यशापशाचा हिंदोळक्यावर विदित गुजराथी

   

       सध्या आपल्या भारतात सर्वत्र पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत चर्चा सुरु ,असताना,  समस्त बुद्धिबळ रसिकांचे लक्ष बेलग्रेड या शहरात होणाऱ्या  या वर्षातील दुसऱ्या ग्रांपी स्पर्धेचा आंनद लुटत आहे भारताचे प्रतिनिधीत्व नाशिकचे तरुणाचे आयकॉन भारताच्या बुद्धिबळ संघाचे कप्तान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि  पेन्टला हरिकृष्णन हे करत आहे फिडे नियमानुसार २०२२ या वर्षी होणाऱ्या तीन पैकी कोणत्याही दोन  ग्रांपी स्पर्धेत बुद्धिबळ खेळाडू सहभागी होऊ शकतात . आतापर्यंत एक ग्रांपी स्पर्धा झालेली आहे तर दुसरी ग्रांपी स्पर्धा सध्या सुरु आहे . या स्पर्धेला २८ फेब्रुवारी  दिमाखदार सुरुवात झाली  
प्रत्यक्ष खेळाला १ मार्च रोजी सुरु झाले या स्पर्धेतील साखळी सामने ७  मार्चपर्यंत होणार आहेत  ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूं पहिल्या ग्रांपी प्रमाणेच आपल्या गटातील उर्वरित तीन खेळाडूंशी प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूंचे एका वेळी पांढऱ्या मोहऱ्या असतील तर दुसऱ्या वेळी काळ्या मोहऱ्या असतील . आठ मार्च या दिवशी साखळी स्पर्धेत जर दोन खेळाडूंचे गुण सारखे झाले असल्यास त्यांच्यातील विजेता ठरवण्यासाठी खेळवण्यात येणाऱ्या ट्राय  ब्रेकचे सामने खेळवण्यात येणार आहेत ९ मार्च आणि १० मार्च रोजी प्रत्येकी एकउपांत्य फेरीचा सामना होईल उपांत्य फेरीत काही कोंडी झाल्यास ११ मार्च रोजी ती फोडण्यासाठी   ट्राय  ब्रेकचा सामना खेळवण्यात येईल त्यानंतर १२ आणि १३ मार्च रोजी प्रत्येकी एक अंतिम फेरी खेळवण्यात येईल त्याच्यांत काही कोंडी झाल्यास १४ मार्च रोजी  ट्राय  ब्रेकचा सामना खेळवण्यात येईल आणि पारोतोषिक वितरण सोहळा होईल 
         नाशिकचे  तरुणाचे आयकॉन भारताच्या बुद्धिबळ संघाचे कप्तान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी पहिल्या फेरीत स्पेनकडून खेळणाऱ्या सिरोव्हयांना पांढऱ्या मोहऱ्या घेऊन खेळताना ३० व्या चालीमध्ये गुडघे टेकवायला लावले त्यांनी राजा समोरील प्यादे दोन घरे चालवून डावाची सुरवात केली त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रतिस्पर्ध्याने वजिराकडील उंटाच्या समोरील  प्यादे दोन घरे चालवून  डावाची सुरवात केली दुसऱ्या
डावात सुद्धा पांढरे मोहरे घेवून खेळताना व्लादमीर फोडेसेव्ह यांच्यावर विदीत गुजराथी यांनी विजय मिळवला, त्यांनी डावाची सुरवात वजीराच्या समोरील प्यादे दोन घरे चालवून केली.उत्तरादाखल प्रतीस्पर्ध्याने राजाकडील घोडा राजाकडील उंटाच्या समोर असलेल्या प्यादाचा पुढे आणून (बुद्धिबळाच्या भाषेत Nf6) केली .यावेळी  विदीत गुजराथी यांनी 55व्या फेरीत विजय मिळवला.तिसऱ्या फेरी अखेर मात्र विदीत यांना पराभव स्विकारावा लागला.त्यांना हंगेरीच्या पहिल्या क्रमांकाच्या खेळाडू असलेल्या रिचर्ड राप्पोर्ट यांनी हारवले. या पराभवामुळे गेल्या दोन.फेऱ्यात आपल्या गटात अव्वल असणाऱ्या विदीत गुजराथी यांना गटातील अव्वलतेच्या स्थानात 
