मैत्रीत मिठाचा खडा


इतर वेळी कायम पाकिस्तानचा ऑल वेदर फ्रेंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन आणि पॅलिस्तानच्या मैत्रीत सर्वच काही उत्तम चालू नसल्याचे,  पाकिस्तानचे नवनियुक्त नियोजन मंत्री एहसान इक्काबल यांनी शुक्रवार २२ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे जगासमोर सुमारे सव्वा दोन  वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१९९ मध्ये स्थापित  केलेले  सीपेक प्राधिकरण बरखास्त करण्याचे  बरखास्त करण्याचा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत  आले  आहेत सी पे क अंतर्गत चालणाऱ्या प्रकल्पाला गती मिळावी तसेच त्यांच्यामध्ये चालणाऱ्या विविध प्रकल्पांवर देखरेख करता यावी यासाठी हे प्राधिकरण मागच्या इम्रान खान सरकारच्या कार्यकाळातएका अध्यादेशाद्वारे  स्थापन करण्यात आले होते ते बरखास्त करण्याचा सूचना पाकिस्तानचे नवनियुक्त निययोजन मंत्री   त्यांच्या मते सिपेक मधील विकासकामे अत्यंत संथ गतीने सूर आहेत . कामांवर लक्ष ठेवण्यासाठी हे प्राधिकरण पूर्णतः कुचकामी ठरले आहे हे प्राधिकरण चालवणे म्हणजे संसाधनांवर विना विनाकारण अतिरिक्त ताण निर्माण करणे किंबहुना हे प्राधिकरण यातील कामांची गती मंदावते जर हि कामे वेळेत झाली नाहीत तर ज्या उद्योजकांसाठी हे होत आहे यांचा या वरील विश्वास उडेल ज्यामुळे या प्रदेशचा उद्योगिक विकास आणि दळणवळण या सीपेकच्या मुख्य हेतूलाच नख लावण्यासारखी स्थिती निर्माण होईल .त्यामुळे हे प्राधिकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्याच्या आम्ही विचार करत आहोत असे त्यांनी माध्यांना सांगितले आहे 

सीपेक प्रकल्पाअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांपैकी सुमारे ३७ टक्के स्थापित प्रकल्पांचे पुढील काम पाकिस्तानने चिनी कंपन्यांना पॆसे न दिल्याने थांबलेले आहे जवळपास १९८० मेगावॉट्स वीज निर्मिती त्यामुळे जवळपास ठप्प होण्याचा मार्गवर आहे चिनी कंपन्यांकडून उभारण्यात येणाऱ्या १० ऊर्जाप्रकल्पनांतून २७० अब्ज अब्ज पाकिस्तानी रुपयांचे देणे पाकिस्तानने या आधीच चुकवले आहे आणि नजीकच्या काळात आणखी ३० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे देणे पाकिस्तानला येत्या काळात देयचे आहे म्हणजेच एकूण ३०० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे देणे पाकिस्तान चिनी ऊर्जा कंपन्यांना देणे लागतो मागच्या इम्रान खान सरकारने हे देणे फेडण्याचा प्रयत्न केला
मात्र ते पूर्णपाने हे देणे देऊ शकले नाही  या वित्त तुटवड्यामुळे पाकिस्तानमधील अनेक ऊर्जा प्रकल्प बंद होण्याचा मार्गावर आहे करातील पेचप्रसंगामुळे मुज्जफरबाद जिह्ल्यातील जलविद्युत प्रकल्पाचे काम चीनकडूनथांबवण्यात आले आहे दासू या प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथीलही काम बंदच आहे क्वेटा या शहारत झालेल्या चिनी राजदूतावरील हल्यानंतर परिसरात अनेक प्रकल्पांचे भवितव्य अडचणीत आले आहे 
            पाकिस्तान एफ ए टी एफ च्या ग्रे लिस्टमध्ये आहे पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे त्या पार्श्वभूमीवर या बातम्या पाकिस्तानच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत पाकिस्तान आपला शत्रू आहे म्हणून भारताने देखील आंनद करावा अश्या या बातम्या नाहीत या स्थितिमुळे जर पाकिस्तानात गृह युद्ध सुरु होण्यासारखी स्थिती निर्माण झाली तर भारताला त्यांचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळे या स्थितीमुळे आपण हुरळून ना जात त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यातच आपले हित आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?