नव्या बाटलीत जुनी दारू

       


     सोमवार ११ एप्रिल रोजी शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे २३वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ते पाकिस्तानचे चार वेळा पंतप्रधानपदी असणारे आणि सध्या वैद्यकीय उपचारांचे कारण देत लंडन शहारत राहणाऱ्या नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत नवाज शरीफ यांच्यावर पनामा पेपर घोटाळा आणिअन्य  भष्ट्राचाराचे आरोप आहेत . १९९९मध्ये त्यांची  सत्ता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ  यांनी बंद करून उथळून लावल्यापासून काही काळ वगळता ते वैद्यकीय उपचाराचे कारण देत पाकिस्तानबाहेरच आहेत आता त्यांच्या धाकट्या भावाकडे पंतप्रधानपद गेल्यानंतर ते पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरू शकतात . असो पाकिस्तानमधील सर्वाधिक लोकसंख्येचा आणि राजनीतिक लष्करीदृष्ट्या अत्यंत प्रबळ असणाऱ्या पंजाब या प्रांताचे मुख्यमंत्री असणाऱ्या  शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर   नॅशनल असेम्ब्लीमध्ये केलेल्या  आपल्या पहिल्याच संबोधनात पुन्हा एकदा काश्मीरचा राहू आवळला 
   आम्ही भारताबरोबर शांती  इच्छितो या शांतीमुळे दोन्ही देशांच्या विकास होऊ शकतो मात्र भारताबरोबर शांतता प्रस्थापित करायची असल्यास काश्मीर प्रश्न सुटणे आवश्यक असल्याचा पुरुच्चार त्यांनी आपल्या संबोधनात केला .पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांनी स्वतःच्या देशाच्या विकासावर चर्चा करण्याऐवजी कायम काश्मीरचा राग आळवला आहे . विकासाबाबत काहीच पाऊले न उचलता , स्वतःच्या भू राजनीतिक स्थानाचा फायदा घेत मिळालेल्या अमेरिकी मदतीचा वापर भारताविरोधात गरळ ओकणे आणि भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यावरच खर्च केल्याचे दुष्परिणाम आज पाकिस्तानात दिसत आहे जागतिक व्यापार संघटनेमार्फत प्रसिद्धी करण्यात येणाऱ्या    The Financial Action Task Force च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानने जवळपास कायमस्वरूपी स्थान मिळवल्याचे ही  यादी जेव्हा पासून प्रसिद्ध करण्यात येते तेव्हापासूनची यादी बघितल्यास आपणस सहज लक्षात येते   The Financial Action Task Force च्या ग्रे लिस्टमध्ये नाव येणे हे   भूषणावह नाही तर जागतिक व्यापार करायला तुम्ही लायक नाही तुमच्याशी व्यापार करणे धोकादायक आहे तुमच्याबरोबर व्यापार करणे बेबेभरवशाचे  आहे याची  जागतिक व्यापार संघटनेने दिलेली ती पावतीच असते मात्र त्याविषयी पाकिस्तान काहीच बोलत नाही मात्र विविध जागतिक व्यासपीठावर काश्मीरचा राग सातत्याने आळवतो अन्य कोणत्याही देश अगदी चीन देखील काश्मीरविषयी बोल्ट नाही मात्र हे व्यासपीठ कोणत्या कारणांसाठी उभारलेले आहे याचा काहीही विचार न करता पाकिस्तान काश्मीर विषयक रडगाणे गट असतो जसे काही काश्मीरविषयक प्रश्न सुटल्यावर त्यांचे सर्व प्रश्न बटन दाबल्यावर जसे दिवा लागतो तसे सुटणारच आहे 
आजमितीस जगात पोलिओ ज्या मोजक्या तीन देशात आहे त्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक लागतो . त्यामुळे पाकिस्तानमध्ये भेट देणाऱ्यास तो कितीही वर्षाचा असो पोलिओचे डोस घेऊनच प्रवेश करावा लागतो पाकिस्तानमध्ये इस्लामच्या सुन्नी पंथीयांची संख्या सर्वाधिक म्हणजे देशातील मुस्लिम बाधंवांच्या एकूण संख्येपैकी ९० ते ९५ % आहे  उरलेल्या ५ ते १० %मध्ये येणाऱ्या शिया अहमदिया आदी पंथांच्या नागरिकांचे तिथे मोठे हाल होत आहेत अन्य अल्पसंख्याकांबाबत तर बोलायलाच नको आतापर्यत पाकिस्तानात कोणतीही क्रिकेट टीम खेळायला तयार नव्हती न्यझीलँड या देशाची क्रिकेट टीम त्यांच्या दौरा अर्धवट सोडून आली पाकिस्तानच्या अमेरिकेतील राजदूताला अमेरिकेने सहजतेने स्वीकारले नाही त्याबाबत बोलायचे सोडून पाकिसनच्या नवनियुक्त पंतप्रधानानी काश्मीरचा राग आळवला , 
इम्रान खान यांच्यासह मागच्या सर्वच पाकिस्तानी पंतप्रधांनी  कायमच काश्मीरचा मुद्दा पुढे करत त्याविषयी बोलत राजकारण केले त्याची फळे आज पाकिस्तानी जनता चाखत आहे आज पाकिस्तानची आर्थिक स्थिती देखील कमकुवत आहे आंतराष्ट्रीय आणणेनिधीच्या कर्जावर पाकिस्तानची गुजराण चालू आहे मात्र एक चकार  शब्द त्याविषयी नव्हता सर्व जोर काश्मीर आणि पॅलेस्टाईनवर होता आज पाकिस्तानात बलुचिस्तनाचा स्वातंत्र्यलढा मोठ्या प्रमाणात सुरु आहे त्याविषयी देखील पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान आपल्या पहिल्या नॅशनल असेम्बलीच्या संबोधांत बोलले नाही 
पाकिस्तानमधील सियालकोट सारखी अनेकम्हह्त्त्वाची शहरे भारतीय सीमेपासून हाकेच्या अंतरावरआहेत आपली त्यांच्यबारोबर मोठी कॉमन सीमा आहे त्यामुळे तेथील घडामोडी आपणासाठी महत्त्वाच्या ठरतात तिथे शांतता असणे भारतासाठी आवश्यक आहे तरी पाकिस्तान आपला शरयू असला तरी तिथे राजकीय स्थिरता यावी यासाठी प्रथम करण्यातच भारतीयांचे हित आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?