अखेर नकारघंटाच

     


      मागील वर्षी २८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु असणारा महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर कर्मचाऱ्यांना नकारघंटाच बघावी लागली . राज्याचे मुख सचिव ,अर्थ सचिव आणि परिवहन सचिव या तिघांनी १२ आठवड्याच्या अवधीत केलेल्या अहवालात एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याविषयी प्रतिकूलताच दाखवली आहे   हा लेख लिहीत असताना या अहवालवाला मुख्यमंत्र्यांनी संमती दाखवण्याची औपचारिकताच बाकी आहे.  तुम्ही जेव्हा हा लेख वाचत असला तेव्हा कदाचित तीही पूर्ण झालेली असेल  .संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही एसटीचे राज्ज्य शासनात पूर्णतः विलीनीकरण करावे ही होती त्याच मागणीस या अहवालात मनाई करण्यात आली आहे . या मागणीखेरीज त्यांच्या पगारवाढीची मागणी या आधीच  मान्य करण्यात आली होती 

                या संपात एसटी कर्मचाऱ्याच्या अधिकृत मान्यताप्राप्त कामगार संघटनेस न्यायालयाने अनधिकृत ठरवणे इतर अधिकृत म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांनी आंदोलनात  माघार घेतल्यावर त्या संघटनांच्या नेत्यांना बाजूला सारत कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने योग्य नेर्तृत्वाच्या अभावात आपले आंदोलन सुरूच ठेवले या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे

म्हणणे न्यायालयात मांडणारे वकील अडववकेत सदानंद गुणावर्ते यांच्या सारख्या वकिलांनी य संपकरी कर्मचाऱ्यांचे नेर्तृत्व केले संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांची  बडतर्फीची करणे त्यांचे निलंबन करणे त्याची लांबवर बदली करणे आदी उपाय योजून बघितले संपकरी एसटी कर्मचाऱ्यामुळे बंद  पडलेली एसटीची बससेवा पूर्वरत करण्यासाठी माजी सेवानिवृत्त कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत समाविष्ट करणे कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांच्यामार्फत सेवा सुरु करणे आदी उपाय योजले त्यामुळे तुरळक स्वरूपात का होईना सेवा सुरु झाली शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करण्याची धमकी देण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची एसटीचे राज्य सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण करण्याची मागणी सोडून द्यावी त्यांच्या अन्य मागण्यांबाबत विचार करायला राज्य सरकार तयार आहे असे विधान केले होते जर एसटीला राज्य शासनात समाविष्ट केले तरएसटीसारखी ५१ महामंडळे तशीच मागणी करतील जे राज्य शासनाला शक्य नाही अशी राज्य शासनाची भूमिका होती 

           या उलट आंदोलनकाच्या मते एसटीखेरीज अन्य महामंडळे या आधीच राज्य सरकारच्या कर्मचाऱयांना मिळणाऱ्या सर्व सोइ सवलती उपभोगत आहेत मात्र एसटीच्या कर्मचाऱयांचे तसे नाही, कोव्हीड १९ मुळे  लॉकडाऊन लागले असताना अन्य महामंडळातील कारभारी घरी सुखरूप बसले असता एसटी लोकांच्या सुरक्षितेसाठी झटत होती . असे असून देखील राज्ज्य शासनाच्या कर्मचाऱयांना मिळणारे कोणतेच भत्ते सोइ सवलती एसटी कर्मचाऱयांना मिळत नाही या सोइ सवलती मिळण्यासाठी एसटीचे शासनात पूर्णतः विलीनीकरण झालेच पाहिजे . एसटी कर्मचाऱयांचे पगार वाढवून आमच्या समस्या सुटणार नाही अनेकदा एसटीकडे पैसे नसल्याने आमचे पगार दोन ते तीन महिने रखडतात जर आमचे राज्य सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण झाले तर हा प्रश्नच उद्भवणार नाही .सध्या एसटीला बसेससाठी  इंधन बाजरभावाने घ्यावे लागते . जर विलीनीकरण झाल्यास एसटीला शासकीय वाहनाच्या भावात डिझेल मिळेल परिणामी एसटीचे इंधनावर खर्च होणारे हजारो रुपये वाचतील

तसेच एसटी राज्य सरकारला जो १७ % कर देते तो द्यावा लागणार नाही अंतिमतः एसटीचा तोटा कमी होऊन एसटी प्रवाश्याना कमी पैशात अधिक दर्जेदार सेवा देऊ शकेल . अशी आंदोलांकाची भूमिका होती एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरांमुळे होणारे फायदे स्पष्ट करण्यासाठी आंदोलनकडून तेलंगणा एसटीचे उदाहरण देण्यात येत होते तसेच एसटीकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींमुळे होणारे एसटीचे आर्थिक नुकसान देखील भरून निघण्यास हातभार लागेल असा एसटी कर्मचाऱ्याचे म्हणणे होते  

