खेळ होतो मोठ्यांच्या, जीव जातो लहानग्यांचा

   

      रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर घडलेल्या विविध घडामोडी विविध वृत्तवाहिन्या .वृत्तपत्र यांच्या मार्फत आपणापर्यंत एव्हाना पोहोचल्या असतील .  त्यामुळे कोसळल्या शेअर मार्केटमुळे होणारे गुंतवणुकीदारांचे अब्जावधींअमेरिकी डॉलरचे  नुकसानीचे आकडे, तसेच रशियाच्या हल्ल्यात प्राणास मुकलेल्या व्यक्तीचे फोटो व्हिडीओ आपणापर्यंत  समाज माध्यमांद्वारे  पोएका होचले देखील असू शकतात . युक्रेनच्या राजदूतांनी भारताकडे मागितलेल्या मदतीमुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कसं जागतिक स्तरावर प्रभाव आहे या बाबतचे विविध मेसेज तुम्ही समाज माध्यमांमध्ये वाचलेले असू शकतात पुतीन यांचे व्यक्तिमत्व कसे हुकूमशाही स्वरूपाचे आहे त्यांच्या रशियन गुप्तचर संस्थेतील कामकाजविषयी तसेच त्यांच्या स्वच्हन्दी स्वरूपाचे आहे याविषयी देखील तुम्ही वाचलेले असू शकते मात्र  एका मुद्यांबाबत तुम्ही फारसे ऐकलेले नसू शकते ,तो विषय म्हणजे विविध महासत्तांच्या वर्चस्वाच्या लढाईत भरडला जाणाऱ्या छोट्या राष्ट्रांचा जीव 
        आताची गोष्ट सोडून देउया याच्या आधीही अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी इराकवर हल्ला करूनइराक आणि सीरिया या दोन देशाची अक्षरशः वाट वाट लावली  इराकचे आणि सीरियाच्या  तत्कलीन सरकारचे प्रमुख असणाऱ्या व्यक्तीबाबत तेथील स्थानिक नागरिकांची काहीही तक्रार नसताना त्यांच्याकडे  जागतिक शांततेला धोका उत्पन्न होईल असे कोणतेही उपकरण नसताना अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी तेथील सरकार प्रमुखांकडे जागतिक शांततेला धोका उत्पन्न होईल अशी शस्त्रात्रे आहेत अशी आवई उठवून  स्वतःच्या  दबदबा असणाऱ्या संघटनेमार्फत हल्ला करून तेथील शांतता नष्ट केली या अशांतेमुळेच तिथे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेची निर्मिती झाली इराकच्या तत्कालीन सरकारचे प्रमुख असणाऱ्या सद्दाम हुसेन यांना पकडल्यावर ज्याची आवई उठवून इराकवर हल्ला केला त्याचे काहीही अवशेष सुद्धा आढळले  नाही मात्र
तो देश अशांतेच्या कधीच ना संपणाऱ्या गर्तेत मात्र गेला १९७९ साली तेथील सरकारने त्यांच्या देशातील धार्मिक कट्टर गटाविरोधात लढण्यासाठी युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाची मदत घेण्याचे ठरवले आपल्या विचार सरणीचा गट प्रबळ होत आहे हे बघून अमेरिकेने तेथील धार्मिक गटांना लष्करी आर्थिक मदत केली या गटांना सक्षम केले तर कम्युनिष्ट गट प्रबळ होणार नाही असा विचार करत अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी अफगाणिस्तानच्या अंतर्गत कलहात उडी घेतली आणि तालिबानची निर्मिती झाली या तालिबान मुळे अफगाणिस्तानची कशी वाट लागली आहे हे आपण जाणतातच व्हिएतनाम या देशातील संघर्ष आणि त्यातील अमेरिकेचा हस्तक्षेप यामुळे झालेले नुकसान आपणास माहिती असेलच जगात कुठेही छोटेसे काही घडले की मानवी हक्काच्या नावाने गळा काढणाऱ्या अमेरिकेला सौदी अरेबियातील मानवी हक्काचे उल्लंघननं मात्र दिसत आहे आपल्याकडे अनेकजण इस्राईलचे कौतुक करतात मात्र ते विसरतात इस्राईल शेजारील देशांवर दादागिरी करतो कारण अमेरिकेचे ५१ वे राज्य असावे इतक्या मोठ्या प्रमाणत अमेरिका इस्रायलला मदत करते अमेरिकेच्या मदतीशिवाय इस्राईलचे अस्तिवाच राहणार नाही अमेरिकेच्या मदतीने  इस्राईल दादागिरी करताना मुस्लिम समाज बांधवांच्या  मक्का , मदिना नंतर तिसऱ्या क्रमांकाच्या पवित्र असणाऱ्या मशिदीवर हल्ला करण्यास देखील कमी करत नाही  अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच १९७१ साली बंगालच्या उपसागरात तिसऱ्या महायुद्ध सुरु होण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती 
          मी येथे अमेरिकेचे कृष्णकृत्य सांगत असलो तरी अमेरिकेच्या विरुद्ध बाजूला असणारा रशिया देखील
धुतल्या तांदुळासारखा नाही त्यांनी देखील अनेक काळी कृत्ये केली आहेत या वर्चस्वाच्या लढाईत मात्र युक्रेन अफगाणिस्तान , इराक , व्हिएतनाम सीरिया , बांगलादेश आदी देशांच्या फ़ुटबाँल होतो तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत होते हा खेळ ज्या महासत्ता खेळतात त्यांना मात्र या खेळामुळे काहीच नुकसान होत नाही अनेकदा हा खेळ त्यांच्या मुख्य भूमीपासून दूर होतो परिणामी त्यांचे सैन्य वगळता अन्य समाजजीवनावर काहीही परिणाम होत नाही ते काही यात भरडले जात नाही किंबहुना झालाच तर त्यांच्या फायदाच होतो आणि करणारे नामानिराळे रहातात हेच दुःख आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?