जागतिक राजकारणातील महत्त्वाचा देश भारत

   

     येणारा काळ हा भारताचा असेल असे  म्हटल्यास वावगे ठरू नये अश्या घडामोडी सध्या  घडत असलेल्या भारताच्या संदर्भातील  परराष्ट्रीय  घडामोडी बघितल्यास सहजतेने लक्षात येते . गेल्या पंधरा दिवसात जपानचे पंतप्रधान दोन दिवशीय भारत दौऱयावर आले   . चीनचे परराष्ट्र मंत्री देखील त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांनी भारताला भेट दिली . ऑस्टेलिया या देशाच्या पंतप्रधानांनी ऑनलाईन परिषदेत उपस्थित राहताना भारताला अनुकूल असे अनेक करार केले . तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या तीन दिवसाच्या दौऱयावर येणार आहेत हे कमी काय म्हणून इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या दौऱयावर असताना नेपाळचे पंतप्रधान देऊबा देखील यावेळी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱयावर असणार आहेत  नेपाळचे पंतप्रधान १ एप्रिल ते ३ एप्रिल या दरम्यान भारताच्या भेटीवर असतील याच दरम्यान २६ मार्च ते ३० मार्च या दरम्यान मालदीव आणि श्रीलंका देशाच्या परराष्ट्र खात्याच्या आमांत्रणवरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीव या देशाच्या दोन दिवशीय आणि श्रीलंकेच्या तीन दिवशीय दौऱयावर गेले आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाचा कूट नीतीचा हा एक प्रकारे विजयच म्हणावा लागेल . 
     नेपाळचे  पंतप्रधान देऊबा यांनी  जुलै  २०२१ मध्ये पदाची सूत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतरचा  त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे,  या आधी पंतप्रधान असताना नेपाळचे विद्यमान पंतप्रधान देऊबा हे  २०१७ साली भारत दौऱयावर आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची २ एप्रिल रोजी नवी दिल्ल्लीत बैठक आहे . या दौऱ्यात ते वाराणशी येथील कशी विश्वेश्वराच्या मंदिराला आणि कॉरिडॉरला भेट देतील.पंतप्रधान  नरेंद मोदी यांनी डिसेंबर २०२१मध्ये काशी  कॉरिडॉर देशाला समर्पित केल्यानंतर त्याला भेट देणारे पहिलेच परदेशी नेते आहेत या
खेरीज नेपाळचे पंतप्रधान वाराणशी येथील सुप्रसिद्ध नेपालका मंदिर या शंकराच्या मंदिराला भेट देणार आहे वाराणशी येथील ललिता घाटावर असलेल्या या मंदिराची निर्मिती सन १८००ते १८०४ दरम्यान नेपाळच्या तत्कलीन राजा राणा बहादूर शाह यांनी काठमांडूची प्रतिकृती असावी या हेतूने केली याचे व्यवस्थापन नेपाळच्या सरकारकडून बघितले जाते लाकडापासून तयार केलेले हे मंदिर नेपाळी वास्तुरचनेचा उत्कुष्ट नमुना म्हणून ओळखले जाते नेपाळच्या पंतप्रधानांच्या या भेटीमुळे  
"विकास आणि आर्थिक भागीदारी, व्यापार, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य, ऊर्जा, कनेक्टिव्हिटी, लोकांशी लोकांचे दुवे आणि परस्पर हितसंबंधांच्या इतर मुद्द्यांसह द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण पैलूंचा आढावा घेण्याची दोन्ही बाजूंना संधी मिळेल. " अशा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे
भारत नेपाळ हि सीमा खुली आहे पासपोर्ट व्हिसा शिवाय आपण एकमेकांच्या देशात जाऊ शकतो भारतीय प्रशासन सेवेत नेपाळी नागरिकांसाठी विशेष सवलत आहे काही दिवसापूर्वी त्यांच्याशी सीमेबाबत आपले काही मतभेत झाले होते नेपाळच्या राजघराण्याशी इंदोरच्या सिंदिया घराण्याचे नातेसंबंध आहेत . ३जून २००१ च्या नेपाळ राजघराण्यात झालेल्या हत्याकांडातील मृत्युमुखी पडलेली तत्कलीन राणीचे माहेर इंदोरच्या सिंदिया घराणे होते मात्र बराच काळ भारताच्या बाजूचे परराष्ट्र धोरण स्वीकारणारा नेपाळ आता काही प्रमाणात चीनकडे झुकला आहे त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे .
भारताच्या आणखी दोन शेजाऱ्यांशी भारताचे परराष्ट्र संबंध सध्या चर्चेत आहेत . ते देश म्हणजे मालदीव आणि श्रीलंका . मालदीव या देशाच्या संविधानातच या देशाचे नागरिक फक्त सुन्नी इस्लाम असणारे लोकच होऊ शकतात . अशी तरतूद आहे नुकतेच २२ आणि २३ मार्चला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या देशाच्या संघटनेचे अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॅट्रीज हे अधिवेशन झाले आहे काही महिन्यापूर्वी तेथील माजी राष्ट्राध्यक्षाने इंडिया गो बँक या नावाचे भारतविरोधी आंदोलन चालवले होते मात्र तेव्हा असणाऱ्या मालदीवच्या सरकारने आम्ही भारतालच्या बाजूनेच आहोत असे स्पष्ट ग्वाही भारत सरकारला दिली होती त्या पार्श्वभूमीवर मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या परराष्ट्र मंत्र्याला एस जयशंकर याना मालदीव भेटीचे आमंत्रण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे २६ आणि २७ मार्च रोजी भारताचे परराष्ट मंत्री एस जयशंकर हे मालदीवच्या दौऱयावर होते या दौऱ्या दरम्यान त्यांनीमालदीवमधील अड्डू शहराला भेट दिली तसेच अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री पअब्दुल्ला शाहिद यांच्याशी चर्चा केली . परराष्ट्र मंत्र्यांच्या या दौऱ्यात द्विपक्षीय विकास सहकार्य, उद्घाटन/हस्तांतरण आणि
मालदीवच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या आणि तिची सुरक्षा वाढवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या भारत-समर्थित प्रकल्पांच्या शुभारंभाशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या ज्यानुसार मालदीवची राजधानी असलेल्या मले शहरापासून ५० किलोमीटर असलेल्या .
अड्डू या शहरात भारताची वकिलात उभारली जाणार आहे
श्रीलंका देशाच्या आग्रहावरून आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर २८ , २९ , ३० मार्च रोजी श्रीलंकेच्या दौऱयावर जात आहेत श्रीलंकेशी आपले पूर्वापार संबंध आहेत सध्या तो देश त्यांच्या स्वातंत्र्यपासूनच्या
अत्यंत वाईट आर्थिक स्थितीतून जात आहे भारताने या आधीच १ अब्ज अमेरिकन डॉलरची मदत केली आहे त्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे 
भारत जगाचे नेर्तृत्व करण्यास सज्ज होऊन आपण महासत्तापदाचे खरे प्रबळ दावेदार आहोत हे सिद्ध करत आहे हेच यातून सिद्ध होते 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?