्थ असाल तर तूम्ही पुर्ण क्षमतेने विचार करु शकत नाही त्यामुळे इतर खेळासारखाच बुद्धिबळात देखील शाररीक क्षमता लागतेच)हा खेळ बहरेल हे नक्की!
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?