मुद्दे त्यांचे मुद्दे आपले

       

    सध्या पश्चिम युरोपासह जवळपास समस्त जगाचे लक्ष फ्रान्सचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण होणार ? याकडे लागलेले आहे . फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पहिला टप्पा १० एप्रिल रोजीसंपला ज्यामध्ये १२ उमेदवारांनी आपले नशीब अजमावून बघितले मात्र यापैकी कोणीही उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदावर आरूढ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्थात किमान ५० % टक्क्याहून अधिक एक इतके मते घेऊ न शकल्याने फ्रान्सच्या संविधानानुसार फ्रान्सचा राश्यंध्यक्ष निवडण्यासाठी दुसरी फेरी  २४ एप्रिल रोजी होत आहे .फ्रान्सच्या संविधानानुसार पहिल्या फेरीत सर्वाधिक मते घेणारे पहिल्या दोन क्रमांकावरील उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतात   विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  आणि मरीन ले पेन हे उमेदवार फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  याना  पहिल्या फेरीत सर्वाधिक मते मात्र पुरेशी मते मिळाली नाहीत  त्यांच्या आताच्या २०२२ च्या  निकटच्या प्रतिस्पर्धी  मरीन ले पेन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  यांच्याशी या आधीच्या म्हणजेच २०१७ च्या निवडणुकीत सुद्धा दुसऱ्या फेरीत लढत दिली होती ज्यात मरीन ले पेन यांना ४७% मते तर विजयी उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ५३ % मते मिळाली  होती 
        सध्याच्या २०२२२ च्या निवडणुकीत अनेक मुद्यांभोवती प्रचार रंगला आहे ज्यामध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या किमान खर्चात कसे राहता येईल ? निवृत्तीवेतन , निवडणूक सुधारणा , निर्वासित आणि सुरक्षितता -राष्ट्रीय प्राधान्य विरुद्ध  पूर्ण नूतनीकरण रशिया आणि नाटो युरोपीय युनियनमध्ये राहायचे की नाही ? याबाबत सार्वमत घेण्यबाबतची उमेदवारांची भूमिका आणि आपल्या भारतीयांपैकी अनेकांसाठी अत्यंत महतवाचा असणारा मुस्लिम महिलांना हिजाब घालण्यास बंदी घालण्याचा निर्णय होय . 
       फ्रांसमध्ये एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८ % जनता इस्लाम धर्म अनुसरले पश्चिम युरोपचा विचार करता सर्वाधिक मुस्लिम बांधव हे फ्रांसमध्ये राहतात . फ्रांसमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांपैकी अनेक जण उत्तरी आफ्रिका भागातील अल्जेरिया चाड या फ्रान्सच्या वसाहतीतून फ्रान्समध्ये राहायला आलेल्या लोकांचे वंशज आहेत यातील प्रामुख्याने  वयोवृद्ध मुस्लिम बांधव काहीसे कट्टर आहेत मरीन ले पेन यांना महिलांना सार्वजनिक ठिकाणी
हेडस्कार्फ घालण्यावर बंदी घालायची आहे आणि त्यांनी तो घातल्यास त्यांना दंड ठोठावायचा आहे.त्यांच्यामते  
 बुरखा म्हणजे  इस्लामची कट्टरतावादी दृष्टी असलेल्या लोकांनी लादलेला "गणवेश"होय इमॅन्युएल मॅक्रॉन  यांची याबाबत कोणतीही  ठाम भूमिका नाही त्यांच्यामते हामुद्दा प्रचारात अने मूर्खपणाचे आहे 
             मरीन ली पेन यांच्यामते त्यांना ३० वर्षापर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला आयकरातून  पूर्णतः माफी , इंधनावरील मूल्यवर्धित कर २० % हुन साडेपाच % करणे . वयाच्या ६२ व्या वर्षानंतर निवृत्तीवेतन सुरु करणे , निवृत्तीवेतन किमान एक हजार युरो करणे मरीन ली पेन यांना फ्रान्समध्ये प्रवेश करण्यासाठी आणि फ्रेंच बनण्यासाठी कठोर नियमांच्या योजनांसह इमिग्रेशनवर सार्वमत घ्यायचे आहे त्यांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आनुपातिक प्रतिनिधित्व (PR) आणि अध्यक्षपदाचा सात वर्षांचा कार्यकाळ लागू करायचा आहेत त्यांनी फ्रान्सला "मोठी शक्ती" म्हणून पाहण्यास प्राधान्य देऊन, लष्करी टाकी आणि युद्धविमान प्रकल्पांसह जर्मनीबरोबरचे सर्व सहकार्य थांबविण्याचे वचन दिले आहे. ब्रेक्झिटची एक प्रशंसक, त्या फ्रान्सला "ब्रसेल्सच्या स्ट्रेटजॅकेट" मधून मुक्त करण्याबद्दल बोलतात , मात्र त्या  फ्रेक्सिटची शक्यता नाकारतात  . युद्धानंतर "नाटो आणि रशिया यांच्यात सामरिक सामंजस्य" असले पाहिजे असे त्यांचे  मत आहे.
तर त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामते निवृत्तीवेतन धारक आणि राहणीमानासाठीच्या सारा आवश्यक बाबींवर याढईच खर्च करण्यात आलाय आहेत प्रतिस्पर्ध्याच्या बाबी फ्रनसला खड्यात घालतील . निवृत्तीच्या व्हायचा विचार करता विद्यमान राष्ट्राध्यक्ष ते ६५ करू इच्छितात तसेच पोलिसांची संख्या २०३०पर्यंत रस्त्यावरील संख्या दुप्पट करण्यासाठी ११  नवीन मोबाइल युनिट्स आणि२३०  जेंडरम्स (लष्करी पोलिस) च्या ब्रिगेडसह पोलिस आणि जेंडरम्सना प्रशासकीय कार्यांपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी  फ्रेक्सिटच्या पार्श्वभूमीवर हि निवडणूक  युरोपासाठी महत्त्वाची असल्याचे म्हंटले आहे इमॅन्युएल मॅक्रॉन देखील संसदीय मतासाठी PR चा घटक सादर करण्यासाठी मोहीम राबवत आहेत,रशिया युक्रेन मुद्यावर त्यांनी अद्याप काहीही टिप्पणी केलेली नाही 
आपल्याकडील निवडणुका कोणत्या मुद्यावर लढवल्या जातात हे आपणास माहिती आहेच काही महिन्यापूर्वी झालेल्या जर्मनीतील निवडणुका या पर्यावरण रक्षण या मुद्यावर लढवल्या गेलेल्या होत्या जो मुद्दा आपल्या लोकप्रतिनिधिंनापासून कोसो मैल दूर आहे जेव्हा आपल्याकडील निवडणूक खऱ्या मुद्यांभोवती केंद्रित होईल तो दिन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी सुदिन असेल हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?