इम्रान खान यांच्या भारताविषयी विधानाचा अन्वयार्थ

       


  भारत स्वातंत्र्यापासून जागतिक राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजवात आहे . स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक वर्षे  भारताने भारताबरोबर स्वातंत्र्य झालेल्या इतर देशांचा विचार करत त्यावेळच्या महासत्तांच्या भांडणात कोण्या एकाची बाजू ना घेता अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले . आपला विकासाचा मार्ग जरी काहीसा साम्यवादी विचारसरणीचा असला तरी,  अपान कधीही युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाच्या गटात पूर्णतः सहभागी झालो नाही . वेळप्रसंगी आपण युएससारच्या विरोधी गटातील अमेरिकेचीही मदत घेण्यास मागे बघितले नाही . भारताचे परराष्ट्र धोरण हे या महासत्तांच्या बाबतीत तटस्थ होते . दोन्ही महासत्तांपासून सारखेच अंतर राखत,  आपण  आपला स्वतंत्र नाम या परिषदेचा मार्ग निवडला . ज्याची चांगली फळे आता आपणस मिळत आहे . पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भारतीय परकीय धोरणाविषयीचे जाहीर वक्तव्य  याचीच साक्ष देत आहेत . 

     भारताच्या परराष्ट्र धोरणाची निर्मिती,  त्यास आकार हा पंडित नेहरूंनी दिला . याबाबत  त्यांच्याविषयी कितीही आकस असला तरी त्यांचे मोठेपण मान्य करावेच लागेल .  पाकिस्तानने त्यांच्या भू राजकीय स्थानाचा फायदा घेण्यासाठी आणि भारतावर कुरघोडी करण्यासाठी अमेरिकेच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला ज्याचे दृश्यस्वरूप म्हणजे आज होणारी पाकिस्तानची फरपट .  पाकिस्तानने १९७१ साली बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात भारताविरोधात अमेरिकेची मदत मागण्याचा प्रयत्न केला १९७९ साली युएसएसआरने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यावर याचा फायदा घेत भारतविरोधात कारवाया करण्यासाठी दहशतवादाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला

आज हाच दहशतवाद पाकिस्तानला अडचणीत आणत आहे आज संपूर्ण जगात पाकिस्तानची ओळख अमेरिकेचा मंडलिक देश अशीच आहे रशिया युक्रेन युद्धाच्या सुरवातीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाला भेट दिल्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानवर कित्येक डॉलरचा दंड लावला . पाकिस्तानच्या अमिरिकेतील राजदूताला देखील सहजतेने स्वीकारले नाही . या उलट स्थिती भारताची आहे 

          भारताने १ १९७१ च्या  युद्धात रशियाची मदत घेतली १९७० च्या आसपास देशातील अन्नधान्य टंचाईच्या वेळी अमेरिकेची मदत घेतली , राशिककडून अनेक संरक्षण शास्त्रते विकत घेतली आज देखील घेत आहोत  . तर अमेरिकेबरोबर आण्विक ऊर्जा निर्मितीत करार केला अमेरिकेच्या गटातील पश्चिम जर्मनीच्या मदतीने आपण अनेक अणुभट्या उभारल्या आहेत आज अमेरिकेत नासा आणि अनेक महत्त्वाच्या अमेरिकी संस्थांमध्ये मोठ्या पदावर बऱ्याच संख्यने भारतीय वंशाचे नागरिक काम करत आहेत  आर्थिक विकासाबाबत अमेरिका आणि सरंक्षण क्षेत्रासाठी रशिया असे धोरण राबवत भारत दोन्ही महासत्तांपासून सारखेच अंतर राखत स्वतःच्या विकास करत आहे .भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णतः एकाच देशाच्या बाजूने पूर्णतः झुकलेले आपणस आढळत  नाही.  नाही म्हणायला भारताचे परराष्ट्र धोरण काही काळ एका देशाकडे काहीसे अधिक झुकलेले आपणास  दिसते मात्र ते काहीच काळ.  तो मर्यादित काळ संपल्यावर दोन्ही महासत्तांपासून सारखेच अंतर राखणारा देश म्हणून भारत पूर्वरत होतो आज जगात भारताची प्रतिमा स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेला देश म्हणूनच आहे 

काही जण इम्रान खान याच्या विधानामागे   विद्यमान सरकारची परराष्ट्र नीती असल्याचे सांगतील,  त्यांना माझे सांगणे आहे की, आधीचे सरकार आणि आताचे सरकार पूर्णतः विरोधी विचारसरणीचे आले तरी भारताचं काय कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणात मोठ्या प्रमाणत बदल होत नाही आधीच्या सरकारांनी तयार केल्या पररराष्ट्र धोरणावरूनच विद्यंमान सरकारला मार्गक्रमण करावे लागते सरकारच्या विचारसरणीनुसार आधीच्या धोरणात अर्धा ते पाऊण टक्क्यांचा अपवाद वगळता मोठा बदल होत नाही अमेरिकेतील डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक या पक्षाची देशगांतर्गत धोरणे वेगवेगळी असली तर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासावरून ही गोष्ट आपणस सहजतेने लक्षात येते जी गोष्ट अमेरिकेला लागू होते तीच गोष्ट भारताला सुद्धा लागू होते सबब इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जे कौतुक केले त्यामागे फक्त विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच कष्ट आहेत असे नाही तर भाताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देणारे पंडित नेहरूंचे तेव्हढेच किंबहुना अधिकच कष्ट आहेत असे नमूद करावेच लागेल झाडाला फळ धरल्यावर त्याची निगा राखून त्यास अधिकाधिक किंमत कशी येईल ? याचा विचार करणाऱ्या बरोबर बी स्वरूपात पेरलेतल्या झाडाला फळ धारण सक्षम करणाऱ्या व्यकुंचे योगदान कसे विसरून चालेल पंडित नेहरूंचे  योगदान भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार करता बी  पेरणाऱ्या व्यकीइतकेच महत्वाचे आहे एकप्रकारे इम्रान खान यांनी पंडित नेहरूंच्या योगदानाला दिलेली हि पावतीच आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?