बुडत्याला काडीचा तर पाकिस्तानला चीनचा आधार

     

       आपल्याकडे बुडत्याला काडीचा आधार अशी म्हण आहे,  एखादा मोठा संकटात असताना त्यास केलेली छोटीसी मदत देखील खूप महत्वाची ठरते . असा या म्हणीचा अर्थ आहे .  सध्याचा काळात या म्हणीचा अनुभव पाकिस्तान घेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पाकिस्तानच्या बाबतीत ही काडीची भूमिका बजवात आहे आपले शत्रू राष्ट्र चीन . चीनने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दोन गोष्टींबाबत मदत केली एक गोष्ट शास्त्रांबाबत होती तर दुसरी होती आर्थिक विषयक पाकिस्तानचे सौदी अरेबिया सारखे मित्र पाकिस्तानमधील गुंतवणुकीबाबत नकारात्मक विचार करताना तसेच दुसरा मित्र तुर्कीये ( तुर्की ) स्वतःच्या देशांतर्गत समस्येत व्यस्त असताना चीनची मदत पाकिस्तानला खूप मोठी साह्य करणारी ठरत आहे स्वामी समर्थांच्या जे जे आपणासी ठाव ते सकळांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन 
         तर पाकिस्तानाने चीनकडून ३ अब्ज अमेरिकी डॉलर कर्जाची मागणी केली आहे . चीनमध्ये सुरु असणाऱ्या हिवाळी  ऑलम्पिक नांतर  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनच्या प्रशासकीय व्यवस्थेतील नोकरशहांशी या बाबत बोलणी करणार आहे . या मदतीखेरीज पाकिस्तानला चीन अनेक क्षेत्रात गुंतवणूक करेल अशी आशा आहे . अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार पाकिस्तानकडे आजमितीस फक्त १७ अब्ज अमेरिकी डॉलर इतकाच परकीय चलनाचा साठा आहे (याउलट भारताकडे हा मजकूर लिहीत असताना ६०० अब्जा पेक्षा 
परकीय चलनाचा साठा आहे ) तोही पाकिस्तानने मोठ्या व्याजदरांवर घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी वेगाने खर्च होत आहे सध्या पाकिस्तानवर १२७ अब्ज अमेरिकी डॉलरचे कर्ज आहे पुढील वर्षात जर पाकिस्तानला २० अब्ज अमेरिकी डॉलर न मिळाल्यास पाकिसनला स्वतःच्या देशाचा गाडा हाकण्यास अत्यंत अडचणी येतील . हे टाळण्यासाठी आज पाकिस्तान जगभरात ठीकठीक ठिकाणी फिरत आहे त्याचाच एक भाग  म्हणून  पाकिस्तान त्यांच्या मोठा मित्र असणाऱ्या चीनकडे मदतीची याचना करत आहे या आधी विविध माध्यमातून चीनने पाकिस्तानला ११ अब्ज अमेरिकी डॉलरची मदत केलेली आहे ज्यामध्येव्यापारी तत्वावर दिलेले कर्ज , परकीय गंजाजळीस साह्य होईल असे अर्थसाह्य तसेच एक सुरक्षा  ठेव  यांचा समावेश होतो त्याच प्रामणेडिसेंबर २०२० मध्ये  सौदी अरेबियाचे कर्ज चुकवण्यासाठी चीनने पाकिस्तानला एका रात्रीत दीड  अब्ज अमेरिकी डॉलरचे कर्ज दिल्याचा इतिहास आहे 
            हे कमी काय म्हणून चीन पाकिस्तानला येत्या काळात आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी अधिक वेगाने जाऊ शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची मदत करू शकतो  अशी भीती आंतराष्ट्रीय माध्यमांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे गेल्याच आठवड्यात चीनने आण्विक क्षमता असणारे  होउ इत्झार  हे शास्त्र विकले होते ते पण भारताने  दहा हजार कोटी रुपयांच्या होउ इत्झार बंदुका घेतल्यामुळे . ही चढाओढ इथवरच थांबत नाहीये भारतानेरशियाकडून नोव्हेंबर २०२१ मध्ये  अत्याधुनिक एस ४०० ही  आधुनिक शस्त्रात्रे घेतल्यामुळे आवाजापेक्षा बऱ्याच प्रमाणात अधिक वेगाने जाणारी डी एफ १७ ही  क्षेपणास्त्र प्रणाली चीनने पाकिस्तनला दिली डी एफ १७ ही  क्षेपणास्त्र प्रणाली सुमरे २५०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद आवाजाच्या पाच ते दहापट वेगाने जाऊन करू शकते अशी माहिती विविध माध्यमांतून मिळत आहे मात्र ची चीनने विकसीतकेलेली क्षेपणास्त्र प्रणाली असल्यामुळे या माहितीबाबत काहीही ठोस सांगता येणे अशक्य आहे हि सरंक्षण प्रणाली चीनने २०१६ मध्ये विकसित केली आहे एका अंदाजानुसार चीनने स्वतःच्या सरंक्षण व्यवस्थेतडी एफ या संरक्षण प्रणालीचा समावेश केला आहे एस ४००  ही क्षेपणास्त्र प्रणाली जमिनीवरून
हवेत मारा करू शकते या प्रणलीद्वारा वेगवेगळी रॉकेट ४० ते ४०० किमीच्या अंतरात सोडता येऊ शकतात तसेच हे क्षेपणास्त्र बॉम्ब ,विमान काही प्रकारची क्रूझ  आणि बेलॅस्टिक क्षेपणास्त्र यांना निकामी करू शकते आज पाकिस्तानकडे असणाया हवाई सरंक्षण प्रणालीची  अधिकत्तम मर्यादा ३०० किमीची आहे त्या पेक्षा १०० किम अधिकची मर्यादा आपल्याकडे आहे यामुळे आपल्या सरंक्षणासाठी पाकिस्तान चीनकडून ही क्षेपणास्त्र घेत आहे आवाजाच्या वेगापेक्षा पाचपट आणि त्यापेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्रांना HYPERSONIC MISSILE म्हणतात ही क्षेपणास्त्र अत्यंत वेगात जाणारी असल्याने रडाराला चकवा देऊ शकतात चीन खूप वर्षापाससून  HYPERSONIC MISSILE प्रणाली वापरत आहे त्यामुळे तिची शक्तिस्थाने आणि कमकुवत दुवे त्यांना माहिती आहेत आजमितीसभारताकडे ही प्रणाली आहे रशियाकडून मिळणार असणारी एस ४०० क्षेपणास्त्र आपणास एप्रिल २०२२ मध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भारताने संरक्षण व्यवस्थेकडे  अधिक गंभीरपणे बघण्याची गरज समजून येत आहे 
पाकिस्तान स्वतः काहीही नाही तो ज्या काही गमजा मारतोय त्या चीनमुळेच त्यामुळे या घटना आपणासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?