महाराष्ट्र एसटी कर्मचारी आता तरी कामावर या !

         

   गेल्या सव्वाचार महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबतच्या त्रिसदस्यीय अहवालाला अखेर मंत्रिमंडळाने संमती दिली . ज्यामध्ये एसटीचे राज्यशासनात पूर्णतः विलीनीकरण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे . आता तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापुढे अर्थात विधानसभा आणि विधान परिषदेपुढे ठेवण्यात येईल . या आधीच्या इतिहासाप्रमाणे विरोधी पक्षाकडून त्यास विरोध होईल . विद्यमान सरकारला एसटीचे खासगीकरण करायचे आहे , म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत नकारात्मक अहवाल तयार केला असा आरोप होईल  .आमच्या सरकारने एसटीच्या हितासाठी घेतलेले निर्णय विद्यमान सरकाने कसे रद्द केले ज्यामुळे एसटीचे कसे नुकसान झाले याबाबत मोठ्या प्रमाणत रन उडवले जाईल . त्याला भुलून मूळ आंदोलनाचे नेर्तृत्व करणारे नेते संपातून बाहेर पडल्यावर आंदोलन अक्षरशः ताब्यात घेणाऱ्या नवनेतृत्वाखाली आम्ही आमचे आंदोलन अधिक प्रखर करू अश्या घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतील . आणि ते काहीसे भरकटले जे लक्ष्य कधीच हाती लागणार नाही अश्या गोष्टीच्या मागे लागत आज नाही तर उद्या आपल्या मागण्या पूर्ण होतील या खोट्या  आशेवर एसटी कर्मचारी आंदोलन सुरूच ठेवण्याची दाट शक्यता आहे जे अत्यंत चुकीचे आहे 
            मुळात एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू होण्याची नितांत आवश्यकता आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा म्हणून परिचित असलेल्या एसटीचा जनाधार आता सुटत चालला आहे .पूर्वी महाराष्ट्रातील जनतेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आस्था होती .त्यांचे प्रश्न सुटावे अशे महाराष्ट्रातील जनतेला मनोमन वाटत होते आता ही भावना बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे . आता जर महाराष्ट्राच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत जनतेच्या भावना काय आहेत याबाबाबत जर सर्वेक्षण  झाले तर आस्था असणाऱ्या व्यक्तीपेक्षा आस्था नसणाऱ्या व्यक्तीचीच संख्या अधिक असेल याबाबत कोणाला शंका नसावी . हि आस्था जर अजून कमी होण्याची नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू होण्याची गरज आहे . 
         एसटीवर फक्त एसटीमध्ये काम करणाऱ्या लोकांचेपोट अवलुबुन असते असे समजणे हे भाबडेपणचे ठरेल एसटी जेव्हा  बस स्टॅण्डवर थांबते , तेव्हा कितीतरी विक्रते त्यांच्या वस्तू विकायला एसटी बसमध्ये येतात . एसटी
कर्मचाऱ्यांचा आंदोलनामुळे एसटी सेवा विस्कळीत झाल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे . मी एसटीच्या आता बंद झालेल्या २०० रुपये भरून सवलतीचे कार्ड घ्या आणि वर्षभरतील एसटीच्या प्रवाश्यावर १० % सूट मिळावा आणि ४ दिवसाच्या आवडेल तिथे मोफत प्रवास या योजनांच्या फायदा घेत महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात फिरलो आहे  त्यावेळी आलेल्या अनुभवानुसार सांगतोय एसटीवर अप्रत्यक्षरीत्या अवलूंबून असणारे अनेक घटक आहेत ज्यांना त्याची काही चूक नसताना एसटी कर्मचाऱ्याचा आंदोलनाचा फटका बसलेला आहे .यांचा आर्थिक आकडा काढल्यास समोर येणारे चित्र फारसे सुखावणारे नसेल यात तिळमात्र शंका नसावी . 
          एसटी संपामुळे महाराष्ट्राचे एक मोठे नुकसान होत आहे ज्यावर फार कमी बोलले जाते असे मला वाटते ते म्हणजे इतर राज्यातील एसटी महामंडळाला आपले नेटवर्क अधिक सशक्त करण्याची मिळणारी संधी आजमितीस नाशिक जिल्ह्यतील त्रंबकेश्वर तालुका , अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदी हाताच्या बोटावर मोजता येतील अश्या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्यत्र सर्वत्र इतर राज्यातील एसटीने आपले चांगले बस्तान बसवले आहे कोल्हापूर पंढरपूर उस्मानाबाद आदी कर्नाटक सीमेवरील गावापर्यंत गुजरात एसटी आपली सेवा देते गुजरात सीमेपासून बऱ्याच लांब असणाऱ्या वाडा तालुक्यात सुद्धा गुजरातची बस सेवा पुरवते . रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान पुण्यातील स्वारगेट या बस स्थानकांवर उभे राहिल्यास आपण महाराष्ट्रात आहोत की कर्नाटकमध्ये असा प्रश्न पडावा इतक्या मोठ्या प्रमाणत कर्नाटकाच्या बसेस संप नसताना  उभ्या असलेल्या मी पहिल्या आहेत आपुणे
जिल्ह्यातील पुरंदर तालुकयातील नीरा या ग्रामपंचायत असणाऱ्या गावाहून बेळगावासाठी कर्नाटक एसटी बस सेवा पुरवते कर्नाटकची निपाणी औरंगाबाद हि बससेवा या अश्याच घुसखोरीची उकृष्ट उदाहरण  ता महाराष्ट्राच्या एसटीच्या संप काळात तर त्यांना सर्वच रान  मोकळे खाजगी वाहतूकदारांवर आपण काही बंधने अनु शकतो मात्र यावर आपण बंधने कशी आणणार ? यावर उपाय एकेच महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा रुजू होणे हा एकाच .कोणताही प्रश्न ताणायची एक मर्यादा असते त्यापेक्षा तो प्रश्न ताणण्यात काही अर्थ नसतो एसटी संपाबाबत ती मर्यादा कधीच ओलांडून गेली आहे त्यामुळे गरज आहे संप  मागे घेण्याची 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?