भारताच्या आर्थिक ताकदीचा विजय

     

      
सोळाव्या शतकाच्या शेवटच्या  काही दशकांत सध्याच्या तुर्कीये (पूर्वीचे नाव तुर्की ) देशातून जमिनीमार्गे युरोप खंडातून भारतात येण्याचा मार्ग  मार्ग बंद झाल्यावर  येणारा युरोपीय राष्ट्रे समुद्रीमार्गे भारतात येण्याच्या मार्ग शोधू लागली या शोध मार्गात अमेरिका खंडासह जगातील अनेक भूभागाचा शोध लागला अमेरिकेचा शोध घेणारा कोलंबस देखील भारताचा शोध घेण्यासाठी निघाला होता त्यास लागलेला अमेरिकेचा शोध हा अपघात होता तो अमेरिकेला शोधन्यासाठी जात नव्हता . युरोपीय राष्ट्रे भारतात येण्याचा मार्ग शोधत होती कारण भारताशी व्यापार केल्यावर मिळणार फायदा सोळाव्या शतकातील फायदा आज एकविसाव्या शतकात सुद्धा ययुरोपीय देशांना दिसत आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भारतात येणारे युकेचे पंतप्रधान  हेच सुचवत   यूकेचे पंतप्रधान जोरिन्स बाँसन २२ आणि २३ एप्रिल रोजी भारताच्या दोन दिवशीय दौऱ्यावर येणार आहेत पदाची सूत्रे हाती घेतल्यावर ते प्रथमच भारतात येणार आहेत .या आधी जानेवारी २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये कोव्हीड १९ चा मोठा उद्रेक झाल्याने आणि एप्रिल २०२१ मध्ये भारतात क्कॉव्हिड १९ चा बॉम्ब फुटल्याने त्यांचा भारत दौरा रद्द झाला होतानोव्हेंबर२०२१ मध्ये जागतिक हवामान बदलाच्या वार्षिक अधिवेशनासाठी  आपले पंतप्रधान युकेतील स्कॉटलंड या भागाची राजधानी असलेल्या ग्लासको या शहारत गेले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि
युकेचे पंतप्रधान जोरिन्स बोनसन एकमेकांना परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेटले होते . काही दिवसापूर्वीच रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने पश्चिम युरोप अमेरिका घेत असलेल्या भूमिकेला समर्थन द्यावे यासाठी भारताचे मन परिवर्तन करण्यासाठी युकेच्या परराष्ट्रमंत्री लिज़ ट्रस नवी दिल्लीत आल्या होत्या मात्र भारताच्या कणखर भूमिकेमुळे त्यांना हात चोळतातच लंडनला जावे लागले होते त्या पार्श्वभूमीवर आपण या दौऱ्याकडे बघावे लागेल येत आहेत
               भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे चीनसारखी कोणतीच बंधने येथे नाहीत भरततात युकेची उप्तादने घेऊ शकतील अश्या मध्यमवर्गाची मोठी संख्या आहे आणि ती झपाट्याने वाढतच आहे . भारत काही वर्षांपूर्वी यूकेची कॉलनी असल्ण्याने प्रशासन व्यवस्था देखील बऱ्याच प्रमाणात सारखी आहे .परिणामी युके या ठिकाणी युकेची बाजरपेठेची गरज सहजतेने पूर्ण होऊ शकते  युकेला बेक्झिट झाल्यावर आपलया देशाला आर्थिक स्थितीवर स्थैर्य देण्यासाठी एका मोठ्या बाजरपेठेची मोठी गरज आहे . त्यासाठी बोलणी करण्यासाठी युकेचे पंतप्रधान भारतात दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत  ज्यातील पहिल्या दिवशी ते गुजरात मधील विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करतील तर दुसऱ्या दिवशी नवी दिल्लीत पंप्रधान यांच्याशी विविध विषयावर करार करतील  ज्यामध्ये  विविध आर्थिक बाबींसह शैक्षणिक  शास्त्र विषयांवर करण्यात येणाऱ्या करारांचा समावेश आहे तसेच रशिया युक्रेन यांच्यातील युद्धकोव्हीड १९ नंतरची परिस्थितीयाजागतिक मुद्यासह इंडो पॅसिफिक क्षेत्रातील युकेच्या हितसंबंधांना बळकटी देण्यासाठी करावयाचा उपाययोजना अफगाणिस्तान पाकिस्तान मधील आर्थिक राजकीय स्थिती आदी प्रादेशिक विषयांवर चर्चा होण्याचा संभव आहे
         रशिया युक्रेन युद्धावरून रशियावर बंधने लादण्याच्या अमेरिकेच्या आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रांच्या भूमिकेला  समर्थन देणे किंबहुना रशियाकडून स्वस्तात इंधन मिळवणे , संयुक्त राष्ट्रसंघाच्या  आमसभेत आणि सुरक्षा  परिषदेत  अमेरिकेच्या हो मध्ये हो मिसळता तटस्थ राहून एक प्रकारे विरोधच नोंदवणे त्यानंतर विविध राष्ट्रप्रमुखानी सांगून सुद्धा आपला निर्णय तसाच ठेवणे असे असून देखील युकेचे पंतप्रधान भारत भेटीवर येत आहेत या भेटीला भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये  बंधनमुक्त व्यापारासंदर्भात काही वाटाघाटी होण्याचा संभव आहे . आतापर्यंत या संदर्भात वाटाघाटी परिषदा झालेल्या आहेत येत्या वर्षअखेरीस त्या विषयावर पूर्णतः सहमती  करण्यावर दोन्ही देशांचा प्रामुख्याने युकेचा भर आहे त्या संदर्भात काही महत्तपूर्ण वाटाघाटी या काळात
होईल अशी आशा आहे  बंधनमुक्त व्यापाराच्या एकूण २६ बाबींपकी बाबींबाबत सहमती झाली आहे बाकीच्या बाबींवर सहमती होण्याबाबत वेळापत्रक या बैठकीत ठरू शकते
       इंदोरचे राजकवी भा रा तांबे यांच्या मावळत्या दिनकरा या कवितेत सांगितल्याप्रमाणे जर आपणाकडे काहीतरी असेल तर आणि तरच जग आपणास किंमत देतात या काव्यपंक्तीनुसार भारताकडे जगाच्या बाबतीत फायदा होण्यासारखे काहीतरी असल्यानेच जग आपणाकडे येत आहे भारताच्या या सामर्थ्यात वाढ व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपली रजा घेतो जय हिंद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?