दोस्त दोस्त ना राहा

     


 सन १९६४ साली संगम नावाचा एक चित्रपट येऊन गेला त्यामध्ये मुकेश यांनी एक गायलेलं एक आहे "दोस्त दोस्त ना रहा " असे . सध्याची अमेरिकेची अवस्था अशीच झाली आहे दोस्त दोस्त ना रहा . अमेरिकेच्या मैत्री यादीतील कमी झालेला देश म्हणजे ,आखाती देशातील महत्त्वाचा देश जो इस्लामी देशांचे नेतृत्व करतो जो जगातील पहिल्या क्रमांकाचे तेल उप्तादन करतो जो देश तेथील कडक शिक्षेमुळे ओळखला जातो जो आतापर्यन्त महिलांना अत्यंत कमी स्वातंत्र्य देणारा देश म्हणून ओळखला जात असे  तो देश म्हणजे सौदी अरेबिया .  

     जगभरात मानवी हक्काच्या बाबतीत इतर देशांना कायम आरोपीच्या पिजऱ्यात उभा करणारा देश म्हणजे अमेरिका . मानवी हक्क रक्षणाचा जगातील मक्ता केवळ आपणस मिळालेला आहे जगभरात जिथे कुठे मानवी हक्काची पायमल्ली होते तिथे न्यायनिवाड्याचा हक्क केवळ आपणास आहे अश्या तोऱ्यात विविध देशांवर विनाकारण हल्ला करून त्या देशांची राख रांगोळी करणारा देश म्हणजे अमेरिका . जगभरात कायम लोकशाहीच्या बाबतीत गळा काढणारा देश म्हणजे अमेरिका स्वतःला धर्मनिरपेक्षतेचा आदर्श समजणारा देश म्हणजे अमेरिका . स्वातंत्र्याची परिसीमा समजणारा  देश म्हणजे अमेरिका .स्वतःला जागतिक पोलीस समजून अनेक देशाच्या अंतर्गत प्रश्नात तोंड खुपसणारा देश म्हणजे अमेरिका . 

मात्र  या  अमेरिकेने   ज्या ज्या देशातील मानवी हक्काच्या पायमल्लीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले  तेथील महिलांवर असणाऱ्या बंधनाबाबत काहीहीही एक चक्कर शब्द काढला नाही.  पश्चिम आशियातील आपला दुसऱ्या मित्राला इस्रायलला प्रमुख शत्रू मानणाऱ्या त्या देशाला याबाबाबत  आतापर्यंत कधीच विचारले नाही  , अमेरिकेने ज्या देशातील राजेशाहीला नेहमीच त्या देशातील अंतर्गत बाब मानत दुर्लक्ष केले  ध जो देश उघड उघड इस्लामची बाजू घेतो त्या सौदी अरेबिया बाबत कायमच नरमाईची भूमिका घेतली इराक व्हिएतनाम अफगाणिस्तान आदी अनेक
देशात लोकशाही धोक्यात आहे असे सांगून त्या देशावर आक्रमण केले मात्र कधीही सौदी अरेबियातील राजेंशीविरुद्ध एक शब्दाचाही निषेध सुद्धा व्यक्त केला नाही भारतासारख्या अनेक देशांना विनाकारण मानवी हक्कबाबत उपदेश करणाऱ्या अमेरिकेला आतापर्यंत सौदीत महिलांना वाहन चालवणे , घरातील पुरुषांशिवाय घराबाहेर पडणे , खेळणे आदींबाबत मध्ययुगीन वाटावे अशी बंधने असून देखील त्याविषयी अमेरिकेला  चक्कर शब्द काढावा असे वाटले  नाही सौदीच्या पासपोर्टव काही महिन्यापर्यत  हा पासपोर्ट इस्राईल या अमेरिकेचे ५१ वे राज्य वाटावे अश्या देशासाठी साठी वैध नाही असा स्पष्ट उल्लेख होता मात्र त्या बाबत सौदीला विचारावे असे अमेरिकेला वाटले नाही  ज्या देशातील अंतर्गत वाद असणे सौदीला अनुकूल आहे अश्या  येमेन गृहकलहांत मध्यस्थी न करणारा देश म्हणजे अमेरिका 
तर अश्या घनिष्ट मित्र असणाऱ्या अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशाच्या मैत्रीत आता वितुष्ट आले आहे  अमेरिकेने वारंवार सांगून देखील,  युरोपासाठी सौदी अरेबियाने आपला इंधनाचा पुरवठा वाढवला नाहीये रशियाविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात  आणलेल्या प्रस्तवावर अमेरिकेच्या बाजूने मतदान न करता याबाबत मतदान करण्याच्या वेळी उपस्थित ना राहणे अमेरिकेच्या विरोधी गटातील चीनबरोबर जवळीक साधने सौदीच्या प्रशासनातील क्रमांक दोनचे असणारे राजपुत्र मोहमद्द बिन सलमान यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबत केलेले वादग्रस्त विधान . सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय वाहिनीवर सादर केलेल्या एका विनोदी कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर विखारी टीका करणारा कार्यक्रम सादर करण्यात आला ज्याचा अमेरिकेकडून अधिकृतपणे निषेध देखील व्यक्त करण्यात आला . सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील भष्ट्राचाराच्या प्रकरणाची पोलखोल केल्यामुळे सौदी अरेबियाच्या राजघराण्यांकडून त्यांची हत्या तुर्कीये (जुने नाव तुर्की ) या देशातील सौदी अरेबियाच्या वकिलातीत करण्यात आली असे मानण्यात येते अश्या पत्रकार जमाल खसोग्गी यांची हत्त्या करण्यात सॊदी अरेबियाचा राजघराण्याचा सहभाग स्पष्ट करणारे पुरावे आमच्याकडे आहेत
असे अमेरिकेकडून जाहीर करण्यात आल्याने सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण झाले आहेत 
        मात्र जगातील राजकारणात कोणी कधीच कोणाच्या कायम स्वरूपी मित्र अथवा शत्रू असत नाही इतर वेळी एकमेंकांवर सीमाप्रश्नी भांडणारे भारत आणि चीन हे देश जागतिक हवामन  बदल . जी ७७ मध्ये असणाऱ्या आर्थिक सुधारणा याबाबत एकत्र भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडतात .इबसा ब्रिक्स आदी संघटनेवरून परस्पर विकासाची भाषा करतात . त्यामुळे हे वितुष्ट कायस्वरूपी राहील असे समजणे चुकीचे आहे कालांतराने हे संबंध पूर्वरत होईल होतील देखील मात्र आता ते आतापर्यतच्या दोन देशातील सर्वात निच्चांकी स्थितीवर आले आहे आहेत हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?