हे भविष्य खरे ना ठरो

       

     आपल्यापैकी अनेकांना विविध माध्यमामध्ये येणारे आपले राशी भविष्य जाणण्याची इच्छुकता असते . आपल्या राशीचे अनेक लोक आहेत सर्वांचे भविष्य सारखे असणार नाही याची माहिती असून  देखील वृत्तपत्रातील सर्वाधिक वाचला जाणारा हा भाग होय . वृत्तपत्रातील भविष्य कितपत खरे ठरते ? याबाबत अनिश्चतता असली  त्यातील बहुतांशी गोष्टी रोजच्या आयुष्यात घडत नसल्या  तरी  वर्तमानत्रातील सर्वाधिक लोकप्रिय भाग म्हणजे राशिभविष्य .  मात्र  हवामान तज्ज्ञांनी दुर्दैवाने हे भविष्य खरे ना ठरो असे वाटावे,  असे भविष्य नुकतेच वर्तवले आहे .  हे भविष्य आहे,  बदलत्या हवामानामुळे,  येत्या काही वर्षात आफ्रिका खंडातील सुमारे ६० % आणि एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी ३३ % लोकसंख्या बदलत्या हवामानामुळे प्रभावित होऊ शकते , हे 
         आजदेखील  आपल्या भारताचा ऊत्तर भाग आणि महाराष्ट्र अत्यंत भयानक अश्या उष्णलहरींचा सामना करत आहे.  अनेक ठिकाणी वातावरण ४० अंश सेल्सियस च्या जवळपास नोंदवले गेले आहे याला अनेक करणे आहेत त्यातील एक म्हणजे वेळे आधीच राजस्थानात झालेली वारे वाहण्याची स्थिती   सर्वसाधारणे हे बदल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात होतात.  मात्र यावेळी हे बदल मार्चच्या तिसऱ्या आठवाड्यतच होत आहे,  यावेळी कर्नाटक तेलंगणा या राज्यात वारे वाहतात . मात्र यावेळी हे वारे वाहत नाहीये परिणामी महाराष्ट्रात असह्य अशी उष्माघाताची लाट आलेली आहे . या खेरीज भूमध्य समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यामुळे निर्माण होणारी वेस्टर्न डिस्टंबन्सची स्थिती फारशी उत्तम न झाल्यामुळे,  तसेच हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे जात असताना भारतात काही ठिकाणी होणाऱ्या पावसाच्या प्रमाणात सुमारे ७५ ते ८० % घट झाल्याने महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागात उष्णतेची लाट आलेली आहे .  
   हे कमी की काय म्हणून,  मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान हे उणे ४७ ते उणे ५३  अंश सेल्सियस असे नोंदवल्या जाणाऱ्या,  अंटार्टिका या खंडात तीन ठिकाणी यावर्षी मार्च महिन्यात  नेहमीपेक्षा तब्बल ४० अंश अधिक तापमान नोंदवले गेले . यावेळी उणे ७ ते उणे १७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.  कंबोडिया या देशाच्या अंटार्टिका खंडाचा अभ्यास करणाऱ्या वेधशाळेने १८ मार्च रोजी या  वाईट तापमानाची नोंद घेतली आहे . जागतिक हवामान संघटनेकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार गेल्या ५० वर्षात जजवळपास प्रत्येक
दिवशी जगभरात कुठेना कुठे पाण्याशी संबंध असणारी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे . हवामानबदल  यावर काहीतरी ठोस कृती करण्याची किती मोठी गरज आहे हेच यातून दिसत आहे 
       अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष अल गोर यांचा डे आफ्टर टुमारो या नावाचा जागतिक हवामान बदलाच्या  धोक्याविषयी सांगणारा एक चित्रपट आहे यामध्ये  उद्यानंतरच्या दिवसाचा अर्थात परवाचा उल्लेख केला आहे मात्र परवा घडेल  असे सांगण्यात येणारे हवामानांचे चित्र सध्या घडत आहे अशी आजची स्थिती आहे आजमितीस पृथ्वीबाहेर वस्ती करता येईल इतपत विज्ञानाची प्रगती झालेली नाही . त्यामुळे आहे त्या जीवश्रुष्टीला वाचवणे अत्यंत आवश्यक आहे सध्या घडणाऱ्या घडामोडी याबाबतच आपणस वारंवार इशारा देत आहेत गरज आहे हा इशारा समजण्याची 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?