पाकिस्तानची वाटचाल नकी कुठे चालली आहे ?

       

              पाकिस्तानची वाटचाल नकी कुठे चालली आहे ?अशा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानबाबत जागतिक पातळीवर घडत आहेत .पाकिस्तानच्या   अमेरिकेतील वर्तमान राजदूत असद मसिद खान हा पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतून सेवा निवृत्त होत असल्याने  मुदत पूर्ण झाल्याने पाकिस्तानने अमेरिकेला हा असेल आमचा तुमच्या देशातील नवीन  राजदूत म्हणून ज्या पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याचे नाव सुचवले त्या अधिकाऱ्यास अर्थात मसूद खान यास  अमेरिकेने त्यांचा देशातील पाकिस्तानचा राजनॆतिक अधिकारी म्हणून मानण्यास नकार दिला आहे . सदर अधिकाऱ्याचे दहशतवाद्यांशी जवळचे संबंध आहेत असे कारण त्यांनी या साठी दिले आहे .  एखादा  देश दुसऱ्या देशात आपला राजनीतिक अधिकारी नेमतो  तेव्हा त्या अधिकाऱ्यास दुसऱ्या देशाचा संवैधानिक प्रमुखास भेटून मी तुमच्या देशात राजनैतिक प्रमुख म्हणून आलेलो आहे तरी मला तुम्ही काम करण्यास मान्यता असे सांगावे लागते त्यावेळी त्या देशाचे संवैधानिक प्रमुख त्या अधिकाऱ्याचे कर्तृत्व बघून त्यास मान्यता देतात . सर्वसाधारणपणे बहुतेक सर्वच वेळी  देशाचे संवैधानिक प्रमुख त्यास मान्यता देतात मात्र औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया करावीच लागते त्या प्रमाणे मसूद खान अमेरिकेत गेले असता अमेरिकेत गेले असता अमेरिकेकडून नकार घंटा घेऊन आले अमेरिकेच्या संसदेने (ज्याला काँग्रेस असे म्हणतात )त्याबाबत अमेरिकी अध्यक्षांवर या बाबत दबाव आणला 
         अमेरिकेत सूत्रे घेण्याचा आधी काही काळ आधी मसूद खान  पाकिस्तानने अनधिकृतपणे ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमध्ये प्रशासन प्रमुख होता  . भारत कशिमरमध्ये कसा अत्याचार करतो ? आम्ही कशी कशिमरची प्रगती करतोय हे जागतिक स्तरावर सांगण्याची जवाबदारी त्याच्यावर होती तेथून कार्यमुक्त झाल्यावर पाकिस्तानी सरकार त्याची नियुक्ती पाकिस्तानचे अमेरिकेचे राजदूत म्हणून करू इच्छित होती मात्र त्यास आता खो बसला आहे
मसूद खान 
सध्या अमेरिकेच्या तुरुंगात दहशवादी कारवायांच्या आरोपाखाली  शिक्षा भोगणारा पाकिस्तानी नागरिक आफीया सय्यद याच्या समर्थनार्थ मसूद खान याने अनेक विधाने केली आहे  आपला राजनैतिक अधिकारी दुसऱ्या देशाने नाकारणे ही  कोणत्याही देशासाठी ही  प्रचंड अपमानास्पद वागणूक असते  काही दिवसापूर्वी पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकी विरोधात विधान केले होते तसेच अमेरिकेचा स्पर्धक असणाऱ्या चीन मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलम्पिकविषयी सकारात्मक वातवरण निर्माण होईल अशी दोन विधाने केली होती त्याचा वचपा काढण्यासाठी अमेरिकेने हे कृत्य केल्याचा अंदाज काही माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे   अमेरिकी खासदाराने राष्ट्राध्यक्ष्याना लिहलेल्या पत्रानुसार मसूद खान याचा इतिहास बघता त्याला राजदूत म्हणून स्वीकारल्यास अमेरिकेच्या दहशतवादी विरोधाच्या लढाईत अमेरिकीच्या विरोधात संदेश जगाला जाईल जे योग्य नाही सबब मसूद खान यास कोणत्याही स्थितित पाकिस्तानचा अमेरिकेतील राजदूत म्हणून मान्यता देण्यात येऊ नये . 
           असद मसिद खान सेवा निवृत्त झाल्यावर जर पाकिस्तानने दुसरा राजनॆतिक अधिकारी नेमला नाही तर पाकिस्तान अमेरिका राजनीतिक संबंध संपुष्ठात येऊ शकतात . जर दुसरा अधिकारी दिल्यास आमचे अधिकारी दहशतवाद्यास समर्थन देतात याची अप्रत्यक्ष कबुलीच दिल्यासारखीच स्थिती पाकिस्तानची होईल . पाकिस्तान चीनच्या मदतीने यात मध्यस्थी करू शकतो मात्र त्यासाठी चीन पाकिस्तानकडून मोठी किंमत वसूल कारे हे नक्की तसेच चीन हे करेलच याचीही खात्री देता येऊ शकत नाही त्यामुळे पाकिस्तान दुहेरी संकटात सापडला आहे 
         पाकिस्तान आपला शत्रू आहे तसेच आपली त्याचबरोबर आपली सीमा देखील आहे त्यामुळे तेथील घडामोडींचा आपल्यावर परिणाम हॊणारच त्यामुळे भारताचे एक जागरूक नागरिक म्हणून त्या आपणस माहिती असणे आवश्यक आहे कारण तीच जागरूक नागरिकाची निशाणी आहे  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?