युक्रेनच्या धर्तीवर याही देशाचा मृत्यू होणार?

                   

                 रशिया युक्रेनचा घास  कश्या प्रकारे घेत आहे ? हे आपण टीव्हीवर बघत आहोतच रशियाने युक्रेनवर आक्रमक केल्यावर अमेरिका देशाची  प्रतिक्रिया   जगाने बघितलीये ,जी अमेरिका नाटोच्या  मदतीने युक्रेनच्या मदतीसाठी आम्ही येऊ असे म्हणत होती त्याच अमेरिकेने युक्रेनमधील आपला दूतावास जगात सर्वात पहिले बंद केला. आम्ही रशियाविरुद्ध तिसरे महायुद्ध होऊ इच्छित नाही, असे कारण देत युक्रेनला स्वतःच्या ताकदीवर रशियाविरुद्ध लढण्यासाठी सोडून दिले. आज हे लेखन करताना अमेरिका सोडा नाटोचा कोणताही सदस्य देश रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनबरोबर येत नहिये .त्यामुळे एका मोठा प्रश्न उद्भवू शकण्याची शक्यता आंतराष्ट्रीय माध्यमातून व्यक्त होत आहे, ती म्हणजे उद्या जर चीनने,  रशियाने युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी जे कारण दिले, तसेच कारण देत तैवानवर आक्रमण केले तर तैवानचे काय होणार?  ज्या प्रमाणे युक्रेन हा देश जगाच्या नकाश्यावरून गायब झाला तसा तैवान हा देश देखील जगाच्या नकाशावरून गायब होतो का?  असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे .  
                       तैवानच्या रक्षणासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली क्याड हा गट अमेरिकेने स्थापन केला आहे ज्यामध्ये अमेरिकेखेरीज आपला भारत  जपान आणि ,ऑस्ट्रोलिया ,हे सदस्य देश आहेत त्यातील भारताच्या एकूण अर्थसंकल्पीय तरतूदीएव्हढी तरतूद अमेरिकेच्या लष्करासाठी असते. बाकीचे देश देखील अमेरिकेच्या तुलनेत सरंक्षणवर कमीच खर्च करतात, अश्या वेळी जर अमेरिकेने माघार घेतली तर ?बाकीचे तीन देश चीनविरुद्ध
आघाडी उघडणे अशक्यच  चीनने या आधीच तैवानबाबत आक्रमक धोरण अंगिकारले आहे. तैवानच्या हवाई हद्दीचा भंग करता आपली लष्करी सामुग्री असणारी विमाने तैवानच्या हद्दीत उडवली होती. जपानच्या टोकियोमध्ये झालेल्या ऑलम्पियाडमध्ये तैवानच्या चायनीज तैपेई अशा उल्लेख न करता तैवान अशा उल्लेख केल्याने चीनचे पित्त किती  खवळले होते हे आपण बघितले आहेच. तसेच तैवाचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून केल्याने युरोपातील लीथवानीया या देशाबरोबर चीनने त्यांचे राजनॆतिक संबंध संपवल्याची घटना ताजीच आहे 
                 रशियाने मागच्या इतिहासाच्या हवाला देत युक्रेनवर आक्रमण केले. चीन देखील त्याच मुद्यावर तैवान आपला अविभाज्य भाग मानत आहे. चीनने आपल्या सामर्थ्यामुळे जगातील मोजक्या एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या देशांचा अपवाद वगळता बाकी सर्वांना एक चीन धोरणानुसार तैवानला स्वतंत्र देश मानण्यास मनाई केली आहे त्यामुळे चीन रशियाचा हवाला देत कधीही तैवानचा घास घेऊ शकतो 
              तसे झाल्यास फक्त भारतासारखा बहुपक्षीय लोकशाही असणारा देशच नष्ट होईल असे नाही, तर
मुळातच राक्षसी असणारी चीनची महत्वकांक्षा भयानक स्वरूप धारण करेल हे नक्की! तेव्हाचा चीन कोणालाच परवडणारा नाही, तसे न होण्यासाठी युक्रेनचा धडा घेत, आतापसूनच जगणे  पाऊले उचलावयाला हवीत. नाहीतरी युक्रेनबरोबर आणखी एल देशाचा मृत्यू होणार हे नक्की !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?