भारत इस्राईल मैत्रीचा नवा सेतू

       


   स्वातंत्र्यापासून जागतिक राजकारणात महत्वाची भूमिका घेणारा देश म्हणून भारत जगात ओळखला जातो स्वातंत्र्यानंतर स्वतःसारख्याच वसाहतवादातून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांचे नेतृत्व भारताने केले होते जगातील महासत्तांच्या रस्स्सीखेचीमध्ये आपल्या सारख्या नव स्वातंत्र्य देशांचे नाम या संघानेमार्फत भारताने नेतृत्व केले होते . महासत्तांच्या साठेमारीत या देशांची प्रगती  थांबू नये यासाठी भारताने प्रयत्न केले . त्याचाच पुढचा टप्पा आता भारत अमलात आणत आहे . या टप्प्यात भारत पहिल्या जगात मोडणाऱ्या देशांच्या नजरेला नजर लावत ताठ मानेने त्यांच्याबरोबर विविध करार करत आहे याच मालिकेला पुढे नेण्यासाठी २ एप्रिलला . इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट  भारताच्या तीन दिवशीय भेटीवर येत आहेत 

         इस्राईल,  पहिल्या महायुद्धात  ऑटोमन साम्राज लयास गेल्यानंतर युनाटेड किंगडम   (इंग्लड )ने युरोपातील  ज्यु समाजबांधवाना दिलेल्या आश्वासनानुसार सप्टेंबर १९४८ ला अस्तित्वात आलेले ज्यू  धर्म हा प्रमुख धर्म असलेले धर्माधिष्टीत राष्ट्र . जे त्यांच्या आक्रमक  आक्रस्ताळपणे करत असलेल्या लष्करी कारवायांमुळे आपल्याकडे अनेकांना आदर्शवत वाटणारा देश .ज्या देशासाठी आमच्या पासपोर्ट वैध नाही अशा स्पष्ट उल्लेख स्वतःच्या पासपोर्टवर  आता आता पर्यंत अनेक देश करत होते  तो देश म्हणजे इस्राईल . अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाला आव्हान देत कृषी क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारा देश म्हणजे इस्राईल . सुरक्षा विषयक उपकरणे आणि गुप्तचर संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जगात आपले स्थान निर्माण करणारा देश म्हणजे इस्राईल . ज्या देशांच्या खेळाडूंना मारण्यासाठी ऑलम्पिलमध्ये खेळाडूंवर हल्ला करण्यात आला तो देश म्हणजे इस्राईल . जगाच्या लष्करी इतिहासात अत्यंत  वेगवान आणि अचूकतेने शास्त्रांच्या मारा करत जिकंलेल्या युद्धाचा इतिहास असणारा देश म्हणजे इस्राईल . 

        या  इस्राईलला एक स्वतंत्र देश म्हणून भारताने सन १९५० सालीच मान्यता दिली मात्र औपचारिकपणे राजनैतिक संबंध स्थापन केले नाही   भारत स्वातंत्र्य झाला . त्यावेळी भारताला औद्यगिकतेला पुढे नेण्यासाठी नैसर्गिक इंधनाची मोठी गरज होती . ज्यासाठी आपण मोठ्या प्रमाणत आखाती देशांवर अवलूंबून होतो . आखाती देशांचा प्रमुख शत्रू म्हणजे इस्राईल .त्यामुळे इस्राईलबरोबर मैत्री स्थापित करून आपण आखाती देशांबाबरोबर शत्रुत्व घेऊ शकत नव्हतो . तसेच भारताची भूमिका शांततेची धार्मिकतेविरुद्धची होती ज्याच्या विरोधात  इस्रायलची उघड उघड भूमिका होती.त्यामुळे आपण इस्रायलला जरी मान्यता दिलेली असली तरी राजनैतिक संबंध स्थापित केले नाहीत भारताने इस्राईलबरोबर राजनैतिक संबंध २९ जानेवारी १९९२ ला स्थापित केले आज २०२२ साली त्यास ३० वर्षे पूर्ण झालेली आहेत १९५३ साली इस्रायलची एक वकिलात ( कॉनस्लेट) मुंबई  येथे स्थापित करण्यात आली होती . जी १९९२ साली पूर्णतः राजनीतिक संबंध स्थापित झाल्यावर तिचे रूपांतरण  हायर जनरल कॉनस्लेट मध्ये करण्यात यऊन कोलकाता या शहारत अजून एक वकिलात उघडण्यात आली तर नवी दिल्लीत दूतावास

