भारताचा जगात डंका

             


   भारत आगामी काळात महासत्ता होणार आहे हे आता सर्वसुत्र आहे . मार्चच्या शेवटच्या पंधरा दिवसात आलेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवाड्यत नवी दिल्लीत येणाऱ्या  विविध देशांचे राष्ट्रप्रमुख याचीच साक्ष देत आहेत . मार्चच्या शेवटच्या पंधरा दिवसात जपान चे पंतप्रधान हे दोन दिवशीय भारत दौऱ्यावर  आले होते त्यानंतर  पूर्वनियोजित दौरा नसताना चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नवी दिल्लीची धूळ झाडली दरम्यान ऑस्ट्रेलियन पंतप्रधान यांनी ऑनलाईन संपर्क साधत भारताला अनुकूल असे अनेक करार केले . मार्चच्या शेवटच्या दोन दिवसात मेक्सिको देशाचे परराष्ट्र मंत्री आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या आमंत्रणावरून भारत देशाच्या  भेटीवर येत आहे . १ एप्रिल ते ३ एप्रिल या दरम्यान नेपाळ आणि इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर येत आहेत इस्राईलच्या पंतप्रधांनांन कोव्हीड १९ ची लागण झाल्यामुळे त्यांच्या दौरा सध्या अनिश्चित आहे हे कमी की काय म्हणून ! आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे २६ मार्च आणि २७ मार्च या दरम्यान मालदीवच्या आणि २८ , २९ ,३० मार्च या दरम्यान श्रीलंकेच्या दौऱयावर आहेत या श्रीलंकेच्या दौऱ्यात आपले पराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या समवेत बिमस्टेक या परिषदेच्या ५ व्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे . ज्या देशांच्या किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे अश्या ८ देशनसह भूतान आणि नेपाळ या भूवेष्टित देशांची संघटना म्हणजे बिमस्टेक होय . पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वगळता भारताचे सर्व शेजारी या संघटनेत आहेत . पाकिस्तान नसल्याने भारताची खूप मोठी डोकेदुखी कमी झाली आहे . ज्याचा फायदा भारत आपले शेजाऱ्याबरोबरील संबंध बळकट करण्यासाठी नेहमीच वापरत असतो ज्याचे प्रत्यंतर याही बिमस्टेक परिषदेत श्रीलंकेच्या बरोबर करण्यात येणाऱ्या करारांमध्ये दिसत आहे 

         श्रीलंका बरोबर या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक करार देखील केले आहेत . ज्यामध्येश्रीलंकन नागरिकांना काही वैद्यकीय मदत लागली तर ती पुरवण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारणारे श्रीलंकेच्या लगतच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांना काही मदत लागल्यास त्याबाबत यंत्रणा उभारणे  श्रीलंकेच्या नौदलाला सक्षम करण्यासाठीची यंत्रणा श्रीलंकन नौदलाच्या मुख्यालयात उभारणे . तसेच तामिळी लोकांची मोठी वस्ती असलेल्या तसेच भारताच्या भूभागाच्या अत्यंत जवळच्या  श्रीलंकेच्या भागात अर्थात जाफना राज्यात ऊर्जा प्रकल्प

उभारणे आदी करारांचा समावेश होते श्रीलंकेने जाफना प्रांतात ऊर्जा प्रक्लप उभारण्यासाठी मागच्या वर्षी चीनबरोबर बोलणी केली होती भारताने चीनकडून हे प्रकल्प खेचून  आणले आहेत हे पण लक्षात घेयला हवे  मालदीवमध्येबरोबर देखील आपण अनेक करार केले आहे 

हे कमी की काय म्हणून आपले  परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्या निमंत्रणावरून मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री एच.ई. श्री. मार्सेलो एब्रार्ड कॅसॉबॉन 30 मार्च-1 एप्रिल 2022 दरम्यान भारताला भेट देत आहेत  ही . एच.ई. श्री. मार्सेलो एब्रार्ड कॅसॉबॉन यांची  पहिली भारत भेट असेल भेट असेल.  ते मुंबईलाही भेट देणार आहेत या दरम्यान दोन्ही देशाचे परराष्ट्र मंत्री  द्विपक्षीय संबंधांचा व्यापक आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करतील.मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या मेक्सिको देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या  मेक्सिको सिटी  या शहराच्या  भेटीनंतर होत  आहे. या भेटींच्या देवाणघेवाणीमुळे भारत आणि मेक्सिको यांच्यातील विशेषाधिकारप्राप्त भागीदारी अधिक दृढ आणि मजबूत होईल.अशा विश्वास आहे सध्या, मेक्सिको हा लॅटिन अमेरिकेतील भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे आणि 2021-22 या कालावधीसाठी भारतासोबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा  चा सदस्य आहे. 

याबरोबरच रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव आणि युके (इंग्लंड ) चे परराष्ट्र मंत्री  31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान दिल्लीत असतील.भारताने रशिया युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्याबाबत पुढाकार घ्यावा यासाठी या वेळी चर्चा होण्याची शक्यता आहे 

भारतीय परराष्ट्र खात्यातर्गत होणाऱ्या या घडामोडी बघता भर येत्या कळत जागतिक महासत्तात म्हणून मोठी भूमिका बाजवणार आहे हेच या घडामोडीतून स्पष्ट होत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?