या बदलांना आपण तयार आहोत का ?

       


     "आमच्या प्रदेशात गेल्या १ हजार वर्षात अशा मुसळधार पाऊस झालेला नाही " हे विधान आचार्य अत्र्यांनी यांनी  कोणत्या लेखनात केलेले  भाषणात केलेले  विधान नाही  हे विधान केले आहे ऑस्ट्रेलिया या देशातील क्यिन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी . २२ फेब्रुवारीपासून  ऑस्ट्रेलिया देशाच्या पूर्व किनाऱ्यावर अतिशय मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे हा मजकूर लिहीत असताना ब्रिसबेन नदीच्या खोऱ्यातून सुमारे ६७ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहे आतापर्यंत ९ जणांचा यात मृत्य झाला आहे  अनेक भागांचा संपर्क तुटलाय काही भाग अंधारात बुडालाय . . आता मुसळधार पाऊस म्हंटल्यावर हे होणारच आपल्याकडे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागते तसेच किमान  पानास जणांचा मृत्यू होतो काही भागांचा विद्युत पुरवठा देखील खंडित होत होतो  त्या पार्श्वभूमीवर ९ मृत्यू आणि ६७ हजार लोक विस्थापित होणे आणि काही  भागाचा विद्युत  आणि डाळं वळणाचा संपर्क तुटणे सं काही विशेष नाही असे समजणे पूर्णतः चुकीचे ठरेल कारण तो देश भारतासारखा विकसनशील देश नाही तर पूर्णतः विकसित आणि लोकसंख्येची घनता अत्यंत कमी असणारा ऑस्ट्रेलिया हा देश आहे हे आपण लक्षात घेयला हवे तेथील माध्यमांनी ( हवामान तज्ज्ञांनी नव्हे ) यास रेन बॉम्ब असे नाव दिले आहे द गार्डियन या वृत्तपत्राने   याबाबत दिलेल्या बातमीनुसार दहा वर्षांपूर्वी २०११ साली आलेल्या पावसापेक्षा आताचा २०२२ चा पाऊस भयानक आहे तो पाऊस गेल्या ५०० वर्षातील भयानक पाऊस होता तर आताच्या पाऊस गेल्या १००० वर्षातील सर्वात मोठा पाऊस आहेलंडन शहारत एका वर्षात युरोपातील सर्वाधिक म्हणजे ६५० मिली पाऊस पडतो तर गेल्या आठवड्यात ब्रिसबेन  शहरात एका दिवसात  ७५० मिली इतका पाऊस झाला यावरून या पावसाची दाहकता दिसून येत आहे .तिथे अनेक ठिकाणी ओमोठ्या प्रमाणात पूर आला आहे . 

     सध्या  पडणारा पाऊस हा ऑस्ट्रेलिया या देशात पडतोय त्या  बाबत भारतात सांगण्याचे काय प्रयोजन? असा प्रश्न आपणास पडत असेल तर आपण चूक करताय . आपणासाठी ऑस्ट्रेलिया हा वेगळा देश असेल मात्र जागतिक हवामानाच्या विचार करता मानवनिर्मित  देश राज्य या संकल्पना  काहीच अर्थ नाही निसर्गासाठी फक्त दोनच भाग आहेत एका पाणी असलेला समुद्र आणि दुसरा जमिनीचा भूभाग. जगातील एका प्रदेशातील हवामानबदलामुळे दुसऱ्या भागातील हवामान सुद्धा बदलते . आपल्या पावसावर  परिणाम करणाऱ्या एल निनो आणि ला नीना हे समुद्रीप्रवाह कुठे उगम पावतात हे जर आपण पृथीच्या गोलावर बघितले तर आपणास हा मुदा अधिक व्यापक अर्थाने समजेल.  हे दोन्ही  प्रवाह  ऑस्ट्रेलिया या देशाच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या पॅसिफिक महासागरता चिलीच्या किनाऱ्यावर होतात.  पृथ्वी गोलाच्या विचार करता भारताच्या तंतोतंत नाही मात्र बऱ्याच प्रमाणत दुसऱ्या भागात हे समुद्रीप्रवाह निर्माण होतात आपल्याकडे जानेवारी डिसेंबर महिन्यात पावसला कारणीभूत असणाऱ्या पश्चिमी विक्षोप ( वेस्टर्न डिस्टबर्न ) ची निर्मितीची प्रक्रियेच प्रारंभ हा भूमध्य महासागरात होतो पृथ्वी गोलाचा विचार करता हा भूभाग  भारताच्या मुख्य भूमीपेक्षा बराच लांब आहे मात्र तो आपल्याकडे परिणाम करतो  परिणामी जगभरात होणारे बदल त्या त्या देशातील स्थानिक बदल आहेत त्याचे आपणस काय ? असा दृष्टिकोन ठेवणे चुकीचे आहे तर या स्थानिक बदलामुळे भारताच्या हवामानावर  विपरीत बदल तर होत नाहीना ? होत असल्यास त्याला तोंड देण्यास आपण सक्षम आहोत का ? याचा विचार करायला हवा 

ऑस्ट्रेलिया या देशात आता जो पाऊस पडतोय त्यासाठी ला नीना हा समुद्री प्रवाह काही अंशी जवाबदार असल्याचे ऑस्ट्रेलिया प्लस या वृत्तवाहिनीच्या बातमीत सांगण्यात आले आहे हा प्रवाह आता सक्रिय होत आहे परिणामी ऑस्ट्रेलिया या देशाच्या पूर्व किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यावर त्यास मोठ्या प्रमाणात बाष्प पुरवठा

होत असल्याने असा पाऊस पडत असल्याचे सांगण्यात येत आहे सध्याच्या वाढत्या तापमानामुळे हवा वेगाने गरम होत आहे  हि गरम हवा हलकी होऊन वातावरणात वरच्या थरात जाते परिणामी कमी दाबाच्या क्षेत्राच्या निर्मितीची संख्या गेल्या काही वर्षात वाढलेली आहे सध्याचा ऑस्ट्रेलिया देशात होणाऱ्या पावसामागे हेच कारण आहे  ला नीना हा समुद्री प्रवाह आणि आपल्या भारतातील पावसाचा अत्यंत जवळचा संबंध आहे त्या प्राश्वभूमीवर जून महिण्यात सुरु पावसाचा अंदाज घेऊन त्यानुसारच आपण नियोजन करायला हवे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?