 राप्पोर्ट यांना सहभागी करुन घ्यावे लागले.तिसऱ्या फेरीअखेर विदीत आणि रिचर्ड राप्पोर्ट दोघेही गटात संयुक्तपणे  पहिल्या स्थानावर होते. या तिसऱ्या डावात विदीत गुजराथी काळ्या मोहऱ्या घेवून खेळत होते..डावाची सुरवात त्यांच्या प्रतीस्पर्ध्याने वजीरा समोरील प्यादे दोन घरे चालवून केली. त्याला वि।दीत यांनी राजाकडील घोडा राजाकडील उंटाच्या समोर असलेल्या प्यादाचा पुढे आणून (बुद्धिबळाच्या भाषेत Nf6) उत्तर दिले.डावाच्या 40व्या चालीत प्रतीस्पर्ध्याने त्याचा उंट वजीराच्या बाजूकडील उंटाच्या रांगेतील तिसऱ्या घरात (बुद्धिबळाच्या भाषेत Bc3) आणल्यावर विदीत यांनी हार मानली. चौथ्या फेरीत विदीत यांना त्यांनी पहिल्या फेरीत हरवलेल्या सिरोव्ह याच्याबरोबर बरोबरी मान्य करावी लागली.पाचव्या फेरीत विदीत यांना पुन्हा एकदा पराभवाचा.सामना करावा लागला पाचव्या फेरीत त्यांचा सामना पून्हा एकदा तिसऱ्या फेरीत त्यांना हरवणाऱ्या  रिचर्ड राप्पोर्ट याने पुन्हा हरवले यावेळी पांढऱ्या सोगट्या घेवून खेळताना दोन्ही खेळाडूंनी आपापल्या राजासमोरील प्यादे दोन घरे चालवून केली.61चालीपर्यत चाललेल्या या डावात रिचर्ड राप्पोर्ट यांनी 61व्या चालीत स्वतःच्या घोडा विदीत यांचा राजा डावाच्या सुरवातीला ज्या घरात होता त्याचा पुढच्या घरात (बुद्धिबळाच्या घरात e7) आणून चेक दिला आणि विदीत यांच्यावर मात केली.पाच डावात दोन हार आणि एक बरोबरी यांच्यामुळे त्यांना उपात्य फेरीत पोहोचण्यासाठी सहाव्या डावात फेडोसिव्हवर मात आणि सहाव्या डावात रिचर्ड  हरणे या दोन गोष्टी होणे आवश्यक आहे. जर दोन्ही गोष्टी झाल्यातरच नाशिकचे आयकाँन विदीत उपांत्य फेरीत जावू शकतात. अन्यथा गेल्या काही स्पर्धेप्रमाणे सुरवातीला उत्तम खेळाचे प्रदर्शन नंतर मात्र सातत्य ढासळणे, ही अपयशाचीच मालिका सुरु राहिल. पाचव्या फेरीअखेर त्यांचे दोन विजय आणि एक बरोबरी यामुळे अडीच गुण झाले आहेत. त्यांनी अखेरचा डाव जिंकल्यास त्यांचे सहा गुण होतील.त्यावेळी पाच डावातच तीन गुणांवर असलेल्या रिचर्ड  आणि फेडोसिव्हवर यांचे आव्हान असेल. जर दुर्दैवाने विदीत सहाव्या फेरीत हरले तर हे दोघे गटाचे प्रतिनिधित्व करतील.
     डावातील गुंतागुंत वाढवत नेवून समोरच्याला काय खेळु या संभ्रमात टाकणे, हे विदीत यांच्या खेळाच्या वैशिष्ट्य आहे.गेल्या काही दिवसातील त्यांचे खेळ बघीतल्यास पटाच्या मध्यभागी प्रतीस्पर्ध्याबरोबर फायद्यात पडणारी मारामारी करणे यात त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे दिसून येते.मात्र यशापशाचा हिंदोळक्यावर त्यांचा खेळ सध्या होत आहे. हे दुर्देवच आहे. टाटा स्टील स्पर्धेच्या 10व्या फेरीनंतर तर हा प्रकार खुपच प्रकार्षाने जाणवायला लागलाय.तेव्हा भारताच्याच प्रग्नानंद यांच्याकडून हरल्यानंतर  त्यांना त्यांचा सूर सापडत नाहीये.ज्याचे दृष्यस्वरूप आपणास दिसत आहेच.त्यांना त्यांचा सुर लवकरच सापडो, ही इश्वरचरणी प्रार्थना.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?