बारक्या डोळ्याचा न बोलवता आलेला भारताचा पाहुणा

   

            गेल्या शुक्रवारी २५ मार्चला एका बारक्या डोळ्याच्या न बोलवता आलेल्या एका परदेशी पाहुण्याने भारताच्या परराष्ट्र खात्यांचा पाहुणचारचा आस्वाद घेतला .चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीझ हे त्या पाहुण्याचे नाव . पाकिस्तानच्या राजधानीत अर्थात इस्लामाबाद येथे मंगळवार आणि बुधवार रोजी झालेल्या, ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीझ  येथे आमंत्रित सदस्य म्हणून हजेरी लावल्यावर बीजिंगला जात असताना त्यांनी नवी दिल्लीत हजेरी लावली . पाकिस्तानमधून नवी दिल्लीत येत असताना त्यांची काही मिनिटे अफगाणिस्तानला देखील भेट दिली नवी दिल्लीत आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल यांच्याबरोबर चर्चा करून ते  नेपाळ या देशाच्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी काठमांडू येथे निघून गेले . चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीझ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर देखील चर्चा करण्याची इच्छा होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ती होऊ शकली आंही परराष्ट्र खात्याच्या अंदाजानुसार चीनचे परराष्ट्र मंत्री  वांग यीझ हे एप्रिलच्या मध्यावर किंवा  एप्रिलच्या अखेरीस भारत भेटीवर येण्याची शक्यता होती त्यांची सध्याची भेट ही पूर्वनियोजित नव्हती तर अचानक ठरलेली बैठक होती 
         या २०२२ वर्षी भारत चीन यांचा सहभाग असणारी ब्रिक्स (ब्राझील . रशिया , इंडिया , चीन साऊथ आफ्रिका   ) तसेच आरआयसी (रशिया इंडिया चीन ) या  दोन गटांची अधिवेशन चीनमध्ये होणार आहेत त्यावेळी भारताचे प्रतिनिधित्व करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी याना करताना काही अडचण येऊ नये यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री  वांग यीझ  यांनी हा पूर्व नियोजित नसलेला भारताचा दौरा केल्याचा अंदाज आंतराष्ट्रीय राजकारण्यांच्या जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे चिंचा या बैठकीत भर सीमावाद तेथील भांडणे बाजूला ठेवून अन्य बाबींवर लक्ष एकत्र करून संबंध सुधारण्यावर होता तर भारताच्या मते सीमावाडचा तिढा सुटल्याशिवाय तिथे शांतात प्रस्थापित झाल्याशिवाय अन्य मुद्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही भारत चीन सीमावादावर चीनशी चर्चा करण्यावर भारताचा भर राहिला या धावत्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार
सीमावाद अफगाणिस्तानमधील स्थिती रशिया युक्रेन आदी विविध विषयावर सुमारे साडेतीन तास चर्चा झाल्याचे नंतर परराष्ट्र मंत्रालयामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले 
                 या दौऱ्यावर येण्याच्या आधी पाकिस्तानमधील मुस्लिम हा प्रमुख धर्म असणाऱ्या  ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीझ या संघटनेच्या बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री  वांग यीझ यांनी  काश्मीर विषयक वादग्रस्त विधान केले होते .ज्याचा भारताने  अधिकृतपणे  निषेध नोंदवला होता पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनबरोबर चकमक उडाल्यावर या दोन देशातील परराष्ट्र मंत्र्यांची हि पहिलीच ऑफलाईन बैठक होती या आधी डिसेंबर २०१९ मध्ये दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्री एकमेकांशी बैठक झाली होती भारताने गेल्या वर्षी अफगाणिस्तानविषयी चर्चा करण्यासाठी अफगाणिस्तानच्या शेजारील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती ज्यामध्ये भारताने चीनला आमंत्रित केले होते त्याला चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अनुपस्थिती दाखवली होती त्या पार्श्वभूमावर हा दौरा बघायला हवा 
भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास जपानचे पंतप्रधानानी  १९ आणि २० मार्चला भारताला भेट दिल्यावर , ऑस्ट्रेलिया देशांच्या पंतप्रधानांनी ऑनलाईन बैठकीत भारताला नौकुल अश्या घोषणा केल्यावर बदलणाऱ्या जागतिक राजकारणात असे होणे स्वाभाविकच आहे भारत आता जागतिक रजकारणतील महत्वाचा खेळाडू झाला आहे हेच यातून स्पष्ट होत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?