उघडण्यात आला .आजमितीस इसाइलमध्ये सुमारे ८० ते ९० हजार भारतीय वंशांचे ज्यू धर्मीय नागरिक राहतात या ज्यू धर्मीयांमध्ये मराठी भाषिक ज्यू मोठ्या संख्येने आहेत या मराठी भाषिक ज्यू लोकांना बेणे इस्रायली अशी ओळख आहे या बेन्यू इस्रायली खालोखाल ईशान्य भारतातून ज्या धर्मीय मोठ्या संख्येने इस्रायलला स्थायिक झाले आहेत .   भारतने या आधी इस्राईलकडून शेतीविषयक सुरक्षा विषयक तंत्रज्ञान आयात केले आहे आणि अजूनही संरक्षण विषयक तंत्रज्ञान आयात करत आहे . इस्राईलच्या पंतप्रधानाच्या प्रास्तवित भारत भेटीत यावर काही करार होण्याचे प्रास्तवित आहे  

      अमेरिकेचे मागचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या  टप्यात इस्रायलला अधिकाधिक आखाती देशांनी मान्यता देऊन. राजनॆतिक संबंध प्रस्थापित व्हावेत,  म्हणून इस्राईलचे या देशांशी करार केले.  इब्राहिम एकोर्ड म्हणून हे करार प्रसिद्ध आहेत.  आखाती प्रदेशात जन्माला  आलेलूया इस्लाम , ज्यू , आणि ख्रिश्चन या धर्मांना इब्राहिम रिलिजन असे संबोधतात यावरूनच कराराला नाव देण्यात आले आहे या धर्मांच्या धर्मग्रंथात एकमेकांना पूरक ठरतील अश्या अनेक बाबी आहेत म्हणून या धर्मांना त्याच्यातील सामायिक दुवा असणाऱ्या इब्राहिम या देवाच्या दूतावरून इब्राहिम रिलिजन असे म्हणतात . या इब्राहिम एकॉर्डमुळे भारताचा मित्र असणारा युनिटेड अरब अमिरेट्स (यु ए  इ )देशील इस्राईलच्या मित्र झाला आहे  तसेच बांगलादेशने त्यांच्या पासपोर्टवरील हा पासपोर्ट इस्राईलसाठी वैध नाही असा उल्लेख काढल्याने  भारत इस्राईल या देशातील संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे आज २०२२ साली पाकिस्तान आणि काही उत्तर आफ्रिका भागातील काही  देशांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही देशांच्या पासपोर्टवर असा उल्लेख नाही आजमितीस इस्लामी देशांचा प्रमुख

अशी ओळख असणारा सौदी अरेबिया , कतार युएई आदी अनेक देश इस्राईलबरोबर राजनीतिक संबंध प्रस्थपित करता विविध बाबींबत करार करत आहे . भारताची नैसर्गिक इंधनाची गरज भागवणारे आखाती देशच इसारिअलबरोबर राजनीतिक कारणे करत असल्याने भारताच्या स्वातंत्र्यच्या वेळी भारतावर असणारे दडपण नाहीसे झाले आहे ज्याचे प्रत्यंतर भारत इस्राईल संबंध दृढ होण्यात आपणस दिसत आहे एप्रिल महिन्यातील ही राजकीय भेट त्यातीलच एक साखळी आहे ज्याचा भारताला खूप मोठ्या प्रमाणत फायदा होईल हे सूर्य प्रकाश्याइतके स्पष्ट आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?