भारत बुद्धिबळातील भविष्यातील महासत्ता

       


      बुद्धिबळाच्या इतिहासात एकेकाळी रशियाचा दबदबा होता . खेळाडू जरी वेगवेगळा असला तरी, जगात बुद्धिबळाचा विश्वविजेता हा रशियाचाच असे कालांतराने रशियाचे हे अभेद्य वाटणारे साम्राज ढासळले . अमेरिका , भारत , नॉर्वे आदी अनेक देशांचे बुद्धिबळपटू विश्वविजेते होऊ लागले .  मात्र आता पुन्हा बुद्धिबळ या खेळावर पुन्हा एकदा एकाच देशाचे प्रभुत्व निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुद्धिबळातील ती भविष्यातील महासत्ता आहे भारत , हो आपला भारत आगामी काळात बुद्धिबळातील महासत्ता होणार आहे ज्या प्रमाणे मोठ्या व्यक्तीच्या बालपणीच त्यांचे पाय पाळण्यात दिसतात,  तश्याच प्रमाणे  विविध जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ जी चमकदार कामगिरी करत आहेत त्यानुसार ही गोष्ट सिद्ध होत आहे . २१ फेब्रुवारी  २०२२ रोजी जेमतेम १६ वर्षाचे भारतातील सर्वात तरुण आणि जगातील क्रमांक दोनचे तरुण ग्रँडमास्टर आर प्रग्न्यानंद यांनी विद्यमान आणि या आधी  सहावेळा विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कार्लसन यास पराभूत करून त्याची झलक दाखवली आहे . 

 नाशिकच्या तरुणांचे आयकॉन असणारे  भारतातील क्रमांक दोनचे ग्रँडमास्टर  विदित गुजराथी, आर प्रग्न्यानंद अर्जुन एरिगेसी हे भारतचे बुद्धिबळमधील भविष्य अत्यंत उज्ज्वल असल्याचे स्पष्ट करत आहेत नाशिकच्या तरुणांचे आयकॉन असणाऱ्या विदित गुजराथी यांनी आतापर्यंत १५०० हुन अधिक आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत त्यातील

फक्त १८ % सामने त्यांनी गमावले आहेत बुद्धिबळाचे विब्लडन समजल्या गेलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ ( पूर्वीची कोरस  स्टील स्पर्धा जी आता टाटाने कोरस विकत घेतल्याने टाटा स्टील चेस स्पर्धा म्हणून ओळखली जाते )   स्पर्धेत ९ व्या  फेरीपर्यंत स्पर्धेचा विजेता म्हणून नाशिकच्या तरुणांचे आयकॉन असणाऱ्या विदित गुजराथी यांच्याकडे बघितले जात होते मात्र शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये त्यांचा डाव ढासळल्याने ते विजेतेपदापासून दूर राहिले त्यांनी हँसली इन्हावचूक , मँसिलि व्हँकेचर लाग्रेन अश्या  दिग्जज  बुद्धिबळपटूंना पराभवाचे पाणी चाखायला भाग पडले आहे. तर सर्जी कार्यायीन, अनिष गिरी आदी बुद्धिबळपटूंबरोबर बरोबरी केली आहे. विदित गुजराथी यांनी २०१८ साली झालेल्या स्वीडन खुल्या गटात अनेक धक्कादायक निर्णय नोंदवत स्पर्धेतील विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली होती तर २०१९ साली नजीकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा अडीच गुणांची अधिकची कामगिरी करत बीएएल कप स्पर्धेत विजश्री मिळवली होती त्याच वर्षी झालेल्या फिडे विश्व अजिंक्यपद स्पर्धेत उप उपान्त्य फेरीपर्यंत धडक मारली होती २०२० साली झालेल्या फिडे ऑनलाईन सांघिक विजेतेपदे  स्पर्धेत भारतास विजेतेपद  मिळवण्यात   त्यावेळी संघाचे कप्तान असणाऱ्या विदित यांचा सिहाचा वाट होता विश्वविजेतेपदाचा दावेदार होण्याची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या टाटा स्टील मास्तर बुद्धिबळ स्पर्धेत यांनी खूपच उत्तम  कामगिरी केल्याने आपण भविष्यतील विश्वविजेतेपदाचे दावेदार आहोत हे दाखवून दिले आहे  पटावर विविध प्रकारच्या मती गुंग करणाऱ्या व्यहरचना करून प्रतिस्पर्ध्यवार मात करण्यासाठी  नाशिकच्या तरुणांचे आयकॉन असणारे विदित गुजराथी प्रसिद्ध आहेत 

