महाराष्ट्रातील रेल्वे झपाट्याने बदलाचा मार्गावर !

   


   जगात विस्ताराच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असणारी , सर्वाधिक कर्मचारी असणारा जगातील पहिल्या क्रमांकाच्या सार्वजनिक उद्योग पूर्णतः आपली भारतीय रेल्वे सध्या प्रकाशाला लाजवेल इतक्या मोठ्या वेगाने बदलतीये . त्याचाच एका भाग म्हणून भारताच्या आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्रातील रेल्वे सुद्धा झपाट्याने कात टाकत आहे भारतात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या या बदलांमध्ये नॅरोगेज आणि मीटरगेजच्या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज या रेल्वेमार्गात रूपांतर करणे डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेमार्गाचे विद्यतीकरण करणे आदी कामाचा समावेश करावाच लागेल 

 आपल्या महाराष्ट्रातील अकोला ते खांडवा या बहुचर्चित रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या या मार्गाचे जज बदलायचे काम खूपच आधी सुरु झाले होते मात्र हा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने आणि गेज परिवर्तनासाठी लागणाऱ्या अधिकच्या जमिनीचे हस्तांतर करण्यास वन खात्याने लाल सिगनला दिल्याने या मार्गाचे काम रखडले होते मात्र अखेर आठवड्यापूर्वी वन खात्याने या बाबतच्या जमीन हस्तानंतरणास मान्यता दिल्याने या मार्गाच्या गेज परिवर्णनास असणारा अडथळा दूर झाला आहे हा

अढथळा दूर झाल्याबरोबर या मार्गाबरोबर अन्य एका मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी मिळून एकत्रित ७० हजार कोटीची निधीची तरतूद देखील दक्षिण मध्य रेल्वेने केली आहे महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रादेशिक विभागातून जाणाऱ्या या रेवेमार्गाचे गेज परिववर्तन झाल्याने राजस्थानमधून तेलंगणा राज्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे तसेच या मार्गाची गती देखील वाढण्यास मदत होणार आहे हा रेल्वेमार्ग मुळच्या  रतलाम महू अकोला खांडवा या रेल्वेमार्गाचा भाग आहे पश्चिम रेल्वे , मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे या रेल्वेच्या तीन विभागात येणाऱ्या या मार्गाच्या अन्य भागाचे काम या आधीच पूर्ण झाले होते किंवा जवळपास पूर्ण झाले होते मात्र हा मार्ग रखडला होता त्यास आता गती मिळाली आहे राजस्थान मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यातून जाणाऱ्या या मार्गामुळे विकासाच्या प्रवाहात काहीसा मागे पडलेल्या या प्रदेशाच्या विकास आता झपाट्याने होईल 

   या मार्गाच्या सुधारणेबरोबर अकोला पूर्णा या विदर्भ आणि मराठवाडा जोडणाऱ्या रेल्वेमार्गावरचे विद्युतीकरण जवळपास पूर्ण झाले आहे गेल्याच आठवाड्यत या मार्गावरील लोहगाव ते वाशीम या रेल्वेमार्गावर रेल्वेची सुरक्षा चाचणी यशस्वीपणे पार करण्यात आली आता लवकरच याही मार्गावर इलेट्रीक इंजिन धावू लागेल ज्यामुळे डिझेल इंजिनामुळे होणारे प्रदूषण कमी होईलच तसेच या मार्गातील रेल्वेची गती देखील वाढेल ज्याचा फायदा या मार्गाचा विकास  होण्यात होईल 

या मार्गांबरोबरच दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा मार्ग असलेल्या पुणे जंक्शन ते मिरज जंक्शन या दरम्यानचे विद्युतीकरणाचे काम १०० %पूर्ण झाले आहे याठिकणी मार्चच्या  पहिल्या पंधरवाडयता  रेल्वेची सुरक्षा चाचणी होणे अपेक्षित होईल एकदा ती पूर्ण झाल्यावर याही मार्गावर इलेट्रीक रेल्वे इंजिन धावण्यास सुरवात होईल या मार्गावरील डिझेल इंजिनवर काम करणाऱ्या रेल्वेत इंजिन चालकांना आणि अभियंताना रेल्वे इंजिनबाबत सध्या प्रक्षिक्षण देण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे याच मार्गाचा एका भाग अस्नणाऱ्या मिरज ते कोल्हापूर दरम्यान एक सुरक्षा चाचणी कोव्हीड १९ पूर्व काळात घेण्यात येणार होती मात्र काही करणारे हि खोळंबलीमिरज जंक्शन ते कुर्डुवाडी जंक्शन या दरम्यानचे काम जवळपास पूर्णत्वाकडे गेल्याचे रेल्वेकडून

सांगण्यात येत आहे म्हणजेच मार्च अखेरीस ते देखील पूर्ण होईल असा अंदाज करण्यास काहीच चुकीचे नाही 

महाराष्ट्रासारख्याच गोष्टी इतर राज्यात देखील बदलत असवयता असे मानण्यात काही गैर नाही कारण पळसाला पाने तीनच  या म्हणीप्रमाणे त्याही ठिकाणी मोठी कामे सुरु असतीलच एकंदरीत भारतीय रेल्वे प्रकाशाला लाजवेल या गटानी बदलत आहे हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?