पाकिस्तान ,अंतर्गत लाथाळ्यांमुळे पोखरत जाणारा देश

   
पाकिस्तानी संसद 

पाकिस्तानामधून येणाऱ्या बातम्या बघीतल्यास पाकिस्तान हा देश अंतर्गत लाथाळ्यांमुळे पोखरत जाणारा देश आहे, हे स्पष्ट होत आहे.
         10एप्रिल रोजी पाकिस्तानात शेहबाज  शरीफ यांचा शपथविधी होवून आठवडा होत आला, तरी 18एप्रिलपर्यत त्यांचे मंत्रीमंडळ स्थापन होणे सोडाच, अजून पाकिस्तान डेमोक्रॅटिक अलायन्स मधील सहभागी पक्षांनी कोणकोणते खाती सांभाळायची ?याचाच निर्णय अजून झालेला नाही. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानात मिस्टर टेन पर्सेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असिफ अली झरदारी  यांच्या मुलगा तथा माजी पंतप्रधान झुलफिखार अली भुट्टो यांचा नातू बिलावल भुट्टो यास परराष्ट्र मंत्रालयाचा मंत्री होण्याची इच्छा आहे.  ज्या पक्षाच्या पंतप्रधान आहे. त्या पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट यास अर्थ, माहिती, रेल्वे , गृह यासारखी खाती हवी आहेत.त्या बदल्यात तो आपल्या दुसऱ्या सहकाऱ्यास अर्थात पाकिस्तान  पिपल्स पार्टीस पंजाबचे गव्हनरपद, आपल्या राज्यसभा समकक्ष असणाऱ्या सिनेट या सभागृहाचे अध्यक्षपद अन्य काही खात्याचे मंत्रीपद देवू इच्छितो .मात्र यावरुन दोन्ही पक्षात एकमत होत नाहीये. परीणामी पंतप्रधान पदाची सुत्रे हातात घेवून आठवठा उलटला, तरी पाकिस्तानत केंद्रीय मंत्रीमंडळाची स्थापना झालेली नाही. आजमितीस पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रीमंडळात फक्त पंतप्रधानच आहे. बाकी मंत्री नाही. एखाद्या देशातील मंत्रीमंडळात असी स्थिती असण्याची ही  जगातील पहिलीच वेळ असावी. पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास बघता, जेव्हा जेव्हा पाकिस्तानात राजकीय अस्थिरता आली तेव्हा तेव्हा लष्कराने उठाव करत सत्ता ताब्यात घेतली आहे. पाकिस्तानत जेव्हा जेव्हा लष्करी राजवट आलेली आहे.तेव्हा
पाकिस्तानी पंजाबचे हायकोर्ट 

तेव्हा  भारताचे आणि पाकिस्तानचे सबंध दुरावले आहेत. त्यांच्यात कटुता आलेली आहे. सध्याचा पाकिस्तानचा राजकीय अस्थिरतेत लष्कर काहीही करणार नाही. असे जरी लष्कराने जाहिर केलेले असले तरी पाकिस्तानात लष्करी उठाव होण्याची शक्यता अगदीच नाकारता येणारी नाही. पाकिस्तानच्या नवनियुक्त पंतप्रधान  शरीफ यांनी सत्ता हाती घेतल्यावर लगेचच नैसर्गिक इंधनाचे आणि काही जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले आहेत. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेच्या दुःखात भरच पडली आहे
              हे कमी की काय म्हणून, शनिवार 16एप्रिल रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधीमंडळात अभुतपुर्व गदारोळ पाहण्यात आला. पाकिस्तानी पंजाबच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्र्याची निवड होताना, हा गदारोळ झाला.पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाच्या सदस्यांकडून सभापतीच्या दिशेने प्लँस्टिकचे कप फेकण्यात आले.मुख्यमंत्री निवडण्याचा आधी यांना बदलले पाहिजे, असी त्यांची मागणी होती. काही सदस्य त्यांचा आसनाजवळ देखील गेले. त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला, असा आरोप पाकिस्तानी पंजाबच्या विधीमंडळाच्या सभापतींनी केला आहे. शनिवारी रात्री झालेल्या मतदानातून पंतप्रधान  शेहबाज  शरीफ यांच्या मुलाची अर्थात हमजा शरीफ यांची  मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.  या निवडीच्या वेळी पाकिस्तानी तेहीरीक इंसाफ या पक्षाचे सदस्य विधीमंडळात उपस्थित नव्हते।
           पाकिस्तानातील पंजाब हा त्यांचा देशातील सर्वात ताकदवान सामर्थ्यशाली ,आर्थिकदृष्ट्या सधन प्रांत समजला जातो.पाकिस्तानातील सर्वात जास्त लोकसंख्या पंजाब मध्येच आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांत पाकिस्तानमधून फुटुन निघण्यासाठी जिये सिंध ही चळवळ राबवत आहे. बलूचीस्तान या प्रांताची सुद्धा  स्वातंत्र्यासाठी लढा सुरु आहे. खैबर ए पख्तूनवा (पुर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत) या भागावर अफगाणिस्तान आपला दावा सांगत आहे. अफगाणिस्तानच्या मते ब्रिटीश राजवटीत येथीव पठाणी लोक विनाकारण दोन देशात विभागले गेले.त्यांना एकत्र आले पाहिजे. हे दोन प्रकारे होवू शकते.एक म्हणजे दोन्ही देशातील पठाणी लोकांच्या प्रदेश
हमजा शरीफ 
अफगाणिस्तानात समाविष्ट करणे अथवा या भागाला स्वतंत्र देश म्हणून घोषित करणे.काश्मीरविषयी आपली भुमिका जगजाहीर आहे.. पाकिस्तानी लष्करात पंजाबी लोकांचा वरचष्मा आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पंजाब अन्य प्रांतापेक्षा वरचठ आहे. परीणामी  पाकिस्तानच्या एकमेव शांत असणाऱ्या प्रांतात राजकीय अस्थिरता आल्यास त्याचा परीणाम एकुण देशाच्या स्थैऱ्यावर होणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही.
पाकिस्तान अस्थिर झाल्यास त्याचे भारतावर देखील विपरीत परिणाम होणार आहेत त्यामुळे जरी तो आपला शत्रू असला तरी पाकिस्तानात अंतर्गत शांतता असणे अत्यावश्यक आहे त्यातच आपले हित आहे मात्र पाकिस्तानमधून येणाऱ्या राजकीय बातम्या बघता पाकिस्तान येते काही दिवस तरी अस्थिर राहणार हे सूर्यप्रकाश्या इतके स्पष्ट आहे त्यामुळे भारताची पश्चिम सीमा येत्या काही काळात थोडी तरी धगधणार हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?