अकरा वर्षे महाप्रलयानंतरची


ही गोष्ट आहे 2011 मार्च 11 ची. स्थळ जपान देश. स्थानिक वेळेनुसार दुपारी पावणे तीनचा सुमार (जागतीक प्रमाणवेळेनुसार सकाळी पावणे सहा वाजता/भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकरा ) कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जपानमध्ये तब्बल 9.1 रिक्टर स्केलचा भुकंप झाला. जपानमधील आतापर्यतचा सर्वात मोठा भुकंप म्हणून या भुकंपाची नोंद घेण्यात आली. यामुळे जपानचे उत्तरेकडचे बेट काही सेंटीमीटर अमेरीकेकडे सरकले. मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली. जपानच्या अनेक अणूविद्यूत प्रकल्पामध्ये त्यामुळे समस्या निर्माण झाल्या .फुकूसीमा या अणूविद्यूत प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाल्याने समस्येत वाढ झाली. या दुर्घटनेला शुक्रवारी ११ मार्च रोजी वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि आर्थिक नुकसान झालेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

या नंतरच्या दहा वर्षात जपान पुन्हा एकदा अशरक्षः राखेतून उभा राहिला. नव्याने सुरवात करत भारताला बुलेट ट्रेन आदी विकासकामासाठी साह्य करत आहे. तसेच लष्करासाठी अमेरीकेवरील अवलंबत्व कमी करत स्वतःचे लष्कर उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेही जपानने या आधीही फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आहे. सन 1945 ला दुसऱ्या महायुद्धानंतर राख रांगोळी झालेल्या जपानने थोड्याच काळात बूट निर्मिती क्षेत्रात प्रचंड नाव कमावले. ते इतके
प्रचंड होते की, भारतीय चित्रपटश्रुष्टीत जपानच्या बूट निर्मितीवर एक गाणे देखील रचले गेले. ते गाणे म्हणजे " मेरा जूता है, जपानी, ................ फिर भी दिल है, हिंदूस्थानी". आणि तेही जेमतेम एका दशकाच्या अवधीत
जपानला आपल्या मनोरंजन क्षेत्रात मोठे नाव आहे. आता आतापर्यतचा काळ सोडता, " डोरेमाँन, निंज्जा- हातोरी, शिनचँन आदी व्यक्तीरेखांनी भारतीय टिव्हीपडदा व्यापून राहिला आहे. व्यवस्थापन क्षेत्राचा विचार करता जपानच्या व्यवस्थापनशास्त्रास वेगळे स्थान आहे असो या भूकंपापामुळे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा वेळात सुद्धा अल्पशा बदल झाला असे म्हणतात
जपानच्या या आपत्तीनंतर या सारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती (Natural disasters) आतापर्यत आलेले नाही. {कोरोना ही मानवनिर्मित आपत्ती ( Man-made disaster) आहे.} हे आपले सुदैवच म्हणायला हवे. यापुढेही असी आपत्ती आपल्यावर येवू नये, असी इश्वरचरणी प्रार्थना करत सध्यापुरते थांबतो .नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?