श्रीलंकेचा पाय खोलात

   

    आजमितीस  काही मोजक्या वृत्तवाहिन्यांच्या अपवाद वगळता सर्व भारतीय वृत्तवाहिन्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाबाबत बॉलिवूडचा चित्रपट वाटावा अश्या पद्धतीने वार्तांकन करत असताना,  आपल्या भारतापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या  निसर्गाचे अभूतपूर्व देणे लाभलेल्या आणि ज्याच्या सरकारच्या रेडिओवरून वाजवण्यात येणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांनी एकेकाळी समस्त भारताला वेड लावले होते अशा श्रीलंका आर्थिकदृष्टया प्रचंड अडचणीत आला आहे .  बुधवार २३ फेब्रुवारी रोजी  देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला अजून घसरण्यास हातभार लागावी  अशी घडामोड  घडली.  कोलोंबो शेअर बाजार पहिल्यांदा  ५  टक्कयांनी आणि  नंतर साडे सात टक्क्यांनी  असे दोनदा घसरल्याने  दोन्ही वेळेस कोलोंबो शेअर मार्केटमध्ये लोवर सर्किट लावावे लागावे होते जेव्हा शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात घसरतो,  तेव्हा गुंतवूणूकदारांचे अजून नुकसान होऊ नये , यासाठी
काही काळ शेअर बाजरातील व्यवहार बंद ठेवले जातात त्यास लोवर सर्किट म्हणतात.  ही बाब लक्षात घेता,  या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येते . एकीकडे पुरेसे परकीय चलनाचा साठा नसल्याने आधीच प्रचंड अडचणीत असलेल्या श्रीलंकेला हे दुहेरी संकट फारच त्रासदायक आहे 
       हा मजकूर लिहीत असताना उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक इंधन जास्तीत जास्त काळ वापरता यावे,  यासाठी देशभरत अधिकृतपणे  सव्वा तास लोडशेडिंग करण्यात येत आहे या अधिकृत लोडशेडिंगची घोषणा तेथील ऊर्जामंत्र्यांनी केली आहे या लोडशेडिंगच्या घोषणेमुळे तेथील आर्थिक स्थिती किती धोकादायक स्थितीत पोहोचली आहे याचा अंदाज येत आहे आजमितीस श्रीलंकेतील दर ४ श्रीलंकन लोकांपैकी १ म्हणजेच २५ % लोकसंख्या गरिबीरेषेखाली राहत आहे मानवास जगण्यास आवश्यक असणाऱ्या प्राथमिक गोष्टींचीही तिथे प्रचंड टंचाई आहे परिणामी तेथील महागाईने सर्व सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे . रक्कमेच्या विचार करता फारसे कर्ज श्रीलंकेवर नसले तरी मुळातच लहान असणाऱ्या श्रीलंकन अर्थव्यस्थेचा विचार करता,  त्याचे जीडीपी आणि कर्ज याचे प्रमाण भयानक स्थितीत पोहोचले आहे श्रीलंकेवर असणाऱ्या कर्जापैकी सुमरे ३३ % कर्ज सध्याचा जगात पठणी सावकाराची भूमिका करणाऱ्या चीनचे आहे. आफ्रिका खंडातील अनेक देश चीनच्या या सावकारीच्या विळख्यात प्रचंड बुडाले आहेत ज्यात दुर्दैवाने श्रीलंका या देशाशी भर पडणार असल्याची दाट शक्यता आहे जी भारतासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे 
      भू राजकीय स्थानाचा विचार करता श्रीलंका अत्यंत मोक्याचा स्थानी वसले आहे जागतिक व्यापाराचा विचार करता जगात   सगळ्यात जास्त व्यापारी मालाची मालवाहतूक श्रीलंकेच्या आसपासच्या परिसरातून होते त्यामुळे श्रीलंका भारताचा शत्रू असणाऱ्या  चीनची आर्थिक वसाहत होणे भारताला आर्थिक आणि सरंक्षणचा विचार करता कदापि परवडणारे नाही आजकल भारत ब्रिटिशांची झाला आताशी राजकीय वसाहतवादाचा प्रकार बंद झाला
असून राजकीय स्वतंत्र मात्र आर्थिदृष्ट्या पूर्णतः परवलंबी असा नवा वसाहतवादाचा प्रकार उदयास आला आहे ज्यासाठी चीन विशेषरित्या कुप्रसिद्ध आहे  आहे श्रीलंका जर यशस्वीपणे या र्थिक संकटातून बाहेर ना पडल्यास चीनची आर्थिक वसाहत म्हणून श्रीलंका ओळखली जाऊ शकते आजमितीस  श्रीलंकेचे अत्यंत मोक्याच्या स्थानी असणारे हबबनपोट्टा हे बंदर याच कारणासाठी ९९ वर्षासाठी चीनच्या ताब्यात गेले
श्रीलंका अय आर्थिक दलदलीत फासण्याआधी तेथील विद्यमान सरकारच्या (ज्यात मोठा भाऊ राष्ट्रपती धाकटा भाऊ पंतप्रधान तसेच मंत्रिमंडळात निम्मे लोक फॅमिलीतील आहेत ) एका निर्ययामुळे चीन आणि श्रीलंका यांच्यातील संबंधात कटुता आली  होती तेथील सरकारने स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोध असताना देखील खर्च कमी करण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांच्या घाट घातला ज्यातील बहुसंख्य चीनकडून निर्यात करण्यात आली.  श्रीलंकेच्या शेतीविषयक प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीत ती श्रीलंकेसाठी अयोग्य ठरली मात्र चीन हि खते माघारी घेण्यास तयार नव्हता दोन्हीदेशानी हा मूडप्रतिष्ठेचा केला होता ज्यामुळे त्याच्यातील सांधा काहीसे दुरावले आधीच परकीय चलनाच्याअपुऱ्या  साठ्यामुळे अडचणीत आलेल्या श्रीलंकेला येथे देखील नुकसान सहन करावे लागले उद्या श्रीलंका  चीनची कॉलनी झाल्यास याचे उते चीन काढणारच श्रीलंकेच्या या गोष्टीचा तोटा आपणस होणारच 
आपल्यानंतर एका वर्षाने ब्रिटीशांपासून स्वतंत्र्य झालेल्या आणि इंडो युरोपियन भाषाकुळातील एक भाषा असणाऱ्या  सिंहली ही प्रमुख भाषा असणाऱ्या या देशासी आपले पुर्वापार घनिष्ठ सबंध आहेत. रामायणाचा संदर्भसोडून त्यांचा रेडीओ आपल्याकडे एक मनोरंजनाचा उत्तम पर्याय होता. त्यांचा अंतर्गत यादवीमुळे आपण आपला एक पंतप्रधान गमवला. अनेक भारतीय वंशाचे लोक तिथे राहतात.ब्रिटीश राजवटीत आपल्या येथून अनेक लोक तिथे गेले. भारताबरोबर श्रीलंका बिमस्टेक सार्क आदी अनेक संघटनांचा सदस्य आहे. त्यामुळे तेथील अरिष्टेचा आपल्यावर.देखील परीणाम होणारच, हे सुर्यप्रकाश्याईतके सत्य आहे. गरज आहे तो कमी कसा होईल,हे बघण्याची

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?