भारत पाक संबंध नव्या दिशेने ?


भारत 
आणि पाकिस्तान यांच्या संबंधावर परिणाम करणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . पहिल्या गोष्टीत अमेरिकेचा देखील काहीसा सहभाग आहे . तर दुसरी गोष्ट पूर्णतः भारत पाकिस्तान यांच्याशी संदर्भात आहे पाकिस्तान आपल्या भारताचा शत्रू आहे तसेच पाकिस्तान आपल्या बरोबर मोठी सीमा शेअर करतो त्यामुळे या घडामोडी आपल्यासाठी अत्यंत महतवाच्या ठरतात तर जाणून घेउया त्या घडामोंडीविषयी 
तर अमेरिकेत सध्या ज्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष आणि उप्राष्ट्राध्यक्ष आहेत त्या डेमोक्रेक्रीक पक्षाच्या सिनेटर (आपल्या खासदरा समकक्ष )  असणाऱ्या इल्हान उमर यांनी नुकत्याच आपल्या पाकिस्तानने अनधिकृतरित्या आपल्या ताब्यात ठेवलेल्या पाकव्याप्त काश्मीर या भागाला भेट दिली त्यावेळी त्यांची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि विद्यमान पंतप्रधान शरीफ यांच्या बरोबर असणारे फोटो प्रसिद्ध करण्यात आले .पाकिस्तानचे माजी
पंतप्रधान इम्रान खान  अमेरिकेच्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे माझे सरकार उलथवून टाकण्यात आले असा आरोप करत आहेत तो आरोप करून काहीच दिवस होत आंही तोच त्याच पक्षाच्या सिनेटर इल्हान उमर  यांच्या बरोबर फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक चर्चाना उधाण आलेले आहे  या भेटीत यांनी  काश्मीर प्रश्नाविषयी अत्यंत वादग्रस्त विधान केले ज्याचा भारतातर्फे अधिकृतपणे निषेध करण्यात आला ज्या निषेधाची अमेरिकेने देखील दखल घेत त्यांनी काश्मीरविषयी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले . अमेरिकेचे अधिकृत मत त्यांच्या वैयक्तिक मतापेक्षा वेगळे आहे असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडून याबाबत सांगण्यात आले . लहानपणी सोमालिया या देशातून वडिलांबरोबर विस्थापित म्हणून आलेल्या आणि अनेक वर्ष  अमेरिकेत राहिल्यामुळे नागरिकत्व मिळाल्याने सिनेटर झालेल्या इल्हान उमर या त्यांचा मुस्लिम बांधवाविषयीच्या प्रेमामुळे या आधी अनेकदा चर्चेत आलेल्या आहेत मुस्लिम बांधवांच्या अमेरिकेतील दूत म्हणून त्या प्रसिद्ध आहेत आयुष्याचा सुरवातीला  पेहराव आणि अन्य बाबींमुळे मिळालेल्या अपमानकारक वागणुकीचे भांडवल करत मानवी हक्काचे कारण पुढे करत सातत्याने जगभरात त्या मुस्लिम बांधवांवर अन्याय होतो अशी हाकाटी पेटत राजकारण खेळण्यासाठी इल्हान उमर  प्रसिद्ध आहेत न्यूयॉर्क टाइम्स सारख्या अनेक अमेरिकी वर्तमानपत्रात त्यांच्या मुस्लिम बांधवांविषयी असणाऱ्या आपुलकी विषयी लेख बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत 
हि झाली अमेरिकेच्या सहभाग असणारी घडामोड आता बघूया 
तर भारतातील महाविद्यालयीन शिक्षणाचे नियमन करणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोग आणि उसाचं शिक्षण मंडळाने भारतात पाकिस्तानमधील पदव्या भारतात उच्च शिक्षण , आणि नोकरी व्यवसायासासाठी ग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे मात्र यातून पाकिस्तानमधून येऊन  भारतात  विस्थापित म्हणून राहणाऱ्या मुस्लिमेत्तर घटकांना सूट देण्यात आली आहे काश्मीर मधून अनेक जण वैद्यकीय आणि अभियांत्रिकी तसेच अन्य
व्यावसाईक शिक्षण घेण्यासाठी जात असतात ,पाकिस्तानकडून याबाबत आपल्या भारतातील काश्मिरी तरुणाईस शिष्यवृत्ती देण्यात येते त्यांचा वापर करत हे युवा वर्ग तिकडे जात असतो त्याच प्रमाणे उर्दू भाषेचे शिक्षण घेण्यासाठी तसेच काही धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणत विद्यार्थी तिकडे जात असतात . त्याला आता खीळ बसणार आहे भारतातून पाकिस्तानात शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण भारत पाकिस्तान संबंधावर आधारलेले असे संबंध दुरवल्यावर त्या शिक्षणामध्ये मोठा खंड पडत असे या कारणामुळे होणारी शिक्षणाची हेळसांड देखील आता थांबेल 
पाकिस्तानमधील किंवा त्याशी संधीत घटनेचा आपल्यावर मोठा परिणाम होत असतो त्यामुळे आपणस त्या माहिती असणे आवश्यक आहे याबाबत आपण नेहमी सजग राहणे हेच जागृत नागरिकाचे कर्तव्य आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?