         भारतातील सर्वात तरुण आणि जगातील क्रमांक दोनचे तरुण ग्रँडमास्टर आर प्रग्न्यानंद यांनी २१ फेब्रुवारी  २०२२ रोजी इतिहास घडवला विद्यमान आणि या आधी सहावेळा विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कार्लसन यास पराभूत केले आहे टाटा स्टील मास्टर स्पर्धा खेळण्यासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असणारी टाटा स्टील चॅलेंजर या स्पर्धेचे २००२चे अजिंक्यपद आर प्रग्न्यानंद यांनी मिळवले आहे त्यामुळे ते पुढील टाटा स्टील मास्टर स्पर्धा  खेळण्यास पात्र झाले आहेत जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटू खेळत असणाऱ्या  टाटा स्टील मास्टर स्पर्धेस बुद्धिबळ जगतात विशेष महत्व आहे या स्पर्धेस बुद्धिबळ विश्वविजेता होण्याच्या प्रक्रियेची रंगीत तालीम समजली

जाते यावरून तिचे महत्व लक्षात येते आर प्रग्न्यानंद यानींच काही दिवसापूर्वी झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत तो पर्यंत विजयाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या विदित गुजराथी यांचा दहाव्या फेरीत  पराभव केला होता . आर प्रग्न्यानंद हे आठ वर्षाखालील दहा वर्षांखालील आणि अठरा वर्षाखालील गटात विश्वविजेते आहेतवयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी ग्रँडमास्टर हा 'किताब मिळवला.   जेमतेम चौदा  वर्षाचे असताना  त्यांनी अनेक बुद्धिबळ पटूंना संपूर्ण आयुष्यात  अशक्यप्राय वाटणारा,  २६०० इलो रेटिंगचा टप्पा गाठला आहे आंतराष्ट्रीय मास्टर हा 'किताब मिळवणरे ते सर्वात लहान खेळाडू आहेत वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी ग्रँडमास्टर हा 'किताब आपल्या खिश्यात घातला .ते वयाने लहान असून देखील वयाने मोठया असणाऱ्या खेळाडूंशी खेळताना वयाचे दडपण ना घेता खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत आर प्रग्न्यानंद यांनी आतापर्यंत आंद्रे एसीपीएनको , योहान सॅबास्टियन क्रिस्टियन , तैमूर राजदाबोव, कार्यकिन आदी अनेक नामवंत बुद्धिबळपटूंना गुडघे टेकण्यास भाग पडले आहे , 

या दोन खेळाडूंबरोबर अर्जुन एरिगेसी हा १८ वर्षीय बुद्धिबळपटू भारताचे बुद्धिबळातील भविष्य उजळून टाकण्यास सज्ज होत आहे अर्जुन एरिगेसी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या तीनात येण्याची कामगिरी केली आहे आंतराष्ट्रीय मास्टर आणि ग्रँडमास्टर हे 'किताब एकाच वर्षी मिळवण्याची अशक्यप्राय वाटणारी किमया अर्जुन

एरिगेसी यांनी केली आहे त्यांची आतापर्यँतची वाटचाल बघता लवकरच ते २७०० इलो रेटिंगच्या गटात समाविष्ट होऊ शकतात अशी शक्यता बुद्धिबळ जाणकारकांकडून  व्यक्त होत आहे 

बुद्धिबळ हा खेळ भारतात उगम पावला तेथून अरबी व्यपाराच्या मार्फत युरोपात आणि जगभरात पोहोचला मात्र १९८६ पर्यंत भारतात एकच आंतराष्ट्रीय मास्टर होते एकही ग्रँडमास्टर नव्हता विश्वनाथन आंनद हे भारताचे पहिले ग्रँडमास्टर जे ९० च्या दशकाच्या अखेरच्या काही वर्षात ग्रँडमास्टर झाले आणि बुद्धिबळाच्या क्षेत्रात भारतीयांचे नाव झळकू लागले आज नाशिक जिल्ह्यतील पिंपळगाव बसवंत सारख्या खेडेगाच्या ठिकाणी तीसच्या आसपास बुद्धिबळ खेळाडू प्रक्षिक्षण घेत आहेत  मी पिंपळगाव बसवंत चे उदाहरण प्रातिनिधिक घेतले आहे पळसाला पाने तीनच या न्यायाने देशभरात  बुद्धिबळाचा प्रक्षिक्षण अजेकजण घेत असतीलच आजमितीस भारतात ७५ ग्रँडमास्टर आहेत आणि दिवसांगणिक त्यांची संख्या वाढत आहे  जे भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे . त्याच्याच वारसा नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी , आर प्रग्न्यानंद , अर्जुन एरिगेसी चालवत आहेत तो त्यानी अशाच यशस्वीपणे चालवला यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?