    जर दोन गावातील एसटीचे तिकीट जर १०० रुपये असेल तर मुळातील तिकीट ८३ रुपयेच असते उरलेले १७ रुपये आपण राज्य सरकारला कर रूपाने देत असतो . या कराच्या बोज्यामुळेच पुणे ते कोल्हापूर या मार्गावर गोव्याची एसटी असणाऱ्या कदंब ट्रान्सपोर्ट पेक्षा आपली एसटी अधिकचे ४० रुपये घेते तसेच पुणे सोलापूर या मार्गवर तेलंगणा एसटीपेक्षा जास्तीचे ४० रुपये आपल्या एसटीकडून घेण्यात येत  असतात या दोन्ही ठिकाणी मी दोन्ही साधनाद्वारे फिरलेलो असल्याने कराच्या मुद्यांबाबत मी आंदोलनकाच्या भूमिकेशी सहमत आहे पूर्णतः कर माफी देता येत नसेल तर किमान काही टक्क्याची सूट देणे अत्यावश्यक आहे सोयीसवलतीची गोष्ट करायची झाल्यास मी अनेकदा प्रवाश्यात असे कित्येक प्रवाशी असे बघितले आहेत की जे कोणत्याच अंगाने दिव्यांग वाटत नसताना दिव्यांगांचे सवलतीचे कार्ड दाखवत प्रवास करत होते .त्यामुळे खोटे  प्रमाणपत्र दाखवून सवलतीचा गैर फायदा घेणाऱ्या व्यक्तीबाबत कडक कारवाई करणे .तसेच   एसटीकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींबाबत पुनर्विचार करण्याचीगरज आहे  गुजरातची एसटी

प्रवाश्यात ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या भाड्याची सवलत देत नाही जी महाराष्ट्र एसटी देते त्यामुळे इतर एसटीकडून देण्यात न येणाऱ्या या सारख्या  सवलती या तात्कळ बंद करणे आवश्यक आहे एसटीत विलीनीकरण होवो अथवा न होवो  या बाबत उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे

 लोकांची या संपाबाबत सुरवातीला सहानभूती होती एसटी कर्मचाऱयांना पुरेसा पगार मिळायलाच हवा अशी सर्वसाधारण जनभावना होती .  मात्र पगारवाढ झाल्यावर काम सुरु करण्याऐवजी,  आपल्या मागण्यांवर अडून  बसल्याने सहानुभूतीची जागा तिरस्काराने घेतली ज्या प्रवाश्याच्या जीवावर ते स्वतःचे घरदार चालवत आहेत त्या प्रावाश्याना त्रास देण्याचा त्यांना अधिकार आहे का ? एसटीच्या विलीनीकरणाबतचा निर्णय न्य्यालालयात प्रविष्ट असलयाने त्याबाबत अधिक न ताणता कर्मचाऱ्यांनी कामावर येयला हवे अशी मागणी प[प्रवाश्यांमधून उमटू लागली या काळात प्रवाश्यांची एसटीच्या तिकिटाच्या दरापेक्षा कितीतरी जास्त पैसे देऊन लोकांनी खाजगी वाहनातून प्रवास केला जो काहीसा असुरक्षित देखील होता आजमितीस हा लेख लिहीत असताना प्रवाश्याना या प्रकारे प्रवास करण्याची स्वे झाली आहे भविष्यात एसटी पूर्ण क्षमतेने सूर झाली तरी लोक हा त्रास विसरणे अश्यकच . खाजगी प्रवाशी वाहनकडे वळलेले प्रवाशी नको ती बे भरवश्याची एसटी म्हणू एसटीकडे कायमची पाठ देखील फिरवू शकतात . 

हा लेख लिहीत असताना एसटीचा संप संपला नसला मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवू अशी वक्तव्ये एसटी कर्मचारी करत असले या बाबतची पुढील सुनावणी न्यायालयात ११ मार्च रोजी असली तरी त्यातून फार काही हाती

लागेल असे समजणे भाबडेपणचेच ठरू शकते त्यामुळे गिरणी  कामगाराच्या अजून देखील अधिकृत घोषणा न झाल्यामुळे न संपलेल्या मात्र गिरणी कामगारांच्या संपामुळे जसा गिरणी कामगार देशोधडीला लागला तसेच एसटी कर्मचाऱ्याच्या बाबतीत करणारा ठरणार म्हणून इतिहासात नोंद होईल हे नक्की 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?