नाशिक जिल्ह्याचा बुद्धिबळ संघ ठरवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

   


    आपल्या पैकी बहुतेक सर्वांनाच कोणत्या तरी संस्थेचे खेळाचे प्रतिनिधित्व करण्यास आवडते आपण अमुक एका संस्थेचे प्रतिनिधित्व करतोय हे सांगताना अनेकांना स्वर्ग दोन बोटेच शिल्लक राहतो येन केन प्रकारेण आपल्याला एखाद्या संस्थेचे प्रतिनिधित्व करायला मिळावे यासाठी अनेकजण जीवाचे अक्षरशः जीवाचे रान करतात , त्यातही हे  प्रतिनिधित्व बुद्धीचे श्रेष्ठत्व  सिद्ध करणाऱ्या बुद्धिबळ सारख्या खेळातील असेल तर मग काय विचारायलाच नको अनेकांना जग जिंकल्याचाच अनुभव असतो तो आपल्या सुदैवाने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेमुळे आपणस तो अनुभव मिळणार आहे नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना येत्या र्तविवारी तो अनुभव घेण्याची संधी देत आहे 

 महाराष्ट्र राज्याच्या बुद्धिबळ संघाच्या निवडीसाठी , पाठवण्यत येणारा  नाशिक जिल्ह्याचा   बुद्धिबळ संघ ठरवण्यासाठी ,  नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . रविवार १३ फेब्रुवारी रोजी ही बुद्धिबळ स्पर्धा होईल .यात पहिल्या चार जणात  येणारे पुरुष आणि महिला खेळाडू नाशिक येथे होणाऱ्या  महाराष्ट्राच्या संघ निवडीसाठी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील  महाराष्ट्र संघ निवडीची स्पर्धा कधी होईल याची घोषणा नंतर करण्यात येणार आहे . ही स्पर्धा विठाई बेकर , विठ्ठल रुक्मणी मंदिर जवळ सावंत माळी रोड विधाते नगर येथे होणार आहे या साठी १२ फेब्रुवारी पर्यंत पूर्व नोंदणी आवश्यक असून स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी स्पर्धेच्या आधी नोंदणी होणार नसल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे  

       यासाठी https://forms.gle/8K2jjZ9RGTBrLiTw7 या लिंकवर संपर्क साधावा लागणार आहे  या  लिंकवर

नोंदणी केल्याशिवाय  स्पर्धेत अन्य कोणत्याही मार्गे सहभागी होता येणार नाही असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे  स्पर्धेच्या दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ९ वाजता होणे खेळाडूंवर बंधनकारक आहे        

      या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातील खेळाडूंना ३५० रुपये तर ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ३०० रुपये आकारण्यात येणार आहे पॆसे गूगल पे, फोन पे वा नेट बँकिंग मार्फत भरता येणार आहे गूगल पे  फोन पे साठी भूषण पवार  ७८४१९२४८१ वर संपर्क साधता येईल नेट बँकिंगसाठी भूषण पवार यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खाते क्रमांक  १३१४३४९५१९ आय एफ सी कोड : KKBK0001912 वर पैसे भरता येतील  अधिक माहितीसाठी bhushanpawar78419@gmail.com या ईमेल आयडीसह भूषण पवार  ७८४१९२४८१  विक्रम मालवणकर  ९३७१५०२००३ विनायक  वाडीले  ८८८८११९३५५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजनकाकडून करण्यात येत आहे अधिकाधिक खेळाडूंनी यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे

आपले बुद्धी चातुर्य दाखवण्याची या पेक्षा सुवर्ण संधीनजीकच्या भविष्यकाळात मिळण्याची शक्यता जवळपास नाही आहे त्या अर्थाने आपणस ही सुवर्ण संधी आहे बुद्धिबळ हा मनाचा खेळ समजण्यात येत असला तरी निरोगी शरीरातच निरोगी मन कार्यरत असते या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे त्या अर्थाने बुद्धिबळ खेळणे ही मनाबरोबर शरीराची देखील परीक्षा असते जर आपला एखादा हात दुखत असेल तर पाय फॅक्चर असेल अथवा सर्दी सारखी एखादी व्याधी असेल तर आपण योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करू शकत नाही याचा अनुभव आपणस असेल तसेच बुद्धिबळात मोठा वेळ बसावे लागते त्या राही ती पाठीची पण परीक्षाच असते  त्यामुळे आपला बौद्धिक क्षमतेसह शारीरिक क्षमतेची सुद्धा बुद्धिबळात चाचणी होते जी अन्य खेळात होणे निव्वळ अशक्यच मग काय घेताणाय ना भाग या स्पर्धेत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?