भारताचा जगात डंका


   पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी प्रशांसनीय उदगार काढल्याचे आपणास स्मरत असेलच भारत त्याला अनुकूल होतील अश्या पद्धतीने जगात परराष्ट्र धोरण राबवतो भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्याही महासता ठरवत आंही असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते हे उद्गार किती सार्थ आहेत याची झलक पुन्हा एकदा पाहण्यात आली 

   आग्नेय आशियातील महत्त्वाचा देश,  ज्याचे राष्ट्रपती सुकीमो हे भारताच्या पहिल्या १९५० च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे विशेष निमंत्रीत होते.  ज्या देशाच्या सांस्कृतिक वारश्यावर भारताचा प्रचंड प्रभाव आहे,  जो त्यांनी देखील मान्य केला आहे . ज्या देशांनी त्यांचा अधिकृत धर्म हा इस्लाम आहे असे जाहीर केले आहे अश्या देशांच्या यादीत सर्वाधिक मुस्लिम बांधव ज्या देशात राहतात भारतसारखाच वसाहतवादाचा शिकार झालेला देश अर्थात इंडोनेशिया या देशाबरोबर १४ एप्रिल रोजी झालेली वार्ता त्याचीच झलक दाखवून देते 

भारत-इंडोनेशिया फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स (FOC) ची 7वी फेरी 14 एप्रिल 2022 रोजी जकार्ता, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे ध्यक्ष पद भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पूर्व विभागाचे सचिव सौरभ कुमार,आणि इंडोनेशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आशिया पॅसिफिक आणि आफ्रिका विभागाचे महासंचालक डॉ. अब्दुल कादिर जैलानी यांनी

संयुक्तपणे सांभाळले या आधीची FOC ची बैठक 25 जून 2021 रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात परराष्ट्र व्यवहार विभागातर्गत जगाचे क्षेत्रावर विभाजन करण्यात येऊन त्या त्या क्षेत्राची जवाबदारी भारतीय परराष्ट्र सेवेवतील उचपदस्थ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे त्यामध्येच भारताच्या पूर्व दिशेला असणाऱ्या देशांसाठी पूर्व विभाग तयार करण्यात आला आहे

या बैठकीत दोन्ही शिष्टमंडळांनी इंडो-पॅसिफिकमध्ये अधिक सागरी सहकार्याची गरज आणि भारत-इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या निरंतर वचनबद्धतेवर भर दिला. त्यांनी राजकीय देवाणघेवाण, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, व्यापार आणि आर्थिक बाबी आणि कॉन्सुलर समस्यांचा समावेश असलेल्या त्यांच्या एकूण द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. दोन्ही बाजूंनी अंदमान आणि निकोबार बेटे आणि इंडोनेशीतील .आचेचा प्रांत यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच लोकांमधील देवाणघेवाण आणि सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शविली.आचेचा इंडोनेशियाचा प्रांत आहे जो भारताच्या जवळचा प्रांत आहे जो सुमात्रा बेटाच्या टोकावर आहे, बांदा आचे ही त्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे.

अलीकडील प्रादेशिक आणि जागतिक घडामोडी आणि G20, ASEAN फ्रेमवर्क, इंडो-पॅसिफिक महासागर पुढाकार (IPOI) आणि इंडो-पॅसिफिक (AOIP) वरील ASEAN Outlook मधील सहकार्य यावर देखील या बैठकीत साधकबाधक चर्चा करण्यात आली भारताकडून इंडोनेशियाला इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) आणि कोलिशन फॉर डिझास्टर रेझिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चर (CDRI) मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले.सर्व चर्चा मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. पुढील फेरी भारतामध्ये परस्पर सोयीस्कर वेळी सल्लामसलतीने आयोजित करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले.

भारत एकीकडे अमेरिकेबरोबर बोलणी करत असताना अमेरिकेच्या विरोधी गटातील चीनच्या प्रभाव क्षेत्रातील आग्नेय आशिया भागातील इंडोनेशिया या देशाबरोबर देखील वाटाघाटी करतो हे भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णतः स्वतंत्र असल्याचे दाखवून देत आहे नरसिहराव पंतप्रधान असताना आपण आपल्या पूर्वेकडील देशांशी मैत्रता वाढवण्यास सुरवात केली आज त्याच्याच पुढचा टप्पा या बैठकीतून गाठला जात आहे जे भारताच्या नव्या भविष्याचे आशादायक संकेतच म्हणायला